आजचे राशी भविष्य 29 July 2024 : आज अचानक असं काही घडेल की तुम्हाला… आज राशीत काय?

Horoscope Today 29 July 2024 in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? काय घडणार आजच्या दिवसात? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य

आजचे राशी भविष्य 29 July 2024 : आज अचानक असं काही घडेल की तुम्हाला... आज राशीत काय?
HoroscopeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 29, 2024 | 7:30 AM

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 29 July 2024) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

या राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला जाईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. लोकांची तुमच्यावर मर्जी बसेल. मित्रांचा गोतावळा वाढेल. रिअल इस्टेट क्षेत्रातील लोकांना अधिक फायदा होणार आहे. संध्याकाळी घरातील एखाद्या व्यक्तीचं दुखणं बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही परेशान होण्याची शक्यता आहे. परंतु, रात्री सर्वकाही ठिक होईल. प्रवासाचा योग आहे. वाहने जपून चालवा.

वृषभ (Taurus Daily Horoscope)

आज तुमची सर्व अर्धवट कामे मार्गी लागतील. नोकरीच्या ठिकाणी शत्रू निर्माण होतील. ते लोक तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही अत्यंत हुशारीने या सर्वांचा बंदोबस्त कराल. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत चांगला राहील. मुलाच्या विवाहाचा प्रश्न मार्गी लागेल. मुलीच्या करिअरकडे अधिक लक्ष द्या. लव्ह लाइफ अत्यंत चांगली असेल. धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग आहे.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायद्याचा ठरेल. तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील तर ते मिळतील. त्यामुळे तुमचा आजचा दिवस अत्यंत आनंदी जाईल. जीवनसाथीसाठी एखादी भेट वस्तू खरेदी कराल. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तुम्हाला पैसा खर्च करावा लागणार आहे. व्यापारी वर्गासाठी आजचा दिवस अत्यंत चांगला जाणार आहे. नवा उद्योग काढण्याची योजना आखाल. तुमच्या खाण्यापिण्यावरही नियंत्रण ठेवा. संध्याकाळी धार्मिक कार्यात भाग घ्याल.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

आज तुमच्या एखाद्या कार्यात तुमचे बहीण भाऊ तुम्हाला साथ देणार नाही. त्यामुळे तुमच्या अडचणी वाढतात. तुम्ही थोडं गंभीरपणे घेतल्यास तुमची कामे मार्गी लागतील. आज तुमचे शत्रू डोकं वर काढतील. पण तुम्ही त्यांचे मनसुबे उधळून लावाल. तुम्ही अत्यंत भावूक व्यक्ती आहात. त्यामुळेच तुमचा गौरफायदा घेतला जातो. उद्योगात ज्या योजना आखलेल्या असतील त्याचा फायदा होईल. नातेवाईकाच्या लग्नाला जाण्याचा योग आहे. आज तुमच्या राशीत अचानक असं काही घडेल की तुम्हाला अचानक धनलाभ होईल.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)

आज पुण्यदान करण्याचं काम कराल. धर्मकर्मासाठी पैसा खर्च कराल. तुमचा अडकेलला पैसा तुम्हाला मिळेल. सोनं खरेदी करण्याचा शक्यता आहे. नातेवाईकाचं घरी आगमन झाल्याने घरात आनंदी वातावरण राहील. संध्याकाळी मित्रांसोबत पार्टी कराल. चुकीच्या लोकांची संगत सोडण्याचा निर्णय घ्याल. व्यसनांवर नियंत्रण ठेवा. नोकरीतील सहकाऱ्यांपासून सावध राहा. इतरांच्या वाढदिवसासाठी खर्च कराल.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

आजचा दिवस भलता चांगला जाईल. गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या शारीरिक कष्टाच्या कामातून मुक्ती मिळेल. तुमची प्रकृती चांगली राहील. आज संकटात असलेल्या एखाद्या मित्राला मदत कराल. त्यामुळे मनाला आनंद मिळेल. मुलांच्या भवितव्याशी संबंधित आनंदाची बातमी कानावर येईल. त्यामुळे तुमचा मानसिक तणाव दूर होईल. एका मोठ्या संकटातून आज तुम्ही मुक्त व्हाल. जीवनसाथीसोबत कुरबुरी सुरू असतील तर सामोपचाराने त्या सोडवाल. संध्याकाळी बुजुर्ग मंडळींशी संवाद साधाल.

तूळ राशी (Libra Daily Horoscope)

कुणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका. काही लोक गोडबोलून तुमची फसवणूक करण्याची शक्यता आहे. आज तुमची अत्यंत प्रभावशाली लोकांशी भेट होणार आहे. व्यवसायात लाभ मिळवण्यासाठी नव्या योजना आखाव्या लागतील. नोकरीसाठी वणवण भटकणाऱ्यांना आज मित्रांची मदत मिळेल. नोकरदार वर्गाची पदोन्नती होण्याची शक्यता आहे. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करू इच्छिणाऱ्यांना आज ऑफर लेटर मिळण्याची शक्यता आहे. आज तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. सिंगल लोकांना विवाहाचे प्रस्ताव होतील.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

प्रेयसीसोबतचा वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा ब्रेकअप होऊ शकतो. उतावळ्या स्वभावामुळे आज तुमचं धंद्यात मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. आज वाजवीपेक्षा अधिक खर्च होणार आहे. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. आज तुमचा मान सन्मान वाढेल. आज शत्रू पक्षावर विजय मिळवाल. विद्यार्थ्यांनी आज सीनिअर्सचा सल्ला घ्यावा. शेजाऱ्याच्या नादाला लागू नका. फुकटची कटकट मागे लागेल.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

आज संमिश्र असा दिवस राहील. कुटुंबात सुरू असलेल्या कटकटी दूर होतील. पण मानसिक तणाव कायम राहील. एखाद्या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर विचार करूनच निर्णय घ्या. आजचा दिवस तसा बरा नाही. कर्ज चुकवता येत असेल तरच निर्णय घ्या. मामासोबत वाद होतील. जीभेवर नियंत्रण ठेवा. तोंडाचा पट्टा चालू ठेवल्याने नात्यामध्ये कटुता येण्याची शक्यता आहे.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

आजचा दिवस अत्यंत चांगला जाणार आहे. तुम्हाला वाडवडिलांकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मित्र किंवा सहकाऱ्यांना त्यांनी विचारल्यावरच सल्ला द्या. अतिशहाणपणा करायला जाल तर पस्तवाल. व्यापारात आज नवी रणनीती बनवण्याची गरज आहे. त्याचा तुम्हाला भविष्यात लाभ होईल. संध्याकाळी धार्मिक कार्यात भाग घ्याल. त्यामुळे मन प्रसन्न आणि शांत राहील.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

बायको माहेरी गेलेली असेल तर परत घरी येईल. तुमच्या स्वभावाला आवर घाला, नाही तर एक दिवस मोठं नुकसान होईल. ज्येष्ठांचा मान ठेवा. आमदनी वाढवण्यावर भर द्या. जीवनसाथीच्या सल्ल्यामुळे तुम्हाला व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. घरातील एखाद्या सदस्याचं आजारपण उद्भवेल. त्यामुळे तुम्हाला मोठी धावपळ करावी लागू शकते. संध्याकाळी शेजाऱ्याच्या घरात गप्पांचा फड रंगेल.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

शेजाऱ्यांपासून सावध राहा. गोडबोलून तुमचं नुकसान करण्याची शक्यता आहे. व्यापारात नवीन डील फायनल होऊ शकते. एखाद्या शुभकार्याबाबत घरच्यांशी चर्चा होईल. घरातील एखादा सदस्य कामानिमित्ताने दूर देशी जाण्याची शक्यता आहे. जुन प्रेमप्रकरण पुन्हा सुरू होईल. मात्र, यावेळी ताकही फुंकून प्या. प्रवासात इतरांशी वाद घालू नका. तुम्ही प्रवास करत आहात, ऑफिसमध्ये नाहीत याचं भान ठेवा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

लोकसभेत पकंजा ताईंना फटका, विधानसभेत धनूभाऊंची खबरदारी?
लोकसभेत पकंजा ताईंना फटका, विधानसभेत धनूभाऊंची खबरदारी?.
'ज्यांच्या डोक्यात मेंदू नाही, त्यांनी बोलू नये',राऊतांवर कुणाची टीका?
'ज्यांच्या डोक्यात मेंदू नाही, त्यांनी बोलू नये',राऊतांवर कुणाची टीका?.
बाप्पाच्या हातून मोदक पडला अन्..., मोदकेश्वराची अख्यायिका माहितीये का?
बाप्पाच्या हातून मोदक पडला अन्..., मोदकेश्वराची अख्यायिका माहितीये का?.
दादा भरसभेत काय म्हणाले, बारामतीकरांना मी सोडून वेगळा आमदार मिळाला....
दादा भरसभेत काय म्हणाले, बारामतीकरांना मी सोडून वेगळा आमदार मिळाला.....
राणा दाम्पत्य लालबागच्या राजा चरणी लीन,काय मागितल नवनीत राणांनी साकडं?
राणा दाम्पत्य लालबागच्या राजा चरणी लीन,काय मागितल नवनीत राणांनी साकडं?.
तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित, तोडगा निघाला नाहीतर...पुन्हा इशारा?
तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित, तोडगा निघाला नाहीतर...पुन्हा इशारा?.
लालबागच्या राजाच्या चरणी भरघोस रक्कम, पहिल्याच दिवशी किती दान?
लालबागच्या राजाच्या चरणी भरघोस रक्कम, पहिल्याच दिवशी किती दान?.
शिवरायांचा पुतळा रात्री पडला असता तर..., ठाकरे गटाच्या नेत्याचं विधान
शिवरायांचा पुतळा रात्री पडला असता तर..., ठाकरे गटाच्या नेत्याचं विधान.
जरांगे पवारांच कातडं घातलेला माणूस, EWS आरक्षणाचा मारेकरी, भाजपची टीका
जरांगे पवारांच कातडं घातलेला माणूस, EWS आरक्षणाचा मारेकरी, भाजपची टीका.
तब्बल ३१ हजार महिला एकत्र, अथर्वशीर्ष पठणातून केलं गणरायाला नमन
तब्बल ३१ हजार महिला एकत्र, अथर्वशीर्ष पठणातून केलं गणरायाला नमन.