Horoscope 2024 : 7 जानेवारीपासून या राशींना मिळणार बुध ग्रहाची साथ! कसं ते समजून घ्या

बुध हा ग्रह सूर्याच्या जवळ असलेला ग्रह आहे. बुधाच्या गोचर आणि अस्त-उदयाला येण्याचा वेग इतर ग्रहांच्या तुलनेत अधिक आहे. असं सर्व असताना नववर्ष 2024 मध्ये बुध हा गोचर करणारा पहिला मोठा ग्रह ठरणार आहे. चंद्राची स्थिती दर दोन दिवसांनी बदलते. पण बुधाच्या गोचरामुळे राशीचक्रावर प्रभाव पडणार आहे.

Horoscope 2024 : 7 जानेवारीपासून या राशींना मिळणार बुध ग्रहाची साथ! कसं ते समजून घ्या
Horoscope 2024 : बुध ग्रहाच्या स्थितीमुळे 7 जानेवारापासून या राशींचं नशिब फळफळणार, कसं असेल ग्रहमान ते समजून घ्या
Follow us
| Updated on: Jan 02, 2024 | 4:56 PM

मुंबई : बुध ग्रह हा बुद्धिचा ग्रह म्हणून गणला जातो. त्यामुळे जातकाच्या कुंडलीत बुध कोणत्या स्थानात बसला आहे यावरून आकलन केलं जातं. सध्या बुध ग्रह वृश्चिक राशीत विराजमान आहे. आता वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करणार आहे. रात्री 9 वाजून 16 मिनिटांनी बुध ग्रह धनु राशीत प्रवेश करेल. या राशीत 1 फेब्रुवारीपर्यंत ठाण मांडून बसणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजून 23 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल. पण 24 दिवसांच्या कालावधीत 3 राशींचं भलं करून जाणार आहे. बुध ग्रहाचा वाणी, व्यवसाय, संवाद, बँकिंग आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसून येतो. धनु राशीत प्रवेश करताच बुध ग्रहाची तीन राशींवर कृपा असणार आहे. त्यामुळे बुध ग्रहाच्या गोचरामुळे कोणत्या तीन राशींना लाभ होणार ते जाणून घ्या.

या तीन राशींवर असेल बुध ग्रहाची कृपा

मिथुन : या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. त्यात बुधाने गोचर करताच सप्तम स्थानात जाईल. त्यामुळे भागीदारीच्या धंद्यात जबरदस्त लाभ मिळेल. ज्या कामात गेल्या काही दिवसांपासून अपयश मिळत होते. त्या कामातून चांगलं उत्पन्न मिळताना दिसेल. सप्तम स्थान हे पतीपत्नीचं स्थान म्हणूनही ओळखलं जातं. त्यामुळे वैवाहिक जीवनात काही सकारात्मक घडामोडी घडतील. लग्नासाठी प्रयत्नशील असणाऱ्या जातकांना स्थळं चालून येतील. वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदीचाही योग आहे.

धनु : बुध ग्रह गोचर करत या राशीत प्रवेश करणार आहे. लग्न कुंडलीत बुधाचं आगमन होताच आत्मविश्वास दुणावलेला राहील. जे काम हाती घ्याल ते पूर्ण करण्यासाठी तुमचा आत्मविश्वास कामी येईल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामंही पूर्ण कराल. वडिलोपार्जित संपत्तीतून धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच जमिनीशी निगडीत व्यवसाय करत असाल तर काही सौदे पक्के होतील. त्यामुळे तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळू शकतो.

कन्या : बुध ग्रह या राशीच्या चतुर्थ स्थानात गोचर करत आहे. त्यामुळे नशिबाची पूर्ण साथ मिळेल. चौथं स्थान हे घर आणि कुटुंबाशी निगडीत आहे. या कालावधीत आईसोबतचे संबंध आणखी दृढ होतील. घरात सकारात्मक उर्जेचा भास होईल. या स्थानावरू घर आणि जमिनीबाबत अंदाज वर्तवला जातो. कौटुंबिक पातळीवरून मिळालेल्या साथीमुळे तुम्ही जोखिम पत्कारू शकता. जोखिम पत्कारताना तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.