Devshayani Ekadashi 2021 | देवशयनी एकादशीला आपल्या राशीनुसार हे उपाय करा आणि या मंत्रांनी नारायणाला प्रसन्न करा
हिंदू धर्मग्रंथात 24 एकादशींना विशेष महत्त्व आहे. शास्त्रात एकादशीला पुण्यदायी आणि मोक्षदायी मानले जाते. देवशयनी एकादशी 20 जुलै रोजी आहे. देवशयनी एकादशीच्या दिवशी श्रीहरी क्षीर सागरात योगनिद्रेत जातात. यानंतर कार्तिक महिन्यात देवउठनी एकादशीला ते जागे होतात
मुंबई : हिंदू धर्मग्रंथात 24 एकादशींना विशेष महत्त्व आहे. शास्त्रात एकादशीला पुण्यदायी आणि मोक्षदायी मानले जाते. देवशयनी एकादशी 20 जुलै रोजी आहे. देवशयनी एकादशीच्या दिवशी श्रीहरी क्षीर सागरात योगनिद्रेत जातात. यानंतर कार्तिक महिन्यात देवउठनी एकादशीला ते जागे होतात (Devshayani Ekadashi 2021 Do These Remedies And Chant Those Mantra According To Your Zodiac Signs To Pleased Lord Vishnu).
देवशयनी एकादशी ते देवउठनी एकादशीपर्यंतच्या कालावधीला चातुर्मास म्हणतात. या चार महिन्यांत मांगलिक कामे थांबतात. म्हणूनच देवशयनी आणि देवउठनी एकादशी या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या मानल्या जातात. येथे जाणून घ्या देवशयनी एकादशीचे उपाय आणि असे अचूक मंत्र ज्याने सर्व समस्या दूर होतील
मेष राशी (Aries)
मेष राशीच्या लोकांनी देवशयनी एकादशीच्या दिवशी मोहरीचे तेल दान करावे.
“ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:” या मंत्राचा जप करावा.
वृषभ राशी (Taurus)
कोणताही त्रास होऊ नये म्हणून देवशयनी एकादशीच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी गोठ्यात ज्वारी दान करा.
“ॐ आं संकर्षणाय नम:” या मंत्राचा जप करा.
मिथुन राशी (Gemini)
यावेळी देवशयनी एकादशीच्या दिवशी मिथुन राशीच्या व्यक्तींनी उडीद पीठाचे गोळे तयार करुन ते माशांना द्यावे
“ॐ अं प्रद्युम्नाय नम:” या मंत्राचा जप करतात.
कर्क राशी (Cancer)
कर्क राशीच्या लोकांनी भगवान शिव यांना बेलपत्र अर्पित करावे.
“ॐ अ: अनिरुद्धाय नम:” या मंत्राचा जप करावा.
सिंह राशी (Leo)
सिंह राशीच्या व्यक्तींना देवशयनी एकादशीला भगवतीच्या चरणी 108 गुलाबाचे फूल अर्पण करा.
“ॐ नारायणाय नम:” या मंत्राचा जप करा.
कन्या राशी (Virgo)
वटवृक्षाच्या झाडाला पाणी द्यावे
“ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:”, या मंत्राचा जप करा.
तूळ राशी (Libra)
तुला राशीच्या लोकांनी देवशयनी एकादशीला गरीब मुलींना दूध आणि दही दान करावे.
“ॐ नमो नारायण श्री मन नारायण नारायण हरि हरि”, या मंत्राचा जप करावा.
वृश्चिक राशी (Scorpio)
वृश्चिक राशीच्या व्य़क्तींनी सफाई कामगारांना अख्खी मसूरची डाळ दान करावी, यामुळे त्यांचे सर्व प्रश्न सुटतील.
“श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव”, या मंत्राचा जप करा.
धनु राशी (Sagittarius)
या दिवशी धनू राशीच्या व्यक्तींनी अंध व्यक्तीला अन्न दान करावे आणि कुष्ठरोगींना हरभरा डाळ द्यावी.
“ॐ नारायणाय विद्महे, वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्”, या मंत्राचा जप करा.
मकर राशी (Capricorn)
या राशीच्या व्यक्तींनी एकादशीच्या दिवशी बाजरी पक्षांना द्यावे.
“शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम, लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्”, पूर्ण भक्तिभावाने मंत्रांचा जप करा.
कुंभ राशी (Aquarius)
देवशयनी एकादशीच्या दिवशी कुंभ राशीच्या लोकांनी 8 वेळा स्वत: वरुन 800 ग्रॅम दूध उतरवावे 800 ग्राम उडीद सोबत वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे.
“त्वमेव माता, च पिता त्वमेव, त्वमेव बंधु च सखा त्वमेव, त्वमेव विद्या च द्रविड़म त्वमेव, त्वमेव सर्वम मम देव देव”, मंत्रांचा जप करा.
मीन राशी (Pisces)
या राशीच्या लोकांनी श्रद्धेनुसार मातीच्या भांड्यात शहद भरन ते मंदिरात ठेवावे किंवा निर्जन ठिकाणी पुरावे. हे करताना कोणीही आपल्याला पाहणार नाही याची काळजी घ्या.
“ॐ विष्णवे नम:” या मंत्राचा जप करावा.
Chaturmas 2021 : देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात, जाणून घ्या यामागील कथा आणि नियमhttps://t.co/WxEcqQWbfp#Chaturmas2021 #devshayaniekadashi #LordVishnu
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 19, 2021
Devshayani Ekadashi 2021 Do These Remedies And Chant Those Mantra According To Your Zodiac Signs To Pleased Lord Vishnu
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Chaturmas 2021 | श्री हरिचा आशीर्वाद हवा असेल तर चातुर्मासात चुकूनही ‘ही’ कामे करु नये
गुरुवारच्या दिवशी ही 4 कामं नक्की करा, यशाच्या मार्गात येणारे अडथळे होतील दूर