Diwali 2021 | दिवाळीला चतुर्ग्रही संयोग, या 5 राशींवर असेल देवी लक्ष्मीची विशेष कृपा

दिवाळी हा सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला साजरा केला जातो. या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते. देवी लक्ष्मी ही संपत्तीची देवी मानली जाते. असे मानले जाते की जो कोणी त्यांची श्रद्धेने आणि भक्तिभावाने पूजा आणि ध्यान करतो, देवी त्यांच्यावर नक्कीच कृपा करते. त्या कुटुंबात धन-धान्याची कमतरता नसते.

Diwali 2021 | दिवाळीला चतुर्ग्रही संयोग, या 5 राशींवर असेल देवी लक्ष्मीची विशेष कृपा
Zodiac-Signs
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 2:28 PM

मुंबई : दिवाळी हा सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला साजरा केला जातो. या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते. देवी लक्ष्मी ही संपत्तीची देवी मानली जाते. असे मानले जाते की जो कोणी त्यांची श्रद्धेने आणि भक्तिभावाने पूजा आणि ध्यान करतो, देवी त्यांच्यावर नक्कीच कृपा करते. त्या कुटुंबात धन-धान्याची कमतरता नसते.

ही दिवाळी आणखी खास असणार आहे. यावेळी दिवाळीच्या दिवशी चार ग्रहांच्या संयोगामुळे चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. दिवाळीच्या दिवशी सूर्य, बुध, मंगळ आणि चंद्र तूळ राशीत एकत्र असतील. यामुळे ही दिवाळी सर्व राशींसाठी अतिशय शुभ राहील.

मिथुन

मिथुन राशीच्या पाचव्या घरात चतुर्ग्रही योग राहील. मिथुन राशीच्या लोकांसाठी ही स्थिती खूप फायदेशीर ठरेल. या दरम्यान बौद्धिक विकास होईल आणि करिअरमध्ये नवीन उंची गाठण्याची शक्यता आहे. हा चतुर्ग्रही योग शैक्षणिक क्षेत्राशी निगडित लोकांसाठी अधिक लाभदायक ठरेल.

कर्क

कर्क राशीच्या चौथ्या घरात चतुर्ग्रही योग तयार होईल. यातून धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. देवी लक्ष्मीचा तुमच्यावर अपार आशीर्वाद असेल आणि वाहन सुख मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही कुठेतरी गुंतवणूक केली असेल तर आता तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो.

कन्या

तुमच्या दुसऱ्या घरात हा योग तयार होत आहे, अशा स्थितीत मान-प्रतिष्ठा वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. करिअर संदर्भात काही चांगली बातमी मिळू शकते. तुमचा आवाज अधिक प्रभावी होईल.

धनु

धनु राशीच्या अकराव्या घरात हा योग तयार होईल. अशा स्थितीत गुंतवणुकीत भरपूर नफा अपेक्षित आहे. तुम्ही कोणत्याही व्यवसायाशी संबंधित असाल तर चांगला नफा मिळण्याची चिन्हे आहेत. या दिवाळीत तरुणांना त्यांच्या मोठ्यांकडून अनेक सरप्राईज आणि भेटवस्तू मिळू शकतात.

मकर

मकर राशीच्या दहाव्या घरात चार ग्रहांचा संयोग असेल. नोकरी करणाऱ्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. करिअरमधील अडथळे दूर होतील. तुम्हाला कोणताही व्यवसाय सुरु करायचा असेल तर हा काळ त्यासाठी योग्य आहे.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

घर, ऑफिस, समारंभ; भेटतील तिथे गॉसिप, 3 लोकांच्या राशींपासून 2 हात लांबच रहा!

3 राशींच्या लोकांच्या क्रिएटिव्हिटीला नसतो अंत, जाणून घ्या तुमची रास यामध्ये आहे का?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.