Astrology: असा असतो मकर राशीच्या लोकांचा स्वभाव, या गोष्टींनी ठरतात ते इतरांपेक्षा वेगळे
मकर राशीच्या व्यक्ती या अत्यंत महत्वाकांक्षी असतात आणि अगदी प्रॅक्टिकलदेखील. स्वतःला खोटे दाखविण्यात त्यांना अजिबातच रस नसतो. आपण जसे आहोत तसंच दाखविण्यात त्यांना रस असतो. त्यामुळेच ते जसे आहेत तसेच सर्वांसमोर असतात.
Astrology: मकर राशीचे लोकं (Capricorn) मेहनती, समर्पित आणि निष्ठावान असतात. त्यांचा शासक ग्रह शनि (Shani) आहे, ज्यामुळे ते अत्यंत शिस्तप्रिय असतात. या राशीचे लोकं जे काही काम निवडतात त्यात ते प्राविण्य कमवितात. मकर राशीचे लोकं त्यांच्या कामाप्रती समर्पित असतात. त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती आणि समृद्धी मिळविण्यासाठी ते कठोर परिश्रम करतात. यशस्वी होण्यासाठी ते शॉर्टकट मारत नाही. मकर राशीचे लोकं फणसासारखे असतात. वरून कितीही कठोर असले तरी आतून मात्र ते मृदु आणि मधुर असतात. या राशीचे लोकं प्रेमळ आणि काळजी घेणारे असतात. आपल्या कामाच्या आणि महत्त्वाकांक्षेच्या शिखरावर पोहोचण्यासाठी ते अहोरात्र मेहनत करतात.
महत्वकांक्षी असतात
मकर राशीच्या व्यक्ती या अत्यंत महत्वाकांक्षी असतात आणि अगदी प्रॅक्टिकलदेखील. स्वतःला खोटे दाखविण्यात त्यांना अजिबातच रस नसतो. आपण जसे आहोत तसंच दाखविण्यात त्यांना रस असतो. त्यामुळेच ते जसे आहेत तसेच सर्वांसमोर असतात. या व्यक्ती अत्यंत मेहनती असतात आणि कोणतेही काम अत्यंत मन लाऊन पूर्ण करतात. पण ज्या गोष्टींत या व्यक्तींना रस नसतो त्यामध्ये अत्यंत आळशीपणा करतात. करिअरच्या बाबतीत बोलायचे झाले तर इलेक्ट्रॉनिक, लेखन, आयटी, बँक आणि फंडिंग या क्षेत्रात या व्यक्ती अधिक प्रगती करतात.
मकर राशीच्या व्यक्तींना दुसऱ्यांवर हुकूम गाजवणं अत्यंत आवडतं आणि कोणताही अन्याय सहन करणं या व्यक्तींना जमत नाही. समोरच्या व्यक्तींना कितीही वाईट वाटलं तरी तोंडावर बोलून या व्यक्ती मोकळ्या होतात. कोणाच्याही मागून बोलणं या व्यक्तींना आवडत नाही.
आपल्या वयाचा कधीही थांगपत्ता लागू न देणं हे या व्यक्तींचे वैशिष्ट्य आहे. नेहमी तरूण राहणे आणि तसंच दिसण्याचा प्रयत्न करणे यांना आवडते. या व्यक्तींचे व्यक्तिमत्व चार्मिंग असते आपल्याला हवं त्या गोष्टीपर्यंत पोहोचायचे असेल तर त्यासाठी रस्ता या व्यक्ती शोधून काढतातच. या व्यक्तींचा मूड नसेल तर त्यासाठी चित्रपट पाहणे हा यांचा हमखास विरंगुळा आहे. या व्यक्तींना जेव्हा आपण आयुष्यात हरलो आहोत अथवा आता काहीही होणार नाही असं वाटतं तेव्हाही यांच्यासाठी चित्रपट हाच पर्याय असतो. कोणत्याही चिंतेपासून सुटका मिळविण्यासाठी चित्रपटातून आनंद घेणे हा पर्याय या व्यक्ती निवडतात.
प्रेमात टाईमपासला नसतो थारा
मकर राशींच्या व्यक्तींसाठी प्रेम ही एक गरज असते. या व्यक्ती थोड्या विचित्र स्वभावाच्या असतात. आपल्यापेक्षा मोठ्या अथवा अगदी लहान व्यक्तींमध्ये या व्यक्तींना रस असतो. कोणत्या चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात तर अडकून नाही ना पडणार याची चिंता या व्यक्तींना असते. आपला मिस्टर परफेक्ट अथवा मिस राईट मिळवायला या व्यक्तींना खूप वेळ लागतो परफेक्ट मॅचबाबत सांगायचं झालं तर मकर राशीच्या व्यक्तीसाठी कन्या राशीच्या व्यक्ती योग्य ठरतात. कारण या दोन्ही पृथ्वी तत्वाच्या राशी आहेत. त्यामुळे या दोन्ही राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात आणि वागण्याबोलण्यात समानता असते.
या दोन्ही राशीच्या व्यक्ती अत्यंत जबाबदार असतात. त्यामुळे कोणत्याही समस्येवर एकत्र बसून तोडगा काढू शकतात. भावनिक, रोमँटिक आणि व्यावहारिक या तिन्ही गोष्टींमध्ये यांचा एकमेकांवर विश्वास असतो. तसंच आपल्या चंचल गोष्टींमुळे या व्यक्ती एकमेकांना अत्यंत चांगली साथ देतात या व्यक्तींचे मन जिंकून घेणे थोडे कठीण आहे. पण या व्यक्ती अत्यंत समजूतदार आणि प्रामाणिक असतात. प्रेम म्हणजे यांच्यासाठी लग्न. कोणाच्याही मनाशी खेळणे या व्यक्तींना जमत नाही. प्रेम म्हणजे खेळ अथवा टाईमपास हा शब्द यांच्याकडे नाही.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)