आजचे राशी भविष्य 24 July 2024 : पार्टनरपासून एखादी गोष्ट लपवाल, पण कोणती?; कुणाची रास आहे ही?

Horoscope Today 24 July 2024 in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? काय घडणार आजच्या दिवसात ? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य.

आजचे राशी भविष्य 24 July 2024 : पार्टनरपासून एखादी गोष्ट लपवाल, पण कोणती?; कुणाची रास आहे ही?
Horoscope Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 24, 2024 | 7:30 AM

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 24 July 2024) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

आजचा दिवस संमिश्र राहणार आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. तुम्ही तुमचं उत्पन्न वाढवण्याच्या स्त्रोतावर लक्ष द्याल. शेजाऱ्यांसोबत वाद घालू नका. कार्यक्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी मिळेल. आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुमचं मन एखाद्या गोष्टीमुळे त्रस्त असेल. घरात एखाद्या कारणावरून वाद होऊ शकतो. जीवनसाथीला नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. वाहन खरेदी करताना मित्रांचा सल्ला घ्या.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

आजचा दिवस तुम्हाला प्रसन्न करेल. तुम्हाला तुमच्या कामांबाबत सचेत राहावं लागणार आहे. घरी पाहुण्यांचं आगमन होणार आहे. वडिलांनी एखादा सल्ला दिल्यास त्याची अंमलबजावणी करा. विनाकारण कोणतीही रिस्क घेऊ नका. नोकरीचा शोध घेणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी मिळणार आहे. स्पर्धा परीक्षेची आतापासूनच तयारी करा. नंतर परीक्षा कठिण जाणार नाही. आज अधिकचा खर्च होईल. प्रेमीयुगलांसाठी आजचा दिवस आनंदाचा जाईल. शेतीसंबंधित कामे मार्गी लावाल.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या कामांचा आराखडा तयार करावा लागणार आहे. तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवाल तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. पण तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच निर्णय घ्या. तुम्हाला तुमच्या खर्चांवरही लक्ष द्यावं लागणार आहे. वैवाहिक आयुष्यात सुरू असलेल्या समस्यांमधून सुटका होईल. एखाद्याला वचन दिलं तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जीवनसाथीला शारीरिक कष्ट झाल्याने तुम्हाला धावपळ करावी लागणार आहे.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. तुम्हाला तुमच्या कामकाजावर ध्यान द्यावं लागणार आहे. संपत्तीशी संबंधातील वाद मिटेल. तुम्हाला देवाणघेवाण करताना प्रचंड सावध राहावं लागणार आहे. नव्या व्यक्तींच्या संपर्कात याल. त्यामुळे तुमचा व्यवसाय विदेशापर्यंत जाऊ शकतो. विद्यार्थ्यांना काही विषयात बदल करायचा असेल तर वरिष्ठांचा सल्ला घ्या. व्यसनांपासून सावध राहा. वाहने जपून चालवा.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)

आजच्या दिवशी तुम्हाला व्यवसायात चढउतार येण्याची शक्यता आहे. एखाद्या कामामुळे तुम्ही त्रस्त असाल तर हा त्रास दूर होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे बोल मनाला लागतील. त्यामुळे तुम्ही दिवसभर नाराज राहाल. अविवाहितांची भविष्यातील जीवनसाथीशी भेट होईल. प्रिय व्यक्तीशी भांडण कराल. त्यामुळे प्रकृती खराब होईल. पावसाळी आजारांपासून सावध राहा. कामाच्या ठिकाणी कुणावरही विसंबून राहू नका.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

आजचा दिवस सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांसाठी चांगला राहणार आहे. तुम्ही एखादं नवं पद मिळवाल. तुमची वेगळी ओळख निर्माण होणार आहे. अनोळखी व्यक्तींवर अधिक विश्वास टाकू नका. धार्मिक कार्यात मग्न राहाल. त्यामुळे मन:शांती राहील. भंगारचा धंदा करणाऱ्यांना अचानक लाभ होईल. काही लोक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्यापासून दूर राहा. जीभेवर नियंत्रण ठेवा. मनाचा समतोल ढळू देऊ नका.

तुळ राशी (Libra Daily Horoscope)

आजचा दिवस तुम्हाला सुखसमृद्धीचा जाणार आहे. सासरच्या लोकांशी आर्थिक व्यवहार करू नका. राजकारणात सक्रिय असणाऱ्यांना आज नवे मित्र भेटतील. तुम्हाला तुमच्या वेळेचा सदुपयोग करावा लागेल. इकडे तिकडे भटकून वेळ वाया घालवू नका. तुमचे विरोधक तुमचा जळफळाट करतील. तुम्ही तुमच्या योजनांवर पूर्ण लक्ष द्याल. गावाकडे जाण्याचा योग आहे. वाहने जपून चालवा. नवीन तंत्रज्ञान शिकण्याचा प्रयत्न कराल. ऑफिसात नव्या वस्तूंची खरेदी कराल.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

आजच्या दिवसात तुमचे बरेच सोर्स वाढतील. तुमच्या मित्रांकडून एखादी आनंदाची बातमी कळेल. कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांची मदत मिळेल. दूर असणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. तुम्हाला तुमची दिनचर्या चांगली ठेवण्यासाठी वेळ काढावा लागणार आहे. पत्नीचा जुना आजार डोकं वर काढेल. आईवडिलांना भेटण्याचा योग आहे. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्यांना आनंद वार्ता मिळण्याची शक्यता आहे.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

आजच्या दिवशी दिर्घकाळापासून रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. बिझनेसमधील एखादी योजना मार्गी लागेल. तुमचा एखादा सहकारी तुमच्यावर नाराज होऊ शकतो. पैशाच्या बचतीबाबत भविष्यातील प्लानिंग करू शकता. गुंतवणूक करून ही बचत करण्याचा प्रयत्न असेल. एखाद्या सरकारी योजनेत पैसे गुंतवल्यास फायदा होईल. वडिलोपार्जित संपत्तीचे वाद मिटतील. कोर्टकचेरीच्या प्रकरणातून मुक्त व्हाल.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

आजचा दिवस व्यस्ततेत जाईल. आर्थिक विषयात विचार करूनच निर्णय घ्या. खर्च करताना दहा वेळा विचार करा. भपका दाखवण्याच्या नादात तुमचा वायफळ खर्च होऊ शकतो. कामाबरोबरच कुटुंबातील सदस्यांसाठीही वेळ काढावा लागेल. जीवनसाथीबरोबर आज वाजण्याची शक्यता आहे. नको असलेल्या गोष्टी टाळा. वाहन खरेदी करण्याची इच्छा पू्र्ण होईल. गावाला जाण्याचा बेत आखाल.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत चांगला राहणार आहे. व्यवसायात मनासारखा लाभ मिळेल. पण त्यासाठी तुम्हाला ढोरमेहनत घ्यावी लागणार आहे. नोकरी करणारे दुसऱ्या नोकरीसाठी प्रयत्न कराल. तुम्हाला यश आणि कीर्ती मिळेल. तुमच्या आसपासच्या शत्रूंपासून सावध राहा. वैवाहिक जीवन सुखी राहील. प्रेयसीच्या एका महत्त्वाच्या कामात मदत होईल. गृहिणींसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. दूरचा प्रवास करण्याचा बेत अचानक रद्द करावा लागेल. परदेशातून पुन्हा मायदेशी आगमन होईल.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

आजच्या दिवशी तुम्हाला भौतिक सुख सुविधा मिळतील. तुम्ही नव्या लोकांशी मिळूनमिसळून राहण्याचा प्रयत्न कराल. हीच मंडळी तुम्हाला नव्या व्यवसायात मदत करतील. मुलाला नोकरीत अडचणी येतील. त्यामुळे तुम्ही थोडे त्रस्त राहाल. धार्मिक कार्यात भाग घ्याल. जे लोक इलेक्ट्रॉनिकचं काम करतात त्यांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. पार्टनरशी एखादी गोष्ट लपवून ठेवाल.ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असेल. त्यामुळे नात्यात वितुष्ट येऊ शकतं. सासूरवाडीला जाण्याचा योग आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.