18 ऑगस्टपासून या तीन राशींचं नशिब पालटणार! शुक्राची स्थिती तयार करणार अनुकूल परिस्थिती
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती राशीचक्रावर परिणाम करत असते. प्रत्येक ग्रह त्या त्या स्थितीनुसार फळ देत असतं. शुक्र ग्रह 18 ऑगस्टपासून वेगळ्या स्थितीत असणार आहे. तीन राशींना याचा लाभ मिळणार आहे.
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाची स्थिती राशीचक्रावर आपला प्रभाव पाडत असते. त्या त्या ग्रहानुसार राशीचक्राचा अभ्यास केला जातो. काही ग्रह अनुकूल तर काही ग्रह प्रतिकूल परिस्थितीत असतात. त्यामुळे प्रत्येक ग्रह राशीचक्रावर वेगवेगळा प्रभाव पाडत असतो. सध्या शुक्र ग्रह कर्क राशीत असून अस्ताला गेलेला आहे. पण 18 ऑगस्टला सकाळी 3 वाजून 20 मिनिटांनी कर्क राशीत उदय होणार आहे. त्यानंतर 2 ऑक्टोबरला कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे तीन राशीच्या जातकांना धनलाभ होऊ शकतो. तसेच नशिबाची चांगली साथ या काळात मिळणार आहे.
या तीन राशीच्या जातकांना मिळणार लाभ
कर्क : शुक्र ग्रहाची स्थिती या राशीच्या जातकांना फलदायी ठरणार आहे. कारण या राशीच्या लग्नभावात शुक्राचा उदय होणार आहे. लग्नभाव हा आत्मविश्वासाशी निगडीत आहे. त्यामुळे एक वेगळाच बदल दिसून येईल. आपल्या प्रतिमेची छाप समोरच्या व्यक्तीवर पडेल. तुमच्या वाणीने समोरची व्यक्तीला भूरळ पडेल. तसेच न होणारी कामंही होतील अशी स्थिती आहे. या कालावधीत एकाग्रता वाढण्यास मदत होईल. वैवाहिक जीवन आनंदात जाईल.
मकर : या राशीच्या सप्तम भावात शुक्र ग्रहाचा उदय होणार आहे. हे स्थान जोडीदार आणि पार्टनरशिपशी निगडीत आहे. त्यामुळे पार्टनरशिपच्या धंद्यात चांगलं यश मिळेल. काही अडचणी असतील तर त्या या काळात दूर होतील. विवाहित लोकांना जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. नातं एकदम घट्ट होईल अशी स्थिती आहे. नशिबाची चांगली साथ या काळात मिळेल. तसेच अडकलेली कामं या काळात पूर्ण होतील.
मीन : या राशीच्या चतुर्थ स्थानात शुक्र उदीत होणार आहे. त्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. भौतिक सुखांची प्राप्ती या काळात होईल. वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदीचा योग जुळून येईल. वडिलोपार्जित जमिनीतून चांगला फायदा मिळू शकतो. जे लोक प्रॉपर्टी, रियल इस्टेटशी निगडीत व्यवसाय करतात त्यांना या काळात चांगला फायदा होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)