AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology : शंखाचे हे उपाय आहेत फारच चमत्कारीक, होतो भाग्योदय!

ज्योतिष शास्त्रानुसार घरातील पूजेच्या ठिकाणी चांगला शंख ठेवा. असे म्हटले जाते की घरात शंख ठेवल्याने माणसाच्या चांगल्या दिवसांची सुरुवात होते. एवढेच नाही तर शंख ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

Astrology : शंखाचे हे उपाय आहेत फारच चमत्कारीक, होतो भाग्योदय!
शंखImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 8:02 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचा अवलंब केल्याने व्यक्तीचे भाग्य उजळते. असे म्हणतात की घरात काही वस्तू आणल्याने भाग्योदय होतो. यासाठी जोतिषशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आलेले आहेत.  वास्तुशास्त्रानुसार घरातील काही छोट्या गोष्टींची काळजी न घेतल्याने वास्तुदोष निर्माण होतात. घरातील वास्तुदोष व्यक्तीच्या सुख आणि प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात. परंतु यावर काही उपाय केल्यास त्या व्यक्तीला अपेक्षित यश मिळते. यापैकी एक उपाय म्हणजे शंख. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा प्रिय शंख घरात ठेवल्यानेच माणसाच्या कामात येणारे अडथळे दूर होतात.

शंख पवित्र का मानले जाते

वैदिक ज्योतिषात शंख अत्यंत पवित्र मानला जातो. कोणत्याही प्रकारची पूजा, पठण, धार्मिक विधी किंवा शुभ कार्य इत्यादींची सुरुवात शंख फुंकूनच केली जाते. यामागे अनेक पौराणिक समजुती सांगितल्या आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार शंखाचे काही उपाय माणसाला धनवान बनवतात. तसेच वास्तुदोषांपासून मुक्ती मिळते.

शंख

ज्योतिष शास्त्रानुसार घरातील पूजेच्या ठिकाणी चांगला शंख ठेवा. असे म्हटले जाते की घरात शंख ठेवल्याने माणसाच्या चांगल्या दिवसांची सुरुवात होते. एवढेच नाही तर शंख ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.

हे सुद्धा वाचा

रोज पूजेनंतर शंख फुंकणे शुभ मानले जाते. असे म्हणतात की शंखाचा आवाज वातावरणात जिथे जातो तिथे भूत, पिशाच इत्यादी येत नाहीत. शंखाचा आवाज संपूर्ण घरामध्ये सकारात्मक ऊर्जा भरतो. त्यामुळे सौभाग्य प्राप्त होते.

असे मानले जाते की पूजेपूर्वी शंख पाण्याने भरावा. असे केल्याने ते लवकर प्रसन्न होतात आणि घरात देवी लक्ष्मी वास करते. पूजेनंतर घराच्या कानाकोपऱ्यात शंख पाणी शिंपडावे. हा उपाय केल्याने वास्तुदोष दूर होतात आणि घरात शांती नांदते. एवढेच नाही तर कुटुंबातील सदस्यांचे उत्पन्नही वाढते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?.
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट.
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज.
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन.
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही.
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्....
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय.
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.