Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला जुळून येतोय विशेष योग, या तीन राशीच्या लोकांना प्राप्त होणार बाप्पाचा आशिर्वाद
Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीच्या दिवसापासून या राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. या राशीच्या लोकांनी गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण कराव्या.
मुंबई : हिंदू धर्मात गणपतीला विशेष स्थान आहे. भगवान शिव आणि माता पार्वती यांचा पुत्र गणपती हा समृद्धी आणि सौभाग्याचा देव मानला जातो. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2023) साजरी केली जाते. यंदा गणेश चतुर्थी 19 सप्टेंबरला आहे. पंचांगानुसार यावेळी गणेश चतुर्थीच्या दिवशी शुभ योग तयार होत आहे. हे योग ज्योतिषशास्त्रात अतिशय शुभ मानले जातात. हा शुभ योग तीन राशींसाठी अतिशय शुभ असणार आहे. त्यांना सिद्धिदातेचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे.
या तीन राशीच्या लोकांना मिळणार विशेष फळ
मेष
मेष राशीच्या लोकांना लंबोदरचा आशीर्वाद मिळेल. तुमची सर्व अर्धवट कामे पूर्ण होतील. वैयक्तिक जीवनात आनंद कायम राहील. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाला शेंदूर अर्पण करा. यासाठी त्यांच्या पायाला आणि कपाळावर शेंदूर लावावा. त्यानंतर स्वतःच्या कपाळावर टिळा लावावा. या काळात मेष राशीच्या लोकांना प्रवासातून लाभ मिळणार आहे. बाप्पाच्या कृपेने विवाह इच्छुकांना चांगले स्थळ चालून येईल.
मिथुन
गणेश चतुर्थीच्या दिवसापासून मिथुन राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. या राशीच्या लोकांनी गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण कराव्या. विशेष लाभ मिळेल. बाप्पाच्या कृपेने नोकरी आणि व्यावसायातील अडथळे दूर होतील. आरोग्यातही सुधारणा होईल. बाप्पाच्या कृपेने मोठे गंडांतर टळेल. भागिदारीत नवीन व्यावसाय सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम असेल. अनेक दिवसांपासून आखत असलेल्या योजनांना गती प्राप्त होईल.
मकर
मकर राशीच्या लोकांना गणेश चतुर्थीच्या दिवसापासून मान-प्रतिष्ठा मिळेल. या दिवशी मंदिरात जाऊन गणेशाची पूजा करावी. विघ्नहर्ता तुमचे सर्व दुःख दूर करेल. या काळात तुमचा रखडलेला व्यावसाय पून्हा पूर्ववत सूरू होईल. गणपतीला दूर्वा वाहल्याने तुम्हाला निरोगी आरोग्य लाभेल. ज्या कुटूंबात मतभेद आहेत त्यांच्यात पुन्हा गोडवा निर्माण होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)