Uddhav Thackeray | मराठवाड्यात 2 नेत्यांना शिवबंधन, लक्ष्य हिंगोली-कळमनुरी!! कोण आहेत अजित मगर आणि संतोष टारफे?

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आधी काँग्रेसमधून माजी खासदार सुभाष वानखेडे यांचा प्रवेश करून घेण्यात आला. तर आता कळमनुरी विधान सभेत आमदार संतोष बांगर यांना शह देण्यासाठी काँग्रेसचे माजी आमदार संतोष टारफे आणि शेतकरी नेते अजित मगर यांचा पक्ष प्रवेश झाला.

Uddhav Thackeray | मराठवाड्यात 2 नेत्यांना शिवबंधन, लक्ष्य हिंगोली-कळमनुरी!! कोण आहेत अजित मगर आणि संतोष टारफे?
संतोष टारफे आणि अजित मगर यांचा शिवसेनेत प्रवेश Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 3:53 PM

मुंबईः महाराष्ट्राच्या इतिहासात सध्या वेगळाच प्रवाह सुरु आहे. पहिल्यांदाच विरोधी पक्षाकडे लोकांचा ओघ वाढतोय, असं म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज काही महत्त्वाच्या नेत्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यात मराठवाड्यातील दोन नेत्यांचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष बांगर (Snatosh Bangar) यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांना जोरदार टक्कर देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी संतोष टारफे (Santosh Tarfe) आणि अजित मगर (Ajit Magar) यांना शिवसेनेत प्रवेश दिला. मुंबईत मातोश्रीवर खास पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी या नेत्यांचं पक्षात स्वागत केलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाला आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ही मोठी खेळी खेळल्याचं बोललं जातंय. नुकतेच शिवसेनेत आलेल्या या दोन नेत्यांची राजकीय कारकीर्द काय आहे हे पाहुयात.

कोण आहेत अजित मगर?

  •  अजित मगर हे कळमनुरी तालुक्यातील शेतकरी कुटूंबातील पुत्र असून मराठा समाजाचे नेते आहेत.
  •  2009 पासून अजित मगर हे स्व .कॉग्रेस खासदार राजीव सातव यांच्या सोबत राजकारणात आले. सातव यांचे कट्टर समर्थ समजले जायचे. 2014 च्या लोकसभा निवडणूकित अजित मगर यांनी राजीव सातव यांचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून काम पाहिले.
  • 2017 साली अजित मगर यांनी काँग्रेसकडून वाकोडी सर्कलचे जिल्हा परिषद तिकीट मागितले मात्र काँग्रेसने त्यांना तिकीट दिले नाही, म्हणून त्यांनी अपक्ष जिल्हा परिषद निवडुनुक लढवी आणि ते निवडून ही आले. त्या नंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन केले. तेव्हापासून त्यांची शेतकरी नेते अशी ओळख झाली.

संतोष बांगर यांना तगडी फाईट

2019 ला त्यांनी महत्त्वाच्या पक्षाकडून विधान सभेचे तिकीट मिळण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. ऐनवेळी त्यांना वचिंतकडून कळमनुरी विधानसभेची उमेदवारी मिळाली. त्यांना 66 हजार 137 मते पडली तर शिवसेनेचे विद्यमान आमदार संतोष बांगर यांना 82 हजार 500 मते पडली ,16 हजार मतांनी बांगर यांनी अजित मगर यांना पराभूत केले. त्या मुळे अजित मगर हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर कॉग्रेस चे संतोष टारफे हे तिसऱ्या क्रमांक राहिले. नंतर अजित मगर यांनी कोरोना काळात अनेक कामे केली त्यानंतर अजित मगर हे अन्य पक्षात जाणार असल्याची चर्चा होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आधी काँग्रेसमधून माजी खासदार सुभाष वानखेडे यांचा प्रवेश करून घेतला तर आता कळमनुरी विधान सभेत आमदार संतोष बांगर यांना शह देण्यासाठी काँग्रेसचे माजी आमदार संतोष टारफे आणि शेतकरी नेते अजित मगर यांचा पक्ष प्रवेश झाला.

माजी आमदार संतोष टारफे कोण?

संतोष टारफे हे काँग्रेसचे कार्यअध्यक्ष शिवाजी मोघे याचे जावाई आहेत. स्व. खासदार राजीव सातव यांच्या विरोधात 2009 मध्ये त्यांनी बसपाकडून कळमनुरी विधान सभा लढवली. त्या वेळी राजी सातव 25800 मतांनी निवडून आले. त्यानंतर राजीव सातव यांनी संतोष टारफे यांची राजकीय ताकद पाहून 2012 साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवेश करून घेतला. नंतर 2012 साली त्यांच्या पत्नी वंदना टारफे यांनी पिंपळदरी गटातून जिल्हा परिषद लढवली व निवडून आल्यानंतर त्यांनी काँग्रेस वाढीला सुरुवात केली.

  •  2014 च्या लोकसभेवेळी राजीव सातव यांनी हिंगोली लोकसभा / किनवट मतदारसंघात प्रचार प्रमुख म्हणून निवड केली. त्या वेळी त्यांनी संपूर्ण आदिवासी समाजाची ताकद त्यांच्या बाजूने उभी केली. त्यावेळी मोदी लाटेतही राजीव सातव निवडून आले.
  • हीच ताकद बघून राजीव सातव यांनी 2014 च्या विधान सभेत कळमनुरी विधान सभेचे तिकीट दिले. त्या वेळी तीरंगी लढतीमध्ये संतोष टार्फे यांनी राष्ट्रवादीचे शिवाजी माने आणि शिवसेनेचे गजानन घुगे यांना पराभूत करून 10 हजार मतांनी निवडून आले. नंतर वाड्या तांड्यात काहीसे विकास कामे केले
  •  2019 च्या निवडूनिकीत पुन्हा काँग्रेसने आमदार टारफे यांना उमेदवारी दिली. मात्र वंचितच्या उमेदवारीमुळे टारफे यांना आमदाराकीवरून पाय उतार व्हावे लागले. आमदार संतोष बांगर विजयी झाले.
  • 2021 मध्ये काँग्रेस आमदार राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी वाढत गेली. त्यामुळे संतोष टारफे यांनी शिवसेनेत पक्षप्रवेशाचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.