Holi 2023 : होलाष्टक म्हणजे काय आणि कशी काळजी घ्याल, जाणून ज्योतिषशास्त्रातील 8 प्रभावी तोडगे

Holashtak 2023 : होळीच्या पूर्वी आठ दिवस खूपच त्रासदायक असतात. या आठ दिवसात आठ ग्रहांचा वाईट प्रभाव जातकांवर पडतो.ज्योतिषशास्त्रात या दिवसांबाबत महत्त्वाचे तोडगे देण्यात आले आहेत.

Holi 2023 : होलाष्टक म्हणजे काय आणि कशी काळजी घ्याल, जाणून ज्योतिषशास्त्रातील 8 प्रभावी तोडगे
Holi 2023 : होळीच्या आठ दिवस आधी जरा जपूनच! जाणून घ्या होलाष्टक सुरु असताना हे उपाय करा
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 2:28 PM

मुंबई : होळी पौर्णिमा हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण मानला जातो. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा मोठ्या उत्साहात सण संपूर्ण देशभर साजरा केला जातो.पण होळीपूर्वीचे आठ दिवस अशुभ मानले जातात. शुक्ल पक्षातील अष्टमीपासून ते होलिका दहनापर्यंत कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही.या आठ दिवसांना होलाष्टक असं संबोधलं जातं. या आठ दिवसात धर्मशास्त्रात वर्णन असलेले 16 संस्कार केले जात नाहीत. या दिवसात एखादं शुभ कार्य केल्यास अडचणी येतात अशी धारणा आहे. तसेच घरात नकारात्मकता, दु:ख आणि भांडणासारखी स्थिती निर्माण होते. ज्योतिषशास्त्रानुसार फाल्गुन शुक्ल पक्षातील अष्टमीला चंद्र, नवमीला सूर्य, दशमीला शनि, एकादशीला शुक्र, द्वादशीला गुरु, त्रयोदशीला बुध, चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहु उग्र स्वरुपात असतो.

होलाष्टक 27 फेब्रुवारीला सुरु होणार असून 6 मार्च 2023 रोजी होलिका दहनानंतर संपणार आहे.पौर्णिमा तिथी दुपारी 4 वाजून 17 मिनिटांनी सुरु होईल आणि पुढच्या दिवशी 7 मार्च संध्याकाळी 6 वाजून 9 मिनिटांपर्यंत राहिल.हिंदू धर्मशास्त्रात होळी पूर्वीच्या आठ दिवसांसाठी खास उपाय सांगितले गेले आहेत. यामुळे जीवनात येणाऱ्या अडचणी कमी होतात. तसेच सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होते. चला जाणून घेऊयात ज्योतिषीय उपाय

  • होळीच्या आठ दिवस आधी देवाची पूजा, जप केल्यानं दुप्पटीने फळ मिळतं.त्यामुळे या दिवसात जितकं शक्य होईल तितकं देवाचं नामस्मरण कराल.
  • मेहनत करूनही यश मिळत नसेल आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला असेल तर या दिवसात देवी लक्ष्मीचं श्रीसुक्त आणि ऋण मोचन मंगळ स्त्रोत्राचं पठण कराल. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि कर्जाचा भार देखील कमी होतो.
  • जर एखादा व्यक्ती विनाकारण त्रास देत असेल तर या काळात सूर्यदेवांची पूजा करा. होलाष्टकात प्रति दिवस सूर्यनारायणांना अर्घ्य द्या. तसेच आदित्यहृदय स्तोत्राचं तीन वेळा पठण करा.
  • जर तुमच्या एखा व्यक्ती आजाराने पीडित असेल तर होलाष्टकात प्रभावी तोडगा वापरू शकता.या काळात भगवान शिवाची पूजा करा.महामृत्यूंजय मंत्राचा रुद्राक्षाच्या माळेवर जप करा.शिवाच्या दिव्य मंत्राचा निश्चित जप केल्याने दशांश हवनचं पुण्य मिळेल. यामुळे अकाली मृत्यूचं संकट टळेल.
  • ज्योतिषशास्त्रानुसार होलाष्टकात कुंडलीतील 8 ग्रह उग्र स्थितीत असतात. त्यांना शांत आणि अशुभ स्थितीचा बचाव करण्यासाठी नवग्रह यंत्राची पूजा करावी. तसेच त्यांच्या बीज मंत्रांचा जप करावा.
  • ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी भगवान शिवाची पंचामृताने अभिषेक करावा.
  • होलाष्टकाच्या द्वादशीला भगवान विष्णुंच्या नृसिंह अवताराचं पूजन करण्याची मान्यता आहे. या तिथीला हिंदू धर्मात नृसिंह द्वादशी असं संबोधलं जातं. नृसिंह अवताराची पूजा केल्याने आपल्यावरील संकट दूर होतं.
  • होलाष्टकाच्या काळात भगवान श्रीकृष्णाची पूजेचं महत्त्व आहे. या आठ दिवसात कृष्णाच्या विविध रुपांचं पूजन केलं जातं. फळ, फूल, अबीर गुलाल, धूप दीप यांनी पूजन करावं. तसेच मंत्रांचा जप करावा. यामुळे जीवनातील सर्व संकट दूर होतं. सुख आणि सौभाग्य प्राप्ती होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....