Baba Venga Prediction : मानव एकमेकांचा जीव घेणार! बाबा वेंगाची भयानक भविष्यवाणी, जाणून घ्या कधी घडणार?
Baba Venga Prediction : प्रसिद्ध भविष्यवक्त बाबा वेंगा यांचे आतापर्यंतचे प्रत्येक भाकीत हे खरे ठरले आहे. त्यांनी मानवाविषयी जे भाकीत केले आहे ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

बल्गेरियन भविष्यवक्ता बाबा वांगा यांनी भयानक भाकीत केले आहे. हे भाकीत ऐकल्यावर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. बाबा वेंगा यांच्या मते, मानव लवकरच एकमेकांचा जीव घेणार आहेत. आता नेमकं असं काय घडणार आहे की मानव एकमेकांचा जीव घेणार आहेत. तसेच हे कधी घडणार? चला जाणून घेऊया…
बाबा वेंगा यांचे पूर्ण नाव वेंगालिया पांडेवा दिमित्रोवा आहे. त्यांचा जन्म 1911 मध्ये झाला. त्यांना पश्चिमेकडील बाल्कन नॉस्ट्राडेमस देखील मानले जाते. असा दावा केला जातो की बाबा वेगाने बालपणी एका अपघातात तिची दृष्टी गमावली, त्यानंतर तिला भविष्य पाहण्याची क्षमता मिळाली. बाबा वेंगाची अनेक भाकीते बऱ्याच प्रमाणात खरी ठरली आहेत. बाबा वेंगाच्या भाकितांमध्ये 9/11 हल्ला, कुर्स्क पाणबुडी दुर्घटना, बराक ओबामा यांचे राष्ट्राध्यक्ष होणे आणि इंदिरा गांधी यांची हत्या यांचा समावेश आहे. आता त्यांनी मानवाविषयी आणखी काही भाकीत केले आहे.
वाचा: बेडरुममध्ये पाण्याची बॉटल का ठेवू नये?; वैवाहिक जीवनात…
काय आहे भाकीत?
जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मर्यादित प्रमाणात अस्तित्वात आहेत. जसे तेल, खनिजे, पाणी. त्याची कमतरता देखील लक्षात येत आहे. या सर्व गोष्टी मानवांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या मते, ३८०५ मध्ये मानव एकमेकांना मारायला सुरुवात करणार आहेत. जर आपण बाबा वेंगावर विश्वास ठेवला तर आजपासून १७८० वर्षांनंतर मानव आपल्या संसाधनांच्या पूर्ततेसाठी लढायला सुरुवात करतील, ज्यामुळे संपूर्ण जगात युद्ध सुरू होईल. मानवी लोकसंख्या कमी होऊ लागेल.
बाबा वेंगाच्या भाकितांमागे कोणतेही वैज्ञानिक तथ्य नाही. तथापि, सध्याची परिस्थिती पाहता असे म्हणता येईल की येणाऱ्या काळात मानव आपल्या संसाधनांच्या पूर्ततेसाठी युद्धे लढतील. उदाहरणार्थ, आजही अनेक ठिकाणी युद्ध चालू आहे.
बाबा वेंगा यांची येत्या काळावरील भाकीते
-बाबा वेंगाने येत्या काळात अनेक देशांवर संकट येणार असल्याचे भाकीत केले आहे. आता त्या नेमकं काय म्हणाल्या चला जाणून घेऊया…
-2025 मध्ये युरोप वेगवेगळ्या भागात विभागला जाईल.
-2028 मध्ये एका नवीन शक्तीचा जन्म होईल. जगभरात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल. मानव शुक्र ग्रहावर जाण्याचा प्रयत्न करतील.
-2033 मध्ये हवामान बदलामुळे समुद्राची पातळी वाढण्यास सुरुवात होईल. अनेक देश बुडायला लागतील.
-2043 मध्ये इस्लाम युरोपच्या बहुतेक भागांवर राज्य करेल.
-2046 मध्ये कृत्रिम मानवी अवयवांचे उत्पादन वेगाने वाढण्यास सुरुवात होईल.
-2066 मध्ये अमेरिका असे शस्त्र विकसित करेल ज्यामध्ये वातावरण नष्ट करण्याची क्षमता असेल.
-2088 मध्ये एक अज्ञात विषाणू पृथ्वीवर पसरेल, ज्यामुळे मानव जलद वृद्ध होऊ लागतील