वास्तुशास्त्रानुसार सजवा तुमचा ड्रॉईंग रुम; नियमांकडे दुर्लक्ष केल्यास होऊ शकतो त्रास

ड्रॉईंग रूममधील खिडक्या आणि काचा हलक्या रंगाच्या असाव्यात. शक्य असल्यास काचा पूर्णत: पारदर्शक ठेवा, जेणेकरून बाहेरून पुरेसा प्रकाश आत येऊ शकेल.

वास्तुशास्त्रानुसार सजवा तुमचा ड्रॉईंग रुम; नियमांकडे दुर्लक्ष केल्यास होऊ शकतो त्रास
वास्तुशास्त्रानुसार सजवा तुमचा ड्रॉईंग रुम
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 8:51 AM

मुंबई : ड्रॉईंग रूम ही अशी एक जागा असते, जिथे केवळ घरातील सदस्य एकत्र जमून आनंद अनुभवतात असे नाही, तर प्रत्येक पाहुण्यांच्या पाहुणचाराचे देखील हेच मुख्य ठिकाण असते. वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही या खोलीला विशेष महत्त्व आहे. कोणत्याही घरातील ड्रॉईंग रूम हे त्या घराचे सौंदर्य असते. म्हणून प्रत्येकजण आपल्या घरातील ड्रॉईंग रुम मोठ्या उत्साहाने सजवतो. परंतु या सजावटीमध्ये आपण अनेकदा त्या वास्तू नियमांकडे दुर्लक्ष करतो. त्याचा आपल्या कुटुंबियांवर तसेच घरात येणाऱ्या पाहुणे मंडळींच्या संबंधांवर वाईट परिणाम होतो. (Decorate your living room with architecture; Ignoring the rules can cause trouble)

1. सर्वप्रथम ड्रॉईंग रूम नेहमी घर किंवा फ्लॅटच्या मुख्य दरवाजाजवळ खुला आणि हवेशीर असावा.

2. ड्रॉईंग रूममधील खिडक्या आणि काचा हलक्या रंगाच्या असाव्यात. शक्य असल्यास काचा पूर्णत: पारदर्शक ठेवा, जेणेकरून बाहेरून पुरेसा प्रकाश आत येऊ शकेल.

3. ड्रॉईंग रूमच्या भिंतींचा रंग नेहमी हलका असावा. जो पाहून तुम्हालाच नव्हे तर तुमच्या जागी येणारे पाहुणेही खूश होतील.

4. ड्रॉईंग रूममध्ये काटेरी तसेच प्लास्टिकची झाडे कधीही लावू नयेत. ड्रॉईंग रूममध्ये नेहमी ताज्या फुलांचे पुष्पगुच्छ ठेवा. ते सुकल्यानंतर लगेच काढून टाका.

5. ड्रॉईंग रूममध्ये गडद रंगाने रंगरंगोटी करणे नेहमीच टाळावे, कारण हे रंग तुम्हाला काही दिवस चांगले दिसू शकतात, परंतु काही काळानंतर ते तुम्हाला नाउमेद करू लागतात.

6. ड्रॉईंग रूममध्ये सोफा, दिवाण, शोकेस इत्यादी वस्तू नेहमी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवा.

7. ड्रॉईंग रूममध्ये टीव्ही, म्युझिक सिस्टीम यांसारख्या मनोरंजनाच्या वस्तू नेहमी आग्नेय दिशेला ठेवाव्यात.

8. ड्रॉईंग रूममध्ये उन्हाळ्यासाठी बसवलेला एसी वायव्य दिशेला ठेवावा. तसेच हिवाळ्यात हीटरचा वापर आग्नेय दिशेला केला पाहिजे.

9. ड्रॉईंग रूममध्ये फिश पॉट ठेवणे शुभ मानले जाते. फिश पॉट दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवा आणि त्यात लाल रंगाचे आठ, सोनेरी रंगाचा एक आणि काळा रंगाचा एक मासा ठेवा.

10. तुम्ही ड्रॉईंग रूममध्ये प्रवेश करताच मुख्य दरवाजासमोरील भिंतीवर तुमच्या कुटुंबाचे हसणारे चित्र लाल रंगाच्या फ्रेममध्ये ठेवा. असे केल्याने तुमची लोकप्रियता वाढेल.

11. कुटुंबातील सदस्यांनी ड्रॉईंग रुममध्ये दिवसातील जास्तीत जास्त वेळ घालवावा. असे केल्याने कुटुंबात सौहार्द आणि आपुलकी वाढते.

12. जेव्हा घरात पाहुणा येतो तेव्हा घराच्या मालकाने नेहमी उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून बसावे. याचा पाहुण्यावर सकारात्मक परिणाम होतो. (Decorate your living room with architecture; Ignoring the rules can cause trouble)

इतर बातम्या

“व्वा मोदीजी व्वा ! गॅस महागल्यामुळे नवणीत राणांवर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ” रुपाली चाकणकरांची खोचक टीका

करदात्यांना मोठा दिलासा; या सहा फॉर्म आणि स्टेटमेंटसाठी सरकारने मुदत वाढवली

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.