Libra/Scorpio Rashifal Today 12 July 2021 | घराचं वातावरण पॉझिटिव्ह ठेवण्यात तुमचं महत्त्वपूर्ण योगदान
घराचं वातावरण पॉझिटिव्ह ठेवण्यात तुमचं महत्त्वपूर्ण योगदान राहील. घरासंबंधित असलेल्या अडचणी दूर होतील.
डॉ. अजय भाम्बी –
मुंबई : सोमवार 12 जुलै 2021 (Libra/Scorpio Rashifal) | प्रत्येकालाच आपला दिवस आनंदात, सुखात जावा असे वाटते. मात्र, या गोष्टी प्रत्यक्षात घडतातचं असे नाही. त्यामुळे हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या सोमवारचं संपूर्ण राशीभविष्य (Libra/Scorpio Daily Horoscope Of 12 July 2021 Tula And Vrishchik Rashifal Today)
तूळ (Libra), 11 जुलै :
घराचं वातावरण पॉझिटिव्ह ठेवण्यात तुमचं महत्त्वपूर्ण योगदान राहील. घरासंबंधित असलेल्या अडचणी दूर होतील. तुम्ही समाधानी व्हाल. घरातील ज्येष्ठ आणि वडिलधाऱ्यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही म्हत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे कामात घाई आणि जास्त मोबदला मिळवण्याचा विचार करु नका. अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. सध्या खर्चावरही नियंत्रण ठेवा. त्यामुळे आपल्या आर्थिक परिस्थितीवर लक्ष असू द्या.
तुम्ही जर नवं काहितरी काम सुरु करण्याचा विचार करु इच्छित असाल तर संबंधित कामाबाबत आधी गंभीरतेने विचार करा. तुम्ही मनापासून काम केलं तर त्याचा योग्य मोबदला निश्चितच मिळेल. नोकरी करणाऱ्या मंडळींनी आपल्या कामामध्ये निष्काळजीपणा करु नये. सतर्क राहा.
लव्ह फोकस – कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. प्रेमसंबंधात थोडेफार मतभेद होऊ शकतात.
खबरदारी : आपली रोगप्रतिकार क्षमता चांगली ठेवण्यासाठी प्रयत्न करा. गरमीमुळे थोडा थकवा आणि कमजोरी जाणवू शकेल.
लकी कलर – नारंगी लकी अक्षर – जा फ्रेंडली नंबर – 7
वृश्चिक (Scorpio), 12 जुलै :
तुमचे काही लोकांशी मतभेद सुरु असतील तर कदाचित त्यावर तुम्ही घेतलेला निर्णय तुमचे संबंध वाढवण्यास मदत होईल. घरात काही बदल घडवून आणायचा असेल तर त्याआधी त्यावर विचार करा. नंतर सर्वानुमते योग्य निर्णय घ्या.
घरातील मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या वस्तू काळजीवपूर्वक सांभाळा. घरावर खर्च करण्याआधी आपला बजेट निश्चित करा. कारण जास्त खर्च केल्यास पुढे अडचणी येऊ शकतात.
व्यवसायात कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहू नका. तुम्ही स्वत: कामाकडे बारकाईने लक्ष द्या. कारण कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकतं. ऑफिसमध्ये अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागू शकतो.
लव्ह फोकस : प्रेम संबंधांना कुटुंबियांकडून अनुमती मिळाल्याने लवकरच लग्न ठरु शकतं. याशिवाय वैवाहिक जीवनही सुखी राहील.
खबरदारी : एसिडिटी किंवा गरमीमुळे बेचैनी किंवा जीव घाबरण्यासारखी समस्या उद्भवू शकते. त्यामुळे काळजी घ्या.
लकी रंग : नीळा लकी अक्षर : द फ्रेंडली नंबर : 4
Libra/Scorpio Daily Horoscope Of 12 July 2021 Tula And Vrishchik Rashifal Today
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा.