Capricorn Traits : अत्यंत प्रामाणिक असतात मकर राशीचे लोकं, जीवनात अशा प्रकारे घेतात निर्णय
या राशीचा स्वामी शनि आहे आणि त्याच्या कृपेने हे लोकं जीवनात भरपूर यश मिळवतात. मकर राशीचे लोकं मेहनती, समर्पित आणि निष्ठावान असतात. त्यांचा शासक ग्रह शनि आहे, ज्यामुळे ते अतिशय शिस्तप्रिय असतात.
मुंबई : प्रत्येक राशीची स्वतःचे स्वःचे गुण आणि दोष असतात. प्रत्येक व्यक्ती त्याच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. मकर राशी (Capricorn Traits) सर्व राशींमध्ये सर्वात दृढ आणि महत्वाकांक्षी आहेत. या राशीचा स्वामी शनि आहे आणि त्याच्या कृपेने हे लोकं जीवनात भरपूर यश मिळवतात. मकर राशीचे लोकं मेहनती, समर्पित आणि निष्ठावान असतात. त्यांचा शासक ग्रह शनि आहे, ज्यामुळे ते अतिशय शिस्तप्रिय असतात. या राशीचे लोकं जे काम निवडतात त्यात शीर्षस्थानी पोहोचतात. आपल्या कार्यक्षेत्रात अत्यंत सावधगिरीने आणि निर्धाराने पुढे जातात. या राशीचे लोक पैसे आणि व्यवसायाच्या बाबतीत खूप सावध असतात. मात्र, गुणवत्तेसोबतच त्यात काही उणिवाही आहेत. मकर राशीबद्दल सर्व काही जाणून घेऊया.
मकर राशीचे लोक खोल विचाराचे असतात. हे लोक पैसे आणि व्यवसायाच्या बाबतीत खूप सावध असतात. मकर राशीचे लोक एकाच वेळी अनेक कामे करण्यात पटाईत असतात. त्यांची स्मरणशक्ती अतिशय तीक्ष्ण असते. हे लोकं व्यवस्थित जीवन जगतात. मकर राशीचे लोकं कामाच्या ठिकाणी कधीही कमी पगाराची पदे स्वीकारत नाहीत. मकर राशीचे लोकं प्रगती आणि यश मिळविण्यासाठी उत्सुक असतात.
असा असतो स्वभाव
या राशीच्या लोकांमध्ये संघटनात्मक क्षमता चांगली असते. हे लोकं कामात खूप उत्साही आणि समर्पित असतात. या राशीचे लोकं स्वभावाने शिस्तप्रिय, जबाबदार आणि व्यावहारिक असतात. या लोकांमध्ये आश्चर्यकारक तार्किक क्षमता असते. हे लोकं विश्वासार्ह मित्र असल्याचे सिद्ध होतात. ते इतरांच्या संकटात पूर्ण साथ देतात. त्यांच्यात तत्त्वज्ञानाची जाण अधिक आहे.
या राशीचे दोषही आहेत
मकर राशीचे लोकं आपला स्वार्थ पुढे ठेवतात. आपल्या स्वार्थासाठी हे लोकं कधी कधी इतरांचेही नुकसान करतात. मकर राशीचे लोकं खूप हट्टी असतात आणि ते इतरांचे ऐकण्याऐवजी स्वतःचं बोलणं पसंत करतात. स्वभावाने, हे खूप भावनिक असतात आणि अनेकदा फसवणूक झाल्यावर कोलमडून जातात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)