Guru Pudhyamrut Yoga 2024 : या तारखेला जुळून येतोय गुरू पुष्यामृत योग, खरेदी आणि मंगलकार्यासाठी मानला जातो विशेष

गुरु पुष्य नक्षत्र 2024 ची तारीख 25 जानेवारी आहे. हा दिवस नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, घरकाम, भुमीपूजम इत्यादीसाठी अतिशय शुभ मानला जातो. गुरु पुष्य योगाची वेळ 25 जानेवारी 2024 रोजी सकाळी 08:16 पासून सुरू होईल आणि 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10:28 वाजता समाप्त होईल. खरेदी आणि शुभ कार्यासाठी हा काळ उत्तम राहील.

Guru Pudhyamrut Yoga 2024 : या तारखेला जुळून येतोय गुरू पुष्यामृत योग, खरेदी आणि मंगलकार्यासाठी मानला जातो विशेष
गुरू पुष्यामृत योगImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 09, 2024 | 7:32 PM

मुंबई : हिंदू धर्मात पुष्य नक्षत्राला (Guru Pushyamrut Yoja 2024) विशेष महत्त्व आहे. यश आणि आर्थिक लाभासह कार्ये पूर्ण करण्यास हे नक्षत्र मदत करते असे शास्त्रांमध्ये मानले जाते. शुभ कार्य, गुंतवणूक, व्यावसायिक व्यवहार, सोने-चांदी आणि मालमत्ता खरेदीसाठी हे शुभ मानले जाते. 2024 चे पहिले पुष्य नक्षत्र गुरुवारी आहे, ज्यामुळे गुरु पुष्य योग तयार होईल. शास्त्रानुसार गुरु हे पद, प्रतिष्ठा, यश आणि संपत्तीचे कारण मानले जाते.

या तारखेला जुळून येतोय योग

गुरु पुष्य नक्षत्र 2024 ची तारीख 25 जानेवारी आहे. हा दिवस नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, घरकाम, भुमीपूजम इत्यादीसाठी अतिशय शुभ मानला जातो. गुरु पुष्य योगाची वेळ 25 जानेवारी 2024 रोजी सकाळी 08:16 पासून सुरू होईल आणि 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10:28 वाजता समाप्त होईल. खरेदी आणि शुभ कार्यासाठी हा काळ उत्तम राहील. पुष्य नक्षत्राचे महत्त्वही आश्चर्यकारक आहे. या नक्षत्रात सुरू केलेले कार्य यशस्वी होते आणि सकारात्मक मानले जाते. पुष्यंति अस्मिं सर्वाणी कार्याणी – याचा अर्थ पुष्य नक्षत्रात केलेले सर्व कार्य सफल होते.

गुरु पुष्य नक्षत्र विशेष बनवण्यात आपल्या घरात गुरु आणि शनिची उपस्थिती देखील मोठी भूमिका बजावते. या कारणास्तव हे नक्षत्र अतिशय शुभ मानले जाते आणि त्यात जमीन, इमारती, रत्न, सोने-चांदी खरेदी करणे फायदेशीर आहे. गुरु पुष्य योगाच्या दिवशी खरेदीसाठी एक विशेष वेळ आहे आणि जर तुम्हाला ते जमत नसेल तर श्री सूक्ताचे पठण करणे हा देखील एक उपाय आहे. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि संपत्तीत वाढ होते.

हे सुद्धा वाचा

गुरु पुष्य योगावर हे उपाय करा

या नक्षत्रात पिवळे नीलम धारण करणे उत्तम मानले जाते.

या दिवशी सत्यनारायण पूजा आणि हवन करावे.

या विशेष दिवशी लोक श्री यंत्र पूजा आणि लक्ष्मी पूजन देखील करतात.

या दिवशी मंदिरात जाऊन केळी, पाणी, हरभरा डाळ आणि गूळ अर्पण करावा.

गुरु पुष्य योगावर या मंत्रांचा जप करा

ह्रीं ह्रीं श्री लक्ष्मी वासुदेवाय नमः ।

लक्ष्मी नारायण नमः ।

पद्मने पद्म पद्मलक्ष्मी पद्म सम्भावे तन्मे भजसी पद्माक्षी येन सौख्यं लभम्यहम् ।

ओम ह्रीं श्री क्रीम क्लीम श्री लक्ष्मी मम गृहे धन पुरे, धन पुरे, चिंता दूर जा- दुरये स्वाहा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.