Astrology : या पाच राशीच्या लोकांना येतो सर्वाधिक राग, विनाकारण घेतात इतरांशी पंगा!
प्रत्त्येक राशीचा स्वभाव असतो. काही राशीचे लोकं शांत असतात तर काही शिघ्रकोपी असतात. जोतिषशास्त्रात अशा काही राशी सांगितल्या आहेत ज्याचे जातक अत्यंत रागिट असतात.
मुंबई : प्रत्येकाला कधी ना कधी राग येणं साहजिक आहे, पण काही माणसं अशी असतात की ज्यांना प्रत्येक मुद्द्यावर राग येतो (Angry Zodiac) . एवढेच नाही तर या लोकांचा राग इतका असतो की ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. अनेकदा रागाच्या भरात चुकीचे निर्णय घेतले जातात. नातेही खराब होते, शिवाय राग प्रकृतीसाठीही घातक मानला जातो. चला जाणून घेऊया जोतिषशास्त्रात अशा कोणत्या राशी आहेत ज्यांना खूप राग येतो आणि अशा वेळी या लोकांशी वाद घालणे तुमच्यासाठी कठीण ठरू शकते.
या राशीच्या लोकांना प्रचंड राग
वृषभ
वृषभ राशीचे लोकं हट्टी आणि रागीट स्वभावाचे असतात. हे लोकं कोणाचेही पटकन ऐकत नाहीत. राग आल्यावर ते आक्रमक होतात आणि जोरजोरात ओरडू लागतात. मात्र, या लोकांचा राग लवकरच शांत होतो. वृषभ राशीचे लोकं बहुतेक योग्य गोष्टींवर रागावतात. या लोकांमध्ये संयम फार कमी असतो. त्यांचा राग टाळण्यासाठी, रागाच्या भरात त्यांच्याशी बोलणे टाळणे चांगले. जर ते तुमच्या समोर आले तर तुम्ही त्यांच्यासोबत कोणताही वाद न करता दूर गेलेले बरे. वेळ गेल्यानंतर वृषभ राशीच्या लोकांना समजते की त्यांनी रागाच्या भरात मर्यादा ओलांडल्या आहेत.
सिंह
सिंह राशीच्या लोकांचे प्रत्येक विषयावर स्वतःचे मत असते. हे लोकं प्रत्येक गोष्टीवर वाद घालतात आणि जोपर्यंत त्यांचा मुद्दा खरा करत नाही तोपर्यंत मागे हटत नाही. राग आल्यावर ते खूप चुकीचे बोचरं बोलतात आणि त्यांचे नातेही बिघडवतात. हे लोकं विशेषत: त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या लोकांवर पूर्ण अधिकाराने रागावतात. ते आपली चूक सहजासहजी स्वीकारत नाहीत आणि अनेकदा रागाच्या भरात दुखावणाऱ्या गोष्टी बोलतात. सिंह राशीच्या लोकांचा राग टाळण्यासाठी तुम्ही हुशारीने वागा. त्यांची कुठे चूक आहे ते स्पष्टपणे सांगा. जर त्यांनी तुमचे ऐकले नाही तर तुमचा मुद्दा नीट समजावून सांगा. ते आपली चूक सहजासहजी मान्य करत नाहीत, त्यामुळे तुमचा मुद्दा पूर्ण पुराव्यासह त्यांच्यासमोर ठेवा.
वृश्चिक
वृश्चिक राशीचे लोकं शिघ्र कोपी असतात मात्र त्यांचा राग ते गलेच व्यक्त करत नाही. हे लोकं अनेक दिवस आपल्या भावना मनात साठवून ठेवतात. या लोकांना माहित आहे की त्यांना काय हवे आहे आणि ते कसे मिळवू शकतात. मनाविरूद्ध गोष्टी घजल्या की त्यांचा पारा चढलाच म्हणून समजा. या लोकांना राग सहजासहजी येत नाही, परंतु जेव्हा ते चिडतात तेव्हा त्यांना नियंत्रित करणे कठीण असते. त्यांचा अपमाण करणाऱ्याला ते योग्य वेळी तोंडघशी पाडतात. वृश्चिक राशीचा राग शांत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांना त्यांच्या मनासारखे करू देणे.
धनु
ही अग्नी तत्वाची राशी आहे. या राशीच्या लोकांना जेव्हा राग येतो तेव्हा ते मागचा पुढचा काहिच विचार करत नाही. जेव्हा त्यांना राग येतो तेव्हा ते त्यांचा समतोल गमावतात. धनु राशीच्या लोकांची चांगली गोष्ट म्हणजे त्यांना कितीही राग आला तरी त्यांना त्यांची चूक लवकर कळते. राग शांत झाल्यावर त्यांना समजावून सांगा की त्यांचे वागणे अजिबात योग्य नव्हते.
मकर
मकर राशीचे लोकं रागाने आपले नुकसान करून घेतात. कधीकधी ते रागाच्या भरात काही घातक गोष्टीही करतात. ज्या व्यक्तीवर त्यांना राग येतो त्याला अपमानित करण्याचा ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. जास्त राग ही मकर राशीच्या लोकांची सर्वात मोठी कमजोरी आहे. मकर राशीचे बहुतेक लोकं अतिशय जबाबदार स्वभावाचे असतात. त्यांचा राग रास्त मार्गाने कमी करण्याचा प्रयत्न केल्यास बरे होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)