आजचे राशी भविष्य 31 October 2024 : एका मोठ्या संकटातून… कुणाचं आहे हे राशीभविष्य?

Horoscope Today 31 October 2024 in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? काय घडणार आजच्या दिवसात? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य.

आजचे राशी भविष्य 31 October 2024 : एका मोठ्या संकटातून... कुणाचं आहे हे राशीभविष्य?
Horoscope Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 31, 2024 | 7:30 AM

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 31 October 2024) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष राशी (Aries Daily Horoscope)

आज मनोरंजक आणि नियोजित गोष्टींमध्ये व्यस्त राहणे तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरेल. तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये मधुर अनुभवांची आदान-प्रदान होईल. त्यामुळे तुमचे नाते अधिक मजबूत होईल. आज तुम्ही ऑफिसमध्ये तुमच्या टीमसोबतींसोबत मिळून जे काही काम कराल ते यशस्वी होईल. तुमच्यापेक्षा अनुभवी आणि हुशार लोकांकडून तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि तुम्ही खूप आनंदी राहाल. तुमचे पैशांच्या बाबतीत जे काही वाद होते ते आज सुटतील. आज तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ आहे.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)

आज तुमचे काम पूर्ण करण्यासाठी जास्त मेहनत करण्याची गरज आहे. नवीन कामाची सुरुवात टाळा. घरी आणि कामाच्या ठिकाणी जीभेवर नियंत्रण ठेवा. संध्याकाळी जोडीदाराबरोबर शॉपिंगला जाऊ शकता. आज भाग्य 89% तुमच्या बाजूने राहील, माता लक्ष्मीची पूजा करा.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)

आज देवदर्शनाला जाण्याचा योग आहे. आज तुम्ही एक चांगला व्यावसायिक करार कराल. तुमचा व्यवसाय वाढेल आणि तुम्हाला पैसा मिळेल. तुम्ही जे काही बुद्धीचे काम करत असाल त्यात तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. दूरचा प्रवास टाळा. शेजाऱ्यांशी संबंध चांगले ठेवा.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope)

आजचं कोणतंही काम नशीबावर सोडू नका, नाहीतर आर्थिक नुकसान होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीवर वरिष्ठ प्रसन्न होतील. पदोन्नतीचे योग आहेत. सासूरवाडीत उधार देण्याचे टाळा. आज भाग्य तुमच्या बाजूने 66% राहणार आहे, आई-वडिलांचे आशीर्वाद घ्या.

सिंह राशी (Leo Daily Horoscope)

आज तुमच्यामध्ये रचनात्मक कामांची आवड वाढेल, पण व्यवसायात आर्थिक तंगी येऊ शकते. संध्याकाळी जुना मित्र भेटेल. मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी लहान-मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. आज तुमचे भाग्य 88% तुमच्या बाजूने आहे. देवाची आराधना करा. प्रेयसीशी वाद होतील. गृहिणीसाठी आजचा दिवस दगदगीचा जाईल.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमची कामे मार्गी लागतील. व्यवसायात येणाऱ्या समस्या सोडवण्यात यश मिळेल. कुटुंबात काही वाद होऊ शकतात, पण त्याकडे दुर्लक्ष करा. मुलांच्या भविष्याबद्दल निर्णय घेण्यासाठी आई-वडिलांचा सल्ला घ्या. आजचे भाग्य तुमच्या बाजूने आहे. गरजूंना मदत करा.

तुळ राशी (Libra Daily Horoscope)

राजकारणात असलेले लोक उत्साहाने काम करतील. व्यवसायात पैशाची कमतरता भासू शकते. आज कोणाशीही आर्थिक व्यवहार टाळा. व्यवसायात नवीन कल्पना पुढे नेल्याने भविष्यात फायदा होईल. आज भाग्य तुमच्या बाजूने 95% राहिल. धार्मिक कार्यात भाग घ्या. गावाला जाण्याचं टाळा. नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)

आज तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला प्रशंसा मिळेल. तुमची मेहनत फळाला येईल. काही अनावश्यक खर्चांमुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. जीभेवर नियंत्रण ठेवा. सासूशी वाद होतील. विद्यार्थ्यांना आज त्यांच्या पालकांच्या सल्ल्याची गरज भासेल. आज तुमचे भाग्य 82% तुमच्या बाजूने आहे. लग्नाळूंच्या हाती आजही निराशा येईल. दूरचा प्रवास करण्याचा योग आहे.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)

आजचा दिवस मुख्यतः दैनंदिन कामांमध्ये निघून जाईल. कोणत्याही कायदेशीर दस्तऐवजावर हस्ताक्षर करण्यापूर्वी विचार करा, अन्यथा अडचणी वाढू शकतात. मुलांच्या कामामुळे समाधानी व्हाल. आज भाग्य तुमच्या बाजूने 76% राहणार आहे. खरेदीमुळे खर्च वाढणार आहे. घरी पाहुणे आल्याने विनाकारण खर्च वाढणार आहे. नवीन मैत्रीण भेटण्याची शक्यता आहे.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope)

आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या कामातील अडचणी दूर करण्यात यशस्वी व्हाल. सकाळपासूनच तुम्हाला शुभ बातम्या मिळत राहतील आणि दिवस सुखकर जाईल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. प्रेमसंबंधात काही तणाव असू शकतो. आज तुमचे भाग्य 89% तुमच्या बाजूने आहे. घरात वाद होतील. पण संध्याकाळपर्यंत वातावरण निवळेल. बाहेर जाण्याचा बेत कराल.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)

तुमचे स्थान निर्माण करण्यासाठी काळजीपूर्वक काम करा. काही काळासाठी नवीन डील टाळा. आरोग्य चांगले ठेवा. प्रवासाची शक्यता आहे. दुपारनंतर तुम्हाला समस्यांतून मुक्ती मिळेल. आज भाग्य 97% तुमच्या बाजूने असेल. कोर्ट कचेरीच्या कामातून मुक्ती मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीचा ताबा मिळेल.

मीन राशी (Pisces Daily Horoscope)

आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक असणार आहे. अचानक आर्थिक लाभ होईल. एका मोठ्या संकटातून तुमची सुटका होणार आहे. पूर्वीच्या काही चुकांमधून हे संकट निर्माण झालेलं असेल. कुणालाही उसने पैसे देऊ नका. उधारी दिल्यास परत पैसे येण्याची शक्यता कमी आहे. गावाला जाणार असाल तर कुलदैवताला नमस्कार करा. आज तुम्हाला एक दु:खद बातमी ऐकायला मिळण्याची शक्यता आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
'आर.आर.पाटील कुटुंबाची मी माफी मागितली', सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
'आर.आर.पाटील कुटुंबाची मी माफी मागितली', सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
'आबांचे केस फार लहान होते, ते केसाने गळा कापू शकत नाहीत',राऊतांचा टोला
'आबांचे केस फार लहान होते, ते केसाने गळा कापू शकत नाहीत',राऊतांचा टोला.
अजितदादांनीच माझं सरकार पाडलं; पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपानं खळबळ
अजितदादांनीच माझं सरकार पाडलं; पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपानं खळबळ.
36 तासांनंतर वनगा रिचेबल, पत्नी म्हणाल्या, 'मध्यरात्री तीन वाजता...',
36 तासांनंतर वनगा रिचेबल, पत्नी म्हणाल्या, 'मध्यरात्री तीन वाजता...',.
शिंदेंकडून हेलिकॉप्टरने AB फॉर्म,देवळाली-दिंडोरीमध्ये महायुतीत बंडखोरी
शिंदेंकडून हेलिकॉप्टरने AB फॉर्म,देवळाली-दिंडोरीमध्ये महायुतीत बंडखोरी.
सलमान खानला पुन्हा धमकी, ‘दोन कोटी रूपये पाठव, नाहीतर मारून टाकेन..’
सलमान खानला पुन्हा धमकी, ‘दोन कोटी रूपये पाठव, नाहीतर मारून टाकेन..’.
लोकसभेच्या मिमिक्रीचं विधानसभेला उत्तर, पवारांनी केली दादांची मिमिक्री
लोकसभेच्या मिमिक्रीचं विधानसभेला उत्तर, पवारांनी केली दादांची मिमिक्री.
अजितदादांचा भाजपच्या विरोधाला ठेंगा, विरोध डावलून नवाब मलिकांना तिकीट
अजितदादांचा भाजपच्या विरोधाला ठेंगा, विरोध डावलून नवाब मलिकांना तिकीट.
मविआ आणि महायुती, अनेक मतदारसंघात बंडखोरी; कोणाविरोधात कोणाचं बंड?
मविआ आणि महायुती, अनेक मतदारसंघात बंडखोरी; कोणाविरोधात कोणाचं बंड?.
तिकीट न मिळाल्याने ढसाढसा रडणारे श्रीनिवास वनगा गेले कुणीकडे? 36 तास..
तिकीट न मिळाल्याने ढसाढसा रडणारे श्रीनिवास वनगा गेले कुणीकडे? 36 तास...