5 नोव्हेंबरनंतर ‘या’ राशींचं नशिब पालटणार, पैशांच्या सर्व अडचणी दूर होणार, मानसिक समाधान मिळणार

ज्योतिषांच्या माहितीनुसार, कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथी अनेकांसाठी खूप फायदेशीर आहे. या शूभ तिथीला चंद्र देव राशी परिवर्तन करणार आहेत. यामुळे 2 राशींच्या व्यक्तींना विशेष लाभ होणार आहे.

5 नोव्हेंबरनंतर 'या' राशींचं नशिब पालटणार, पैशांच्या सर्व अडचणी दूर होणार, मानसिक समाधान मिळणार
5 नोव्हेंबरनंतर 'या' राशींचं नशिब पालटणार, पैशांच्या सर्व अडचणी दूर होणार
Follow us
| Updated on: Nov 04, 2024 | 5:38 PM

प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते. कार्तिक महिन्यात विनायक चतुर्थी ही 5 नोव्हेंबरला आहे. या दिवशी गणेशाची म्हणजेच गणपती बाप्पाची पूजा केली जाते. यासोबतच चतुर्थीचा उपवास केला जातो. श्रीगणेशाची पूजा केल्याने आपल्या धन आणि बलमध्ये चांगली वाढ होते. याचबरोबर मानसिक आणि शारीरिक कष्टांपासून मुक्ति मिळते. ज्योतिषांच्या माहितीनुसार, कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथी अनेकांसाठी खूप फायदेशीर आहे. या शूभ तिथीला चंद्र देव राशी परिवर्तन करणार आहेत. यामुळे 2 राशींच्या व्यक्तींना विशेष लाभ होणार आहे.

चंद्र राशी परिवर्तन

ज्योतिष शास्त्रानुसार, कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थी तिथीला चंद्रदेव राशी परिवर्तन करणार आहे. या शूभ तिथीला चंद्रदेव सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी वृश्चिक राशीतून निघून धनू राशीत प्रवेश करणार आहेत. या राशीत चंद्रदेव दोन दिवस राहणार आहेत. त्यानंतर धनू राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करणार आहेत.

वृश्चिक राशी

चंद्रदेवाच्या राशी परिवर्तनाने वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सर्वाधिक लाभ होणार आहे. या राशीचा स्वामी मंगळ देव आहे आणि आराध्य हनुमान आहे. हनुमानाची पूजा केल्याने कुंडलीत मंगळ ग्रह मजबूत होतो. त्यासोबतच शनि दोष देखील दूर होतो. ज्योतिष देखील शनि दोषापासून बचाव करण्यासाठी हनुमानाची पूजा करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे प्रत्येतक मंगळवार आणि शनिवारी हनुमानाची पूजा केली जाते. मंगळवारच्याच दिवशी चंद्रदेव राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे वृश्चिक राशीच्या प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींना चांगला लाभ मिळणार आहे. चंद्रदेवाच्या आशीर्वादाने मानसिक ताणातून मुक्तता मिळणार आहे. शूभ कार्यांमध्ये यश मिळणार आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आपल्या रागाव ताबा घेतला तर बिघडलेले कामदेखील मार्गी लागणार आहेत.

हे सुद्धा वाचा

कुंभ राशी

चंद्र देवाच्या राशी परिवर्तनाने कुंभ राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या व्यक्तींवर चंद्रदेवाची चांगली कृपा होणार आहे. चंद्रदेवाच्या कृपेमुळे कुंभ राशीच्या नागरिकांना मानसिक तणावातून शांतता मिळणार आहे. यासोबतच करियर आणि उद्योगात प्रगती होणार आहे. यामुळे न होणारी कामे देखील होणार आहेत. विशेष म्हणजे पैशांच्या गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ आहे. पण अर्थात पैशांची गुंतवणूक करण्याआधी घरातील ज्येष्ठांचा सल्ला नक्की घ्या. चंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी सोमवार आणि शुक्रवारी गायच्या कच्च्या दुधाने भगवान शिवाला अभिषेक करा. यासोबतच कार्तिक पोर्णिमापर्यंत संध्याकाळी चंद्रदेवाची उपासना करा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'.
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले...
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले....
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त.
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र.
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले....
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले.....
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?.
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र.
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?.