आजचे राशी भविष्य 21st August 2024 : बऱ्याच वर्षानंतर जुनी मैत्रीण भेटेल, पण… ही रास कुणाची?
Horoscope Today 21st August 2024 in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? काय घडणार आजच्या दिवसात? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य.
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 21st August 2024) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष राशी (Aries Daily Horoscope)
मेष राशीसाठी आजचा दिवस सावधानतेचा असेल. तुम्हाला एखादं काम पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत करावी लागणार आहे. तुमच्या आजूबाजूला जर काही वाद सुरू असेल तर त्यात पडू नका. मौन बाळगा. तेच तुमच्यासाठी उत्तम राहील. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात आज असंख्य नवीन लोकांसोबत चर्चा करावी लागणार आहे. तुमच्या वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्येचा पूर्णविराम होईल. आज तुम्ही प्रगतीच्या मार्गावर असाल.
वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)
आजचा दिवस तुमच्यासाठी मिश्रफलदायी ठरणार आहे. आर्थिक परिस्थितीचं भान ठेवा आणि त्यानुसारच पैसा खर्च करा. आज तुम्हाला समाजात मान सन्मान मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही. मुलांसोबत आज वेळ घालवाल. त्यामुळे तुमचा तणाव दूर होईल. तुम्ही तुमच्या दिनचर्येत प्रचंड फेरफार कराल. त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. गावाकडे जाण्याचा योग आहे. मात्र, प्रवासात खर्च अधिक वाढेल.
मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)
आज तुम्ही तुमच्या बुद्धीचा आणि विवेकबुद्धीचा चांगला वापर कराल. तुमच्या व्यवसायात एखादी नवीन डील फायनल होण्याची शक्यता आहे. त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. तुमच्या कुटुंबात सुरू असलेल्या ताणतणावाबाबत पत्नीसोबत चर्चा करा. नक्कीच मार्ग निघेल. तुम्हाला आज अचानक भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. आज एखाद्या सरकारी कामात यश मिळेल. कोर्ट कचेरीची कामे मार्गी लागतील. अचानक धनलाभ होईल.
कर्क राशी (Cancer Daily Horoscope)
आजचा दिवस तुम्हाला तणावपूर्ण जाईल. तुमचं काम अत्यंत सजगतेने करा. खाण्याच्या वेळा न पाळल्याने तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. व्यवसायात तुम्हाला तुमच्या सहकाऱ्याचं प्रचंड सहकार्य मिळेल. विदेशात व्यवसाय वाढवण्यात यश येईल. तुम्ही तुमच्या कामात पुढे राहाल. आर्थिक प्रगतीचा दिवस आहे. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तर बेरोजगारांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.
सिंह राशी (Leo Daily Horoscope)
आजचा दिवस तुम्हाला प्रगतीपथावर नेणारा आहे. आज तुम्ही कुणासोबत तरी आर्थिक व्यवहार कराल. विद्यार्थी ज्ञानार्जनाकडे अधिक लक्ष देतील. सौंदर्यप्रसाधनांवर आज अधिक खर्च होणार आहे. दुबईला गेलेले जवळचे आप्तेष्ट मायदेशी परततील. कुटुंबात अनेक समस्यांमुळे तुमची जबाबदारी वाढणार आहे. पार्टनरसोबत डेटिंगला जाण्याचा प्रयत्न कराल. आज तुमच्या मनातील गोष्ट सांगणं टाळा. नाही तर मोठा राडा होण्याची शक्यता आहे.
कन्या राशी (Virgo Daily Horoscope)
आज तुम्हाला सासूरवाडीकडून लाभ होण्याची शक्यता आहे. पण तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यांपासून निराशजनक बातमी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. हर्नियाचा त्रास उद्भवेल. वाढत्या खर्चामुळे तुम्हाला मानसिक त्रास जाणवेल. गावाकडे जाण्याचा विचार करू नका. पावसामुळे कामे रखडतील. बऱ्याच दिवसानंतर जुनी मैत्रीण भेटेल. मात्र, तिचा तुमच्यावरील राग अजूनही गेलेला नसेल.
तुळ राशी (Libra Daily Horoscope)
आजचा दिवस समृद्धीचा राहील. थोड्या आर्थिक चणचणीमुळे चिंता सतावेल. तुम्हाला दीर्घकाळासाठी बाहेर जावं लागणार असेल तर थोडं सावध राहा. तुमची एखादी प्रिय वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबात तुमच्या सल्ल्याचा अवलंब केला जाईल. तुमच्या वडिलांसमोर तुमचं म्हणणं मांडण्याची संधी मिळेल. मैत्रीणीशी निवांत गप्पा माराल. आज बाहेर जेवायला जायचा बेत आहे. समुद्र किनारी फिरण्याने मन प्रसन्न होईल.
वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)
आज तुम्ही एखादं वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. तुमचा पैसा कुठे अडकला असेल तर तो तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. अनेक नवीन कामासाठी तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील. तुमची अडकलेली कामे अचानक मार्गी लागतील. तुमच्या कुटुंबातील लोक तुमच्या शब्दाला किंमत देतील. तुमचा एखादा जुना आजार पुन्हा उफाळून येईल. कुटुंबातील सदस्याचं लग्न जमण्यात काही अडथळे येत असतील तर ते आज दूर होतील.
धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)
या राशीच्या लोकांना आज भाग्याच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. तुमचा प्रभाव तर वाढेलच पण प्रतिष्ठाही वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना पुरस्कारही मिळणार आहे. व्यवसायात अपेक्षित नफा मिळाल्याने तुम्ही खूश व्हाल. तुमच्या जीवनसाथीकडून एखादी चांगली बातमी मिळू शकते. लव्ह लाइफचा आनंद घेणाऱ्यांनी कोणताही शब्द देताना 17 वेळा विचार केला पाहिजे. तुम्ही आज प्रगती कराल. मैत्रीणीशी झालेला वाद संपुष्टात येईल. मित्राच्या सोबत फिरायला जाण्याचा योग आहे.
मकर राशी (Capricorn Daily Horoscope)
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. नोकरीच्या ठिकाणी समजून उमजून पाऊल टाका. कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. नाही तर तुमच्या वाईटावर बोके टपलेलेच आहेत. तुम्ही कुणाला पैसे उसने दिलेले असतील तर ते आज परत मिळण्याची शक्यता आहे. तुमचं एखादं काम जर दीर्घकाळापासून पेंडिंग असेल तर तेही पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनोळखी व्यक्तीची मदत घ्यावी लागणार आहे.
कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)
आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायी ठरणार आहे. एखाद्या गोष्टीमुळे तुम्ही टेन्शनमध्ये राहाल. मैत्रीणीसोबत असहज वागाल. कुटुंबातील सदस्याकडून एखादी चांगली बातमी कानावर येईल. तुमचं कोणतंही काम भाग्यावर सोडू नका. तुमची जीवनसाथी एखाद्या समस्येचा सामना करत असेल तर आज ती समस्या मार्गी लागणार आहे. तुम्हाला तुमचा एखादा जुना मित्र भेटण्याची शक्यता आहे.
मीन राशी (Pisces Daily Horoscope)
आज समजून उमजून राहण्याचा दिवस आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्याला कोणत्याही कारणासाठी फार आग्रह करू नका. नाही तर ओरडा पडेल. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नोकरीत काम करणारे लोक आज जोखीम घेणे टाळाल. तुमचे विरोधक आज तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे सावध राहा. विरोधकांच्या कारवायांमुळे विचलीत होऊ नका.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)