Friday Astro Tips : शुक्रवारच्या दिवशी अवश्य करा हे उपाय, उघडेल बंद नशीबाचे दार, सुख समृद्धीचे होईल आगमन

आज शुक्रवार (Shukrawar Upay) आहे. हिंदू धर्मात शुक्रवार हा दिवस लक्ष्मीला समर्पित मानला जातो. या दिवशी विधीपूर्वक पूजा करून आणि काही उपाय केल्यास देवी लक्ष्मी आपल्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करते.

Friday Astro Tips : शुक्रवारच्या दिवशी अवश्य करा हे उपाय, उघडेल बंद नशीबाचे दार, सुख समृद्धीचे होईल आगमन
लक्ष्मी Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 08, 2023 | 8:47 AM

मुंबई : आज 8 सप्टेंबर हा श्रावण कृष्ण पक्षातील नवमी तिथी आणि शुक्रवार आहे. नवमी तिथी 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.31 पर्यंत राहील. 8 सप्टेंबर रोजी रात्री 10.06 वाजेपर्यंत सिद्धी योग राहील. आज गोगा नवमीही साजरी होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की गोगा नवमी श्रावण कृष्ण पक्षाच्या नवव्या तिथीला साजरी केली जाते. हा सण प्रामुख्याने राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील काही भागात गोगाजी महाराजांची जयंती म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याशिवाय आज शुक्रवार (Shukrawar Upay) आहे. हिंदू धर्मात शुक्रवार हा दिवस लक्ष्मीला समर्पित मानला जातो. या दिवशी विधीपूर्वक पूजा करून आणि काही उपाय केल्यास देवी लक्ष्मी आपल्या भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करते. चला तर मग जाणून घेऊया  शुक्रवारी करावयाचे खास उपाय.

शुक्रवारी अवश्य करा हे प्रभावी उपाय

  • तुमचे वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी अर्द्रा नक्षत्रात रात्री उशीवर दोन मुळा ठेवा आणि सकाळी उठल्यावर मंदिरात दान करा. ही प्रक्रिया आर्द्रा नक्षत्रापासून सलग 7 दिवस करा. असे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदाचा वर्षाव होईल.
  • जर तुमच्या प्रिय व्यक्तीने तुम्हाला काही महत्त्वाचे काम दिले असेल आणि तुम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असाल, परंतु त्यात तुम्हाला यश मिळत नसेल, तर अर्द्रा नक्षत्रातील देवी सरस्वतीच्या मंदिरात जाऊन आसनावर बसा. आणि मातेची प्रार्थना करा, त्यांची विधिवत पूजा करा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. असे केल्याने तुमचे काम वेळेवर पूर्ण होईल.
  • जर तुम्हाला काही कारणास्तव मानसिक समस्यांचा सामना करावा लागत असेल किंवा काही दिवसांपासून तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल गोंधळात असाल तर या समस्येवर मात करण्यासाठी अर्द्रा नक्षत्रात गळ्यात चंदनाची माळ घाला. तसेच अर्द्रा नक्षत्राच्या वेळी चंदन उगाळून कपाळावर तिलक लावावा. असे केल्याने तुमच्या मानसिक समस्या लवकर दूर होतील.
  • जर तुम्हाला परदेशात नोकरी करायची इच्छा असेल आणि तुम्हाला लवकरात लवकर तिथे स्थायिक व्हायचे असेल तर अर्द्रा नक्षत्रात एक कच्चे नारळ तसेच 11 अख्खे बदाम घ्या. त्यानंतर नारळ आणि बदाम एका काळ्या कपड्यात बांधून वाहत्या पाण्यात विसर्जीत करा. असे केल्याने तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल.
  • जर तुम्ही काही विशेष कामासाठी बाहेर जात असाल आणि तुम्हाला त्या कामात शंभर टक्के यश मिळावे असे वाटत असेल, तर निळ्या रंगाचा धागा घेऊन घरातून बाहेर पडा आणि तुमचे काम झाले असे म्हणत निळ्या रंगाचा दोरा गुलाबाच्या झाडावर बांधा. असे केल्याने तुमचे काम यशस्वी होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढेल.
  • जर तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन सुखी ठेवायचे असेल तर या दिवशी तुम्ही अर्द्रा नक्षत्राचे अधिष्ठाता देवता शिवाची पूजा करावी. या दिवशी तुम्ही शिव मंदिरात जाऊन पाण्यात गंगाजल मिसळून शिवलिंगाला अभिषेक करावा आणि तुमच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी देवाकडे प्रार्थना करावी. अशा प्रकारे भगवान शिवाची पूजा केल्याने तुमचे वैवाहिक जीवन सुखी राहील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.