आजचे राशी भविष्य 16th September 2024 : किरकोळ वाद होतील, पण कुणासोबत?; कुणाची आहे ही रास?

Horoscope Today 16th September 2024 in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? काय घडणार आजच्या दिवसात? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य.

आजचे राशी भविष्य 16th September 2024 : किरकोळ वाद होतील, पण कुणासोबत?; कुणाची आहे ही रास?
HoroscopeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 16, 2024 | 7:30 AM

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 16th September 2024) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

काही काळ आत्मचिंतन करा. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. समस्यांवर मार्ग सापडेल. एखादी व्यक्तीगत समस्याही दूर होईल. व्यक्तीगत प्रकरणात स्वत: निर्णय घेण्यावर प्राधान्य द्या. दुसऱ्यांचं ऐकून स्वत:चं नुकसान करू नका. सतर्क राहा. घरातील अनुभवी आणि वरिष्ठांच्या मानसन्मानात कसूर येऊ देऊ नका. ऑफिसचं वातावरण चांगलं राहील. नवरा-बायकोत किरकोळ वाद होतील. प्रेमसंबंधाला घरच्यांची मान्यता मिळेल. त्यामुळे आजचा दिवस प्रेमीयुगुलांसाठी अत्यंत चांगला ठरेल.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

महिलांनी आज आरोग्याची काळजी घ्यावी. आजचा दिवस अत्यंत व्यस्त राहील. तुमची क्षमता आणि योग्यतेनुसार तुम्ही कठिण काम पूर्ण कराल. आर्थिक प्रकरणात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा ठेवू नका. व्यक्तीगत कामात व्यस्त राहा. व्यवसायात सावध राहा. एखादी डील तुमच्या हातून निघून जाऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना एखाद्या प्रकल्पात यश मिळणार आहे. काही काळ कुटुंबातील लोकांशी संवाद साधा. त्यामुळे घरातील सामंजस्य टिकून राहील. त्यांच्या मनातील घालमेल कळेल.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

तुमच्या आजपासच्या परिस्थितीत आज बदल होणार आहे. त्याचा सकारात्मक परिणाम मिळणार आहे. मालमत्ता किंवा वाहन खरेदीचा प्रश्न मार्गी लावाल. एक दु:खद बातमी समजल्याने मानसिक तणाव येईल. त्यामुळे आवसान गळून जाईल. पण अशावेळी मनोबल ढासळू देऊ नका. आध्यात्मिक कार्यात व्यस्त ठेवा. मानसिक आनंद मिळेल. व्यवसायात यश मिळेल. व्यवसाय पुढे नेण्यासाठी नवीन योजना सुरू करावी लागेल. नोकरीत मनासारखा पदभार मिळेल. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीमुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

मनात जी स्वप्नं आणि कल्पना आहेत, त्या साकार करण्यासाठी उपयुक्त वेळ आहे. वडील किंवा एखाद्या वडिलधाऱ्या व्यक्तीकडून आशीर्वाद म्हणून एखादं गिफ्ट मिळेल. एखाद्या खास समारंभात जाण्याचं आमंत्रण मिळेल. पेपरवर्क किंवा देवाणघेवाणीच्या प्रकरणात काही चुका होण्याची शक्यता आहे. पटकन यश मिळण्याच्या नादात तुम्ही तुमचं नुकसान करून घेण्याची शक्यता आहे. सहजपणे कामे मार्गी लावा. कुणालाही कटू बोलू नका. यावेळी ठोस आणि महत्त्वाचे निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. नोकरीत निष्काळजीपणामुळे एखादा प्रकल्प अर्धवट राहू शकतो. आरोग्याच्या दृष्टीकोणातून ही वेळ योग्य नाहीये. तब्येतीची काळजी घ्या. औषधे घेण्यात आळस करू नका.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)

गावाकडे जाण्याचा योग आहे. गावातील शेतीची कामे अर्धवट राहीतल. महिला वर्गासाठी आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार महिलांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तर बेरोजगारांना आज नवी संधी मिळण्याची शक्यता आहे.आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. तुमचे पैसे चोरीला जाण्याची शक्यता आहे. तुमचा वेंधळेपणा आज तुमच्या अंगाशी येईल. लग्नाळूंना आज चांगलं स्थळ येईल. त्यामुळे घरात आनंदी वातावरण राहणार आहे. गावावरून पाहुणे येण्याची शक्यता आहे.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

घरातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. एखादी व्यक्ती तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुणावरही विश्वास ठेवू नका. विचार करूनच एखाद्याशी मैत्री करा. व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्यांना आज मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरा जॉब स्वीकारताना सावध राहा. आज खास मित्राची भेट होईल. गणपती बाप्पाच्या कृपेने तुमची सर्व कामे मार्गी लागतील.

तुळ राशी (Libra Daily Horoscope)

धंद्यात चढ उतार होतील. समजूतदारपणे गोष्टी पार पाडा. एखादं अडकलेलं काम मार्गी लागेल. आयात निर्यातीशी संबंधित गोष्टीत सावधानता बाळगा. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ लवकर मिळणार आहे. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. जवळचीच व्यक्ती घात करण्याची शक्यता आहे. प्रेमप्रकरणात आज भयंकर काही घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध राहा. गावाला जाण्याचा योग आहे. नको तो आर्थिक खर्च टाळा. योग्य ठिकाणीच पैसा खर्च करा.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

दिवसभराच्या व्यस्ततेून मनासारखं काम करण्यासाठी वेळ काढा. त्यामुळे मानसिक शांतता मिळेल. आर्थिक योजना मार्गी लावण्यासाठी वेळ मिळेल. एखाद्यावेळी वाद झाला तर शांत राहा. बॅकफूटवर राहणं अशावेळी चांगलं. अचानक काही खर्च वाढतील. त्यामुळे तुमचे बजेट कोलमडेल. अनोळखी व्यक्तीशी जास्त घसवट करू नका. कामानिमित्ताने दूरचा प्रवास होणार आहे. मार्केटमध्ये तुमच्या नावाची चर्चा होईल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी वाद होईल. कामचुकारपणा टाळा. ऑफिसच्या बाहेर अधिकवेळ भटकणं योग्य नाही. आरोग्याची काळजी घ्या.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

वाद मिटवण्यासाठी आणि दिवस आनंदी् घालवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. जुन्या चुका टाळाल. नव्याने सुरुवात कराल. घर आणि कामात समन्वय साधण्यात अडचणी येतील. रिस्क गोष्टींपासून दूर राहा. एखादं महत्त्वाचं काम अडकून राहील. व्यवसायात असलेल्या अडचणी दूर होतील. ऑफिसमधील व्यवस्था गडबडेल. कर्मचाऱ्यांमध्ये सामंजस्य कायम ठेवा. नवरा-बायकोमध्ये व्यक्तीगत कारणाने वाद होतील. गॅस आणि अॅसिडिटीचा प्रचंड त्रास जाणवेल. खाण्यापिण्याचे पथ्य राखा.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

एखाद्या राजकीय व्यक्तीची भेट होईल. समस्येचं समाधान मिळेल. व्यस्त असूनही तुम्ही मित्रांशी संपर्क साधाल. त्यामुळे मैत्री अधिक दृढ राहील. दुसऱ्यांच्या प्रकरणात डोकावू नका. मामलत्तेशी संबंधित कोणत्याही प्रकरणात पडू नका. वाचल्याशिवाय कोणत्याही कागदपत्रांवर सही करू नका. आळस झटकून कामाला लागा. मीडियाती काम करणाऱ्या व्यक्तीचा आज नव्या ऑफिसमधील पहिला दिवस आनंदाचा जाईल. नवरा बायकोमध्ये चांगलं सामंजस्य राहील. एखाद्या मित्राची भेट झाल्याने आजचा दिवस चांगला जाईल. लॉटरी काढू नका, नाही तर नुकसान होईल.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

आज तुम्हाला तुमच्या कामाच्या मेहनतीचे फळ मिळेल. सामाजिकदृष्ट्याही तुम्हाला मान सन्मान मिळेल. हे यश कायम ठेवण्यासाठी तुम्हाला तुमचा स्वभाव आदर्श ठेवला पाहिजे. संवाद साधताना चुकीचे आणि कठोर शब्द वापरू नका. धैर्य आणि संयम ठेवा. फालतू खर्च करू नका. व्यवसायात नव्या गोष्टींचा प्रयोग कराल. नोकरी करणाऱ्यांना विशेष जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. पती-पत्नींमधील संबंध चांगले राहतील. मुलांकडून खास गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. गावाला जाण्याचा योग आहे.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

एखाद्या विशेष कार्याबाबत आखलेली योजना मार्गी लागेल. काही अडचणीही येतील पण त्याचबरोबर त्याचं समाधानही निघेल. तुमच्या सकारात्मक दृष्टीकोणाची छाप पडेल. कोणताही वाद झाला तर परिस्थिती निवळण्याचं काम करा. पोलिसांशी संबंधित कारवाई होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित एखादं प्रकरण सुरू असेल तर अत्यंत सजग आणि सावधपणे निर्णय घ्या. कौटुंबिक वातावरण चांगलं राहिल. घरात अधिक हस्तक्षेप करू नका. वातावरण खराब आहे. त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.