Guru Dosh Upay : पत्रिकेत असेल गुरूदोष तर गुरूवारी चुकूनही करू नये या गोष्टी
जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत बृहस्पति उच्च स्थानावर असेल तर व्यक्तीच्या जीवनात व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या समस्यांपासून बचाव होतो. माणसाची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते.
मुंबई : भारतीय ज्योतिषशास्त्रात (Astrology) गुरु हा एक प्रभावशाली ग्रह मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत बृहस्पति उच्च स्थानावर असेल तर व्यक्तीच्या जीवनात व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या समस्यांपासून बचाव होतो. माणसाची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. पण पत्रिकेत गुरूची स्थिती कमकुवत असते तेव्हा जीवनात अनेक समस्या येतात आणि आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागतो. पत्रिकेतील गुरू दोष काही उपाय करून कमी करता येतो. जाणून घेऊया हे उपाय कोणते आहेत.
गुरुवारी लक्ष्मी आणि विष्णूची पूजा करा
भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे समृद्धीचे प्रतीक आहेत. गुरुवारी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात समृद्धी येते. गुरुवारी उपवास करून व्रत कथा वाचणे शुभ प्रभावी असते. यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहते. नवरा बायकोमध्ये वाद होत नाही.
प्राण्यांची सेवा करा
जीवनात सुख-समृद्धी मिळवण्यासाठी गुरुवारी पिठात हरभरा डाळ, गूळ आणि हळद घालून पाळीव जनावरांना खाऊ घालावे. याशिवाय आंघोळ करताना पाण्यात चिमूटभर हळद टाका. असे केल्याने गुरु दोषही कमी होतो.
गरीबांना दान करा
गुरुवारी हरभरा डाळ, केळी, पिवळे कपडे इत्यादी गरिबांना दान केल्याने गुरुदोष समाप्त होतो. शिक्षणाशी संबंधित कोणतेही काम गुरुवारी सुरू करणे शुभ आहे.
गुरुवारी हे क्षौर विधी करू नका
गुरुवारी केस धुणे, केस कापणे, मुंडण करणे किंवा नखे कापणे यासारखे क्षौर कर्म कधीही करू नका. यामुळे माता लक्ष्मीचा नाराज होते आणि पैशाशी संबंधित समस्या वाढतात. याशिवाय गुरुवारी धोब्याला कपडे धुण्यासाठी किंवा प्रेससाठीही देऊ नयेत.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)