Shani Dev: मार्च महिन्यात शनिच्या साडेसातीपासून ‘या’ राशींची होणार सुटका! तर ‘या’ राशींची वाढणार डोकेदुखी
Shani Dev: ज्योतिषशास्त्रानुसार, मार्च महिन्यात शनिचं मोठं संक्रमण होणार असल्यामुळे काही राशींची साडेसाती संपणार आहे तर काही राशींना त्रास होणार आहे. आता या राशी कोणत्या चला जाणून घेऊया...

असे म्हटले जाते की शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत, जे प्रत्येक जीवाला त्यांच्या कर्मानुसार योग्य फळ देतात. धार्मिक विद्वानांच्या मते, ज्याच्यावर ते प्रसन्न होतात, त्याचे भाग्य उजळायला वेळ लागत नाही. दुसरीकडे शनीची अशुभ सावली एखाद्यावर पडली तर त्याचे कोणतेही काम यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे शनी देवाचे संक्रमण हे सर्वात महत्त्वाचे ठरते. शनिदेवाला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी जवळपास अडीच वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळे मार्च महिन्यात शनीचे होणारे संक्रमण कोणत्या राशींसाठी चांगले आहे आणि कोणत्या राशींसाठी डोकेदुखी ठरणार चला जाणून घेऊया…
ज्योतिषशास्त्रानुसार शनी सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी, कुंभल राशीमध्ये आहे. मार्च महिन्याच्या शेवटी शनी मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तसेच या राशीमधील शनी हा वक्री असेल. त्यामुळे २०२५ या वर्षात शनी देवाचे स्थान दोन वेळा बदलणार आहे. शनिदेव मीन राशीत प्रवेश करताच काही राशींवर शनीची साडेसाती आणि ढैय्या सुरू होणार आहे. तर काही राशींवर साडेसाती आणि ढैय्याचा प्रभाव संपणार आहे.
कोणत्या राशींची साडेसाती संपणार?




ज्योतिषशास्त्रानुसार, मीन, कुंभ आणि मकर या तीन राशींच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव आहे. हा प्रभाव जवळपास साडेसात वर्ष टिकतो. त्यामध्ये अडीच वर्षांचे तीन चरण असतात. मात्र, आता शनी मार्च महिन्यात गुरुच्या मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा मकर राशींच्या लोकांवरील साडेसातीचा प्रभाव पूर्णपणे संपुष्टात येईल. त्याचवेळी मीन राशीच्या लोकांसाठी शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु होईल. कुंभ राशीच्या लोकांच्या शनीच्या साडेसातीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा सुरु होईल. जेव्हा शनि मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवरील ढैय्याचा प्रभाव पूर्णपणे संपेल.
वाचा: सावधान! होळीनंतर ‘या’ ३ राशींचे होणार नुकसान, राहू-केतू भारी पडणार
या राशींची सुरु होणार साडेसाती
शनी मीन राशीत प्रवेश करताच काही राशींची साडेसाती सुरु होणार आहे. शनिच्या या संक्रमणामुळे सिंह आणि धनु राशीच्या लोकांसाठी ढैय्या सुरु होईल. कुंभ, मीन आणि मेष राशीच्या लोकांवर शनिच्या साडेसातीचा प्रभाव राहणार आहे. साडेसाती सुरु झालेल्या राशींचे जीवन कष्टमय होणार आहे. वेळीच जाणूनबुजून किंवा नकळत झालेल्या चुकांची शिक्षा शनिदेव सतत देत असते.
साडेसातीच्या काळात शनिदेवाला प्रश्न करण्याचे उपाय
साडेसाती सुरु असणाऱ्या राशींच्या लोकांनी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय आहेत. त्यामध्ये शनिदेवाची पूजा करावी, गरीब तसेच मजुरांना मदत करावी, पिंपळाच्या झाडाची पूजा करावी, भगवान शिव आणि हनुमानजींची पूजा करावी.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)