Baba Vanga Prediction : ‘तो’ क्षण लवकरच येणार; बाबा वेंगा यांच्या नव्या भाकीतानं खळबळ, युद्धाबाबत काय म्हणाल्या?
बाबा वेंगा या एक जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्या होत्या, त्यांचा जन्म बग्लेरियामध्ये झाला. त्यांनी आपल्या हयातीमध्ये अनेक भाकीतं केली आहेत, त्यातील काही भाकीत खरी ठरल्याचा दावा केला जातो.

प्रत्येकाला आपलं भविष्य जाणून घेण्याची मोठी उत्सुकता असते, आपल्या आयुष्यात पुढे काय घटना घडणार आहेत? आपलं भविष्य कसं असणार आहे, हे जाणून घेण्याचं कुतूहल प्रत्येक माणसात असल्याचं दिसून येतं. त्यासाठी आपण एखाद्या भविष्यवेत्त्याकडे जातो, तो आपलं भाकीत सांगतो. मात्र ते खरं ठरेलच असं कोणीही सांगू शकत नाही. जेव्हा -जेव्हा जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्यांची चर्चा होते, त्यामध्ये बाबा वेंगा यांचं नाव सर्वात आधी घेतलं जातं. बाबा वेंगा यांचा जन्म बल्गेरियामध्ये झाला होता. त्यांनी आपल्या हयातीमध्ये अनेक भाकीत केली, त्यातील काही गोष्टी खऱ्या ठरल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येतो.
दरम्यान आता बाबा वेंगा यांचं आणखी एक भाकीत समोर आलं आहे. त्यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. 4509 सालापर्यंत माणूस हा देवाशी संवाद साधू शकेल असं त्यांनी म्हटलं आहे. बाबा वेंगा यांचं हे भाकीत ऐकायला विचित्र वाटतं, मात्र त्याचा आता असाही अर्थ लावला जात आहे की, 4509 मध्ये एआय तंत्रज्ञान आणि अवकाश तंत्रज्ञान एवढं विकसित होऊ शकतं की आपण, दुसऱ्या ग्रहावरील लोकांशी किंवा एलियनशी संवाद साधू शकू.
कोण होत्या बाबा वेंगा?
बाबा वेंगा या एक जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्या होत्या, त्यांचा जन्म बग्लेरियामध्ये झाला. बाबा वेंगा यांचा जन्म 19011 साली झाला तर मृत्यू 1996 साली झाला. त्यांच्या संदर्भात असा दावा केला जातो की एका वादळात सापडल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गमावली होती, त्यानंतर त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली. त्यांनी आपल्या हयातीमध्ये ज्या भविष्यवाणी केल्या होत्या त्यातील काही भाकीतं ही खरी ठरल्याचा दावा केला जातो. त्यामध्ये हिटलरचा मृत्यू, इंग्लंडच्या राणीचा मृत्यू, जपामध्ये आलेलं त्सुनामी संकट, अमेरिकेवर झालेला हल्ला यासंदर्भात बाबा वेंगा यांनी भाकीत केलं होतं.
दरम्यान बाबा वेंगा यांनी 2025 संदर्भात देखील मोठी भविष्यवाणी केली आहे.2025 पासून जगाच्या अंताला सुरुवात होईल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. यावर्षी मोठे भूकंप होतील, याचा मोठा फटका अनेक देशांना बसेल, काही देशांमध्ये महापूर येतील, मोठं युद्ध होईल, या युद्धाचा सर्वाधिक फटका हा पश्चिमेकडील देशांना बसेल असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)