Daily Horoscope 13 May 2022, ग्रहमान चांगले, ‘या’ राशींच्या वैवाहिक आयुष्यात राहिल गोडवा, आरोग्याची घ्या काळजी
आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल ? आजचे तारे काय सांगतात. दैनिक राशी भविष्याद्वारे आजचे राशी भविष्य आणि दिवसातील घडामोडीची माहिती जाणून घ्या.
मुंबई : आजचे राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे नाते, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. हे राशीभविष्य (Horoscope) वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकाल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा (Challenge) सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनंदिन राशीभविष्य (Daily Horoscope) वाचून तुम्ही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता.
मेष –
कोणतंही काम करण्याआधी त्याची रूपरेखा आखणं गरजेचं. विपरित स्थिती समोर येईल. तुम्ही तिचा सामना करायला सक्षम असाल. वैयक्तिक संपर्काच्या माध्यमातून काही कामं संपन्न होतील. ग्रहांची स्थिती थोडी विपरित आहे. तुम्ही सकारात्मक राहून ही वेळ पुढे ठकलाल. उच्चशिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना काही कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. मंदी असल्याने कारभारात लाभदायक स्थिती असेल. वर्तमान स्थितीमुळे काही उत्पादनात काही लाभदायक स्थिती निर्माण होईल. उत्पन्नाची स्त्रोत पण स्थिर राहतील. ऑफिस मध्ये सहकार्यांच्या कामाला दुर्लक्ष करू नका.
लव फोकस – नवरा बायकोचे संबंध चांगले राहतील. प्रेमप्रकरणात वातावरण चांगले राहिल.
खबरदारी – एलर्जी आणि सर्दी, खोकल्याची समस्या होईल. बदलल्या वातावरणात स्वत: ची काळजी घ्या
शुभ रंग – हिरवा
भाग्यवान अक्षर – न
अनुकूल क्रमांक – 1
वृषभ –
ग्रहस्थिती चांगली आहे. गेल्या काही काळात झालेले गैरसमज दूर झाल्याने संबंधात जवळीक येईल. कोणत्याही महत्वपूर्ण मुद्द्यांत असामंजस्याची स्थिती मित्रांसोबत तयार होईल. जवळच्या मित्रांचे सल्ले घ्या. काही वेळ मित्रांसोबत घालवा. वैयक्तिक कामात व्यस्त झाल्याने तुमची काही महत्वाची कामं वेळेवर पूर्ण होणार नाहीत. यावेळी आळस कमी करा. तुमच्या योजना आणि कामं कोणासमोर जाहिर करू नका. व्यवसायात काम खपू लक्षपूर्वक करावं लागेल. यावेळी वेगवेगळ्या संधी उपलब्ध होतील. त्यांचा योग्य वापर करता आला पाहिजे. पेपर आणि फाईल्स व्यवस्थित आणि पूर्ण ठेवा. चौकशी बसू शकते.
लव फोकस – वैवाहिक जीवनात जवळीक वाढेल. लहान सहान नकारात्मक गोष्टींना दुर्लक्षित करा. प्रेमप्रकरणात भावनिकता वाढेल.
खबरदारी – व्हारल ताप आणि डोके दुखीची स्थिती राहिल. यावेळी आराम करण्याची गरज आहे.
शुभ रंग – लाल
भाग्यवान अक्षर – म
अनुकूल क्रमांक – 6
मिथुन –
ग्रहमान यावेळी जीवनात विशेष परिवर्तन घेऊन येतेय. ही स्थिती तुमच्या आयुष्यात नव्या संधी निर्माण करेल. महत्वाच्या मुद्द्यांवर असमंजसाची परिस्थितीत अनुभवी व्यक्तीसोबत चर्चा करा. नक्कीच तुम्हाला योग्य साथ मिळेल. वैयक्तिक कामांमुळे तुमच्या नातेवाईकांना दुर्लक्षित करू नका. रागवार नियंत्रण ठेवा. राग आणि अहंकारामुळे नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी सहकारी तसंच कर्मचारी याचं पूर्ण सहकार्य मिळेल. कोणतंही काम उद्यावर ठकलू नका. आजचं काम आजच करा. वेळेवर कामं पूर्ण केली तर त्याचे परिणाम चांगले मिळतील. यावेळी नव्या योजनांवर विचार होईल.
लव फोकस – नवरा बायकोचं नातं आनंदी असेल. मित्राला भेटून जुन्या आठवणी ताज्या होतील आणि मन प्रसन्न राहिल.
खबरदारी – स्वास्थ्य उत्तम राहिल. दिनक्रम आणि खाण्या पिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या.
शुभ रंग – आकाशी
भाग्यवान अक्षर – क
अनुकूल क्रमांक – 3