तूळ राशीत 5 मे 2023 रोजी छायाकल्प चंद्रग्रहण; राशींवरील परिणाम, सूतक कालावधी आणि ग्रहण काळाबात जाणून घ्या
चंद्रग्रहण ही खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात त्याचं खूप महत्त्व आहे. कारण ग्रहणाचा राशीचक्रातील 12 राशींवर परिणाम दिसून येतो
मुंबई : ग्रहण ही खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात याला महत्त्व आहे. सूर्यग्रहणानंतर या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण 5 मे 2023 रोजी लागणार आहे. या दिवशी शुक्रवार असून चंद्र तूळ राशीत असणार आहे. या राशीत केतु ग्रह दीड वर्षांसाठी असून ग्रहण योग जुळून येणार आहे. वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिलं तर, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी सरळ रेषेत आली की, चंद्रग्रहण होते. पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. यामुळे खग्रास, खंडग्रास किंवा छायाकल्प चंद्रग्रहण दिसून येते. पण हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे सूचक काळ मान्य नसेल. पण या स्थितीचा राशीचक्रातील 12 राशींवर परिणाम दिसून येईल.
चंद्रग्रहणाचा कालावधी
5 मे 2023 रोजी शुक्रवारी रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी चंद्रग्रहण सुरु होईल. तसेच हे ग्रहण रात्री 1 वाजता संपेल. हे छायाकल्प चंद्रग्रहण आहे. या दिवशी वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा आहे. चंद्र ग्रहणाचा सूतक कालावधी 9 तासांपूर्वी सुरु होतो. मात्र ग्रहण भारतातून दिसणार नसल्याने सूतक कालावधी पाळण्याची आवश्यकता नाही. चंद्रग्रहण युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अंटार्टिका येथून दिसेल.
या राशींवर होईल परिणाम
मेष : चंद्रग्रहणात या राशीच्या जातकांनी काळजी घ्यावी. या काळात एखादा चुकीचा निर्णय महागात पडू शकतो. त्याचा दुरोगामी परिणाम आर्थिक स्थितीवर होईल. मानसिक स्थिती कमकुवत होईल. तसेच कायद्याच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
वृषभ : चंद्रग्रहणाच्या दरम्यान सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. या काळात भांडणासारखी स्थिती निर्माण होईल. कुटुंबात तणावपूर्ण स्थिती असेल. काही चिंता तुम्हाला अस्वस्थ करून सोडतील. त्यामुळे या काळात काळजी घ्या.
कर्क : या राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे. त्यामुळे ग्रहणाचा या राशीवर परिणाम दिसून येईल. आरोग्यविषयक तक्रारी डोकं वर काढतील. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून त्रास होऊ शकतो. त्यामुळे या काळात भगवान शिवाचा जप करा.
सिंह : या राशीच्या जातकांवरही चंद्रग्रहणांचा परिणाम दिसून येईल. काही वाईट बातमी कानावर पडल्याने अस्वस्थता वाढेल. दुसरीकडे कुटुंबाची काळजी घेणं गरजेचं आहे. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. कारण तुम्हाला याचा फटका बसू शकतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)