Astrology: चंद्राच्या राशीत होत आहे या दोन ग्रहांचे मिलन; ‘या’ चार राशींना होणार फायदा

ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) कर्क राशीवर चंद्राचे राज्य असते. दुसरीकडे, 16 जुलै रोजी ग्रहांचा राजा सूर्य देव राशी (Horoscope) बदलणार आहे. यावेळी सूर्य देव कर्क राशीत प्रवेश करणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 जुलैला बुध कर्क राशीत प्रवेश करत आहे. कर्क राशीत बुध आणि सूर्य एकत्र असल्याने ग्रहांच्या संयोगाने बुधादित्य योग (Budhatitya yog) तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रात […]

Astrology: चंद्राच्या राशीत होत आहे या दोन ग्रहांचे मिलन; 'या' चार राशींना होणार फायदा
बुधादित्य योग
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 1:41 PM

ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) कर्क राशीवर चंद्राचे राज्य असते. दुसरीकडे, 16 जुलै रोजी ग्रहांचा राजा सूर्य देव राशी (Horoscope) बदलणार आहे. यावेळी सूर्य देव कर्क राशीत प्रवेश करणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 जुलैला बुध कर्क राशीत प्रवेश करत आहे. कर्क राशीत बुध आणि सूर्य एकत्र असल्याने ग्रहांच्या संयोगाने बुधादित्य योग (Budhatitya yog) तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रात बुधादित्य योग अत्यंत शुभ मानला जातो. या योगात केलेल्या कामात यश नक्कीच मिळते. अनेक राशींना बुधादित्य योगाचा फायदा होणार आहे. येणाऱ्या काळात आर्थिक स्थैर्य लाभेल. जोतिष्यशास्त्रात या योगाला फार महत्त्व आहे. बऱ्याचदा काही प्रकरणांमध्ये ज्यांच्यावर त्यांना या दिवशी स्वतःला निर्दोष सिद्ध करता येते, कारण ग्रहमान त्यांच्या बाजूने असते. ग्रहांची ऊर्जा त्यांच्या प्रयत्नांना यश देते.  चला जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत ज्यांचे भाग्य बुधादित्य योगाने चमकणार आहे.

  1. मेष – सूर्य आणि बुध एकाच राशीत कर्क राशीत असल्याने मेष राशीचे लोक भाग्यशाली असणार आहेत. तसेच या काळात तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरदारांना नोकरीच्या अनेक नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती सुधारेल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. वडिलोपार्जित मालमत्तेच्या प्रकरणात अडकलेली कामे पूर्ण होतील. या दिवशी एखादा महत्त्वाचा संकल्प करून त्यासाठी प्रयत्न केल्यास तो पूर्ण होईल.
  2. वृषभ – वृषभ राशीच्या लोकांना बुधादित्य योगाच्या प्रभावामुळे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. शिक्षणाशी संबंधित क्षेत्रात लाभ होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यापाऱ्यांना फायदा होऊ शकतो. विवाह इच्छुकांना चांगले स्थळ येऊ शकते. वैवाहिक जीवनात सुरू असलेला कलह संपुष्ठात येईल.
  3.  कन्या – कर्क राशीत बुधादित्य योग तयार झाल्यामुळे कन्या राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल. या काळात तुम्ही जे काही काम हाती घ्याल त्यात यश मिळेल. नवीन काम सुरू करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. आरोग्य उत्तम राहील. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल.
  4. मकर – मकर राशीच्या लोकांना या काळात काही चांगली बातमी मिळू शकते. बुधादित्य योगाचा काळ तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. शत्रूंवर विजय मिळेल. अचानक कुठूनतरी पैसा येईल. नोकरी-व्यवसायासाठी हा काळ अतिशय शुभ आहे.
  5. हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.