Astrology: या राशींवर कायम असते श्रीगणेशाची कृपा, आयुष्यात नांदते सुखसमृद्धी
हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीची (Ganpati) पूजा केली जाते. असे मानले जाते की श्रीगणेशाची आराधना केल्याने सर्व प्रकारची कामे निर्विघ्न पार पडतात.
31 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2022) सुरुवात झाली आहे. घरोघरी बाप्पांचे आगमन झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीची (Ganpati) पूजा केली जाते. असे मानले जाते की श्रीगणेशाची आराधना केल्याने सर्व प्रकारची कामे निर्विघ्न पार पडतात. गणरायाच्या उपासनेने सुखसमृद्धी लाभते. धार्मिक मान्यतेनुसार बुधवार हा गणपतीला समर्पित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) काही राशींवर गणपतीची विशेष कृपा असते.जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत.
- मेष- ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांवर गणेशाची कृपा राहते. यामुळे या राशीच्या लोकांची मनोकामना पूर्ण होते. जे काम ते हाती घेतात ते निर्विघ्न पार पडते. याशिवाय मार्गात आलेल्या अडथळ्यांना गणेशाच्या कृपेने परतवून लावतात. श्रीगणेशाची विशेष कृपा असल्याने या राशीच्या लोकांमध्ये बुद्धी आणि कौशल्य उपजतच असते.
- मिथुन- मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. यामुळे या राशीच्या लोकांमध्ये उत्तम संभाषण कौशल्य असते. मिथुन राशीच्या लोकांना व्यवसायात विशेष यश मिळते. त्यांची कामे श्रीगणेशाच्या कृपेने लवकर पूर्ण होतात. तसेच इच्छित परिणाम प्राप्त होतात.
- मकर- शनिदेवासह मकर राशीच्या लोकांवर गणेशाची देखील कृपा असते. हे लोकं कष्टाळू असल्याने प्रत्येक कामात त्यांना यश मिळते. ते आपल्या बुद्धीच्या जोरावर मोठ्या आव्हानांवरही मात करतात. मकर राशीचे लोकं आयुष्यात खूप यशस्वी होतात.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update