कॅरॅक्टर ढिला है..! ‘या’ राशीचे लोक प्रेमात देतात धोका, अनेक अफेअर्स ठेऊन मिळवतात आनंद
प्रेम हे प्रत्येकाच्या आयुष्यातले सुंदर आणि नाजूक वळण असते. या वळणार मिळणारे अनुभव आयुष्यात बरंच काही शिकवून जाते. ज्योतिषशास्त्रात अशा काही राशी असतात ज्या आपल्या जोडीदाराची कायम फसवणूक करतात.

ज्यांना प्रेमात धोका मिळाला नसेल असे कमीच लोक आता बघायला मिळतात. त्याचबरोबर सध्या ब्रेकअप आणि पॅचअप सहज होतात. त्यामुळे आजच्या पिढीसाठी ब्रेकअप होणे ही सामान्य गोष्ट बनली आहे. पण ज्योतिषशास्त्रानुसार 12 राशींपैकी काही राशी अशा असतात ज्या आपल्या जोडीदाराला प्रेमात फसवतात. या राशीच्या मुलीच नाही तर मुलं सुद्धा आपल्या जोडीदाराला फसवण्यात पटाईत असतात.
ज्योतिषशास्त्रात, 5 राशी अशा सांगितलेल्या आहेत, ज्या आपला प्रियकर, प्रियसी, पत्नी किंवा पती यांना धोका देतात. त्यामुळे तुमचा जोडीदार देखील याच तीन राशींपैकी एका राशीचा असेल तर तुम्हाला देखील हा अनुभव येऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला याच पाच राशी कोणत्या आहेत त्याबद्दल सांगणार आहे.
मेष रास मेष राशीच्या व्यक्ती या आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक नसतात. अनेक लोक या राशींच्या व्यक्तींच्या जीवनात येतात. या राशीच्या लोकांचे अनेक अफेअर्सही असतात. पण मेष राशीच्या व्यक्तीचे कोणत्याच व्यक्तींशी भावनात्मक प्रेमसंबंध नसतात. त्यामुळे हे लोक आपल्या जोडीदाराला प्रेमात सहज धोका देतात.
मिथुन रास ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या व्यक्तींवर प्रेमाच्या बाबतीत विश्वास ठेऊ नये असे म्हटले जाते. या राशीचे लोक प्रेमात पडले, आणि आपल्या जोडीदारासोबत कितीही गंभीर असले तरीही त्यांच्या मनात काहीतरी वेगळच चालू असते. त्यांच्या चंचल स्वभावामुळे ते लवकरच आपल्या नात्यात बोर होतात आणि जोडीदाराची फसवणूक करतात.
सिंह रास सिंह राशीचे लोक हे खूप रहस्यमय स्वभावाचे असतात. या राशीच्या लोकांच्या जीवनात प्रेमाच्या बाबतीत बोलायच तर त्यांच्या आयुष्यात अनेक जोडीदार येतात, पण सर्वोत्कृष्ट जोडीदाराची त्यांना गरज असल्याने त्यांचे प्रेम फार काळ टिकत नाही. त्यामुळे ते अधिक चांगला जोडीदार शोधण्याच्या नादात कायम आपल्या जोडीदाराला धोका देतात.
धनू रास प्रेमात धनु राशीच्या लोकांकडून नेहमीच फसवणूक केली जाते असे म्हणतात. या राशीचे लोक स्वच्छंदी जीवन जगण्यात विश्वास ठेवतात. त्यामुळे आपल्या जोडीदाराला ते कोणतंही वचन देण्यास टाळतात. कितीही प्रेम आपल्या जोडीदारावर केलं तरी ते कोणत्याच बंधनात राहू इच्छित नसल्यामुळे हे लोक कोणाशीच प्रामाणिक राहत नाही.
मीन रास मीन राशीचे लोक योग्य निर्णय घेण्याच्या बाबतीत नेहमीच गोंधळलेले असतात. आपल्याला काय हवे आहे, लोक काय विचार करतील अशाप्रकारच्या प्रश्नांमध्ये या व्यक्ती नेहमीच गुंतून राहतात. त्यामुळे अनेकदा अर्ध्यावरच आपल्या जोडीदाराची हे लोक साथ सोडतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)