Lal Kitaab : राहु गुरुच्या युतीमुळे चांडाळ योग तयार, जाणून लाल किताबमधील प्रभावी तोडगे

Chandal Yog 2023 : मेष राशीत गुरु ग्रहासोबत राहुची युती झाली आहे. यामुळे चांडाळ योग तयार झाला आहे. यामुळे सध्या बऱ्याचशा लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. चांडाळ योगात लाल किताबमध्ये काही प्रभावी तोडगे सांगण्यात आले आहेत, चला जाणून घेऊयात.

Lal Kitaab : राहु गुरुच्या युतीमुळे चांडाळ योग तयार, जाणून लाल किताबमधील प्रभावी तोडगे
Lal Kitaab : राहु गुरुची युती आणि चांडाळ योगाची स्थिती, लाल किताबमधील उपाय जाणून घ्या
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 12:33 PM

मुंबई : देवगुरू बृहस्पतीने मेष राशीत प्रवेश केल्यानंतर चांडाळ योग तयार झाला आहे. हा योग 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत असणार आहे. त्यानंतर राहु ग्रह मीन राशीत प्रवेश करेल आणि अशुभ योग संपेल. गुरुसोबत राहुची सूर्य, बुधासोबतही झाली आहे. त्यामुळे चांडाळ योग, ग्रहण योग आणि जडत्व योग तयार झाला आहे. ग्रहण योग आणि जडत्व योग महिनाभरासाठी असणार आहे. तर चांडाळ योग जवळपास सहा महिन्यांसाठी असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग सर्वात अशुभ योग मानला जातो. चला जाणून घेऊयात याबाबतच लाल किताबमधील तोडगे

लाल किताबमधील उपाय

गुरु चांडाळ योग असल्याने जातकांने त्याच्या वागण्यात बदल करणं आवश्यक आहे. नेहमी खरं बोलावं आणि वागणं चांगलं ठेवावं. आई वडील आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करावा. गुरुवारी पिवळ्या वस्तूंचं दान करावं, तसेच या दिवशी मिठाचं सेवन करू नका. दररोज घरात धूप दीप लावावा. सकाळी आणि रात्री कापूर जाळावा. गाईला हिरवा चारा द्या. पिंपळ वृक्षाला पाणी, वटवृक्षाला कच्च दूध आणि केळीच्या वृक्षाची पूजा करावी.

दररोज किंवा किमान 43 दिवस कपाळावर केसर, हळद किंवा चंदनाचा टिळा लावावा. तिजोरी किंवा ईशान्य कोपऱ्यात हळदीची गाठ सफेद कपड्यात बांधून ठेवावी.

राशी आणि लाल किताबमधील तोडगे

  • मेष : या राशीच्या प्रथम स्थानात गुरु चांडाळ योग तयार झाला आहे. या राशीच्या जातकांनी गाय आणि स्वच्छता कर्मींची सेवा करावी.
  • वृषभ : या राशीच्या द्वादश स्थानात हा योग तयार झाला आहे. या जातकांनी वाणीवर नियंत्रण ठेवावं. तसेच कमी बोलावं. साधुसंताची सेवा करावी.
  • मिथुन : या राशीच्या एकादश स्थानात हा योग तयार होत आहे. गरीबांना मदत करा आणि नातेवाईकांसोबत संबंध चांगले ठेवा. पिंपळ वृक्षाला जल अर्पण करा.
  • कर्क : या राशीच्या दशम स्थानात हा योग असल्याने मेहनत आणि काम यावर विश्वास ठेवावा. कपाळावर केसरी गंध लावावा.
  • सिंह : या राशीच्या नवम स्थानात हा योग तयार होत आह. रोज मंदिरात जावं. मुठभर तांदूळ वाहत्या पाण्यात सोडावे.
  • कन्या : या राशीच्या अष्टम स्थानात हा योग तयार होत आहे. राहुशी निगडीत गहू, जव वाहत्या पाण्यात प्रवाहीत करा. तूप, बटाटे आणि कापूर मंदिरात दान करा.
  • तूळ : या राशीच्या सप्तम भावात योग तयार होत आहे. या राशीच्या जातकांनी भगवान शिवाची आराधना करावी. पत्नीसोबत चांगले संबंध ठेवावे.
  • वृश्चिक : या राशीच्या षष्ठम भावात योग तयार होत आहे. बहीण, मावशी, आत्या यांच्यासोबत चांगलं वर्तन ठेवावं. कपळावर केसरी गंध लावावा.
  • धनु : या राशीच्या पंचम स्थानात योग तयार होत आहे. मुलांना त्रास होईल असं वागू नका. गुरुवारी गुरु निगडीत वस्तूंचं दान करावं.
  • मकर : या राशीच्या चतुर्थ स्थानात योग तयार होत आहे. बहीण, पत्नी आणि आईच्या आदर करावा. दुधाचं दान करावं.
  • कुंभ : या राशीच्या तिसऱ्या स्थानात हा योग तयार होत आहे. देवी दुर्गेची पूजा करावी. भावा बहिणीसोबत चांगले संबंध ठेवावे.
  • मीन : या राशीच्या दुसऱ्या स्थानात हा योग तयार होत आहे. मंदिरात दूध अर्पण करावं. देवी लक्ष्मीची पूजा करावी.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.