Astrology Predictions : बुध ग्रहाचा उदय ‘या’ तीन राशींचा ताण वाढवणार; सुरू होणार संकटांची मालिका
Mercury Rise Effect On Zodiacs : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला, ग्रहांचा अधिपती बुध उगवेल, ज्यामुळे काही राशींना अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. पुढील महिन्यात बुध ग्रहाच्या उदयामुळे कोणत्या राशींना नुकसान होऊ शकते ते जाणून घेऊया.

ज्योतिषशास्त्रात, बुध ग्रह शास्त्रांमध्ये ग्रहांचा राजा मानला जातो. बुद्धिमत्ता, वाणी, संवाद, तर्कशास्त्र, गणित, मैत्री, त्वचा, हुशारी, व्यवसाय आणि निर्णयक्षमता यांचे प्रतीक म्हणून बुध ग्रह ओळखला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह एका निश्चित वेळेनंतर उदय आणि अस्त करतो, ज्याचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होतो. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला भगवान बुधचा उदय होईल. यावेळी बुध ग्रहाच्या उदयामुळे काही राशीच्या लोकांना नुकसान सहन करावे लागेल.
कधी होणार बुध ग्रहाचा उदय? १८ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी ७:२० वाजता बुध ग्रह अस्त झाला आहे. ८ एप्रिल २०२५ पर्यंत बुध याच अवस्थेत राहील. ८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ५:०४ वाजता बुध ग्रहाचा उदय होईल. त्यानंतर 3 राशी अशा असणार आहेत, ज्यांच्या जीवनात संकटांचं वादळ येणार आहे.
कोणत्या राशींवर होणार वाईट परिणाम
मेष रास
मेष राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचा उदय शुभ राहणार नाही. ऑफिसमध्ये तुमचे एखाद्याशी भांडण होऊ शकते, ज्यामुळे तुमचा मूड काही दिवस खराब राहील. याशिवाय, तुम्हाला काम करावेसेही वाटणार नाही. ज्या लोकांनी अलीकडेच नवीन व्यवसाय सुरू केला आहे त्यांना आर्थिक नुकसान होईल. जोडप्याच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीच्या प्रवेशामुळे गैरसमज निर्माण होतील आणि दररोज भांडणे होतील.
वृषभ रास
ऑफिसचे काम घाईघाईत करू नका. अन्यथा, कामात एखादी चूक होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला बॉसकडून ओरडा खावा लागेल. अविवाहित लोकांच्या कुंडलीत बुध ग्रह योग्य ठिकाणी नसतो, त्यामुळे नातेसंबंध दृढ होण्याची शक्यता खूपच कमी असते. विवाहित लोकांचे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी मालमत्तेवरून वाद होऊ शकतात. बहिणींमध्ये भांडण होईल, ज्यामुळे घरात तणावाचे वातावरण असेल.
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचा उदय शुभ राहणार नाही. नोकरी करणाऱ्या लोकांना काही गंभीर आजार होऊ शकतात. याशिवाय, ऑफिसमध्ये बॉसशी वाद होईल, ज्यामुळे तुम्हाला त्यांच्या रागाला सामोरे जावे लागेल. ज्यांचे पालक त्यांच्या लग्नासाठी योग्य जोडीदार शोधत आहेत, त्यांचा शोध सुरूच राहील. या वर्षी लग्न होणार नाही. एप्रिलच्या सुरुवातीला व्यावसायिकांना आर्थिक नुकसान होऊ शकते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)