Baba Vanga predicts : भारताच्या शत्रू देशाबाबत बाबा वेंगा यांचं सर्वात मोठं भाकीत समोर; टेन्शन वाढलं, 2025 मध्ये काय घडणार?
बाबा वेंगा यांना संपूर्ण जग ओळखते, त्या एक जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्या होत्या. आता त्यांची आणखी एक मोठी भविष्यवाणी समोर आली आहे, त्यांनी भारताच्या शत्रू राष्ट्राबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे.

बाबा वेंगा यांना संपूर्ण जग ओळखते, त्या एक जगप्रसिद्ध भविष्यवेत्त्या होत्या. ज्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी अनेक भविष्यवाणी केल्या, त्या आता खऱ्या ठरत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळेच जग त्यांना महान भविष्यवेत्ता म्हणून ओळखतं. त्यांनी केलेली अनेक भाकीतं आज खरी ठरत असल्याचा दावा केला जात आहे. बाबा वेंगा यांनी 2025 बाबत देखील मोठं भाकीत केलं आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की बाबा वेंगा यांनी 2025 बाबत जे काही भाकीत वर्तवलं होतं, ते आता खरं होताना दिसत आहे.
थायलंड आणि म्यानमारमध्ये मोठा भूकंप झाला, या भूकंपाबाबत बाबा वेंगा यांनी आधीच भाकीत केलं होतं, असा दावा करण्यात येत आहे. त्यांनी अनेक वर्षांपूर्वी यासंदर्भात इशारा दिला होता. त्यांनी वर्तवलेलं भाकीत आता खरं ठरत आहे. यापूर्वी देखील त्यांनी काही भाकीतं वर्तवली होती, ती खरी ठरली आहेत, ज्यामध्ये अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेला हल्ला, प्रिन्सेस डायना यांचा मृत्यू,चीनची वाढत जाणारी ताकत याबाबत त्यांनी भविष्यवाणी केली होती.
बाबा वेंगा यांनी 2025 बाबत अंगाचा थरकाप उडवणारं भाकीत केलं आहे. या वर्षी जगभरात अनेक ठिकाणी मोठे भूकंप होतील. हे भूकंप एवढे विनाशकारी असतील की त्यामुळे शहरच्या शहर उद्धवस्त होतील असं बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे. पुढे त्यांनी असं देखील म्हटलं आहे की, 2025 मध्ये युरोपीयन राष्ट्रांमध्ये मोठं युद्ध होईल, अणू युद्ध देखील होऊ शकतं. याचा फटका हा पश्चिमेकडील राष्ट्रांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे. या वर्षी आणखी एखाद्या महामारीचा सामना करावा लागू शकतो असंही बाबा वेंगा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान बाबा वेंगा यांनी चीनबद्दल देखील मोठी भविष्यवाणी केली आहे.चीनची ताकद वाढत जाईल असं त्यांनी म्हटलं आहे.तसेच युरोपीयन राष्ट्रांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागू शकतो, असंही भाकीत त्यांनी वर्तवलेलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)