Libra/Scorpio Rashifal Today 27 July 2021 | व्यवसायाच्या दृष्टीकोनातून वेळ अनुकूल आहे, मेहनत आणि योजनांना चांगले यश मिळेल
आरोग्य ठीक होईल. सांध्यामध्ये थोडासा त्रास होण्याची समस्या जाणवू शकते. गॅसचा त्रास होऊ शकणाऱ्या अपायकारी पदार्थांचा सेवन करू नका.
डॉ. अजय भाम्बी –
मुंबई : मंगळवार 27 जुलै 2021 (Libra/Scorpio Rashifal). मंगळवारचा दिवस हा सर्वांचे आराध्य दैवत गणपतीला समर्पित असतो. मंगळवारी गणपती बाप्पाची विधीवत पूजा केल्याने तो प्रसन्न होतो. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. बाप्पाची कुणावर कृपा असेल. तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या मंगळवारचं संपूर्ण राशीभविष्य (Libra/Scorpio Daily Horoscope Of 27 July 2021 Tula And Vrishchik Rashifal Today) –
तूळ राशी (Libra), 27 जुलै
प्रियजनांबरोबर चांगला वेळ घालवाल. कोणतीही महत्त्वाची कामे तुमच्या नेतृत्वात पूर्ण केली जाऊ शकतात. आराम करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांसह मनोरंजनाच्या योजनादेखील बनविल्या जातील. परंतु दिवसाच्या दुसऱ्या बाजूला काही चिंता वाढू शकतात. जर कोर्टाच्या खटल्याशी संबंधित कामे सुरू असतील तर त्याबद्दल एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक आहे. घाईत कोणताही निर्णय घेऊ नका.
व्यवसायाच्या दृष्टीकोनातून वेळ अनुकूल आहे. मेहनत आणि योजनांना चांगले यश मिळेल. तथापि, इच्छित कार्य चालू ठेवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्नांची आवश्यकता आहे. नोकरदार लोकांचा त्यांच्या कार्यालयातील दबदबा कायम राहील.
प्रेमसंबंध – कौटुंबिक वातावरण सुखद असेल. प्रेमसंबंधही मर्यादित आणि आनंददायी असतील.
खबरदारी – आरोग्य ठीक होईल. सांध्यामध्ये थोडासा त्रास होण्याची समस्या जाणवू शकते. गॅसचा त्रास होऊ शकणाऱ्या अपायकारी पदार्थांचा सेवन करू नका.
लकी रंग – लाल लकी अक्षर – र लकी क्रमांक – 9
वृश्चिक राशी (Scorpio), 27 जुलै
आपली उद्दीष्टे व अपेक्षा पूर्ण होण्याची योग्य वेळ आली आहे. पूर्ण उत्साह आणि परिश्रम घेऊन आपल्या कार्याप्रती प्रयत्नरत रहा. मुलांच्या भविष्याबाबतही योजना आखल्या जातील. अशक्य कामेदेखील धैर्य आणि हिमतीने पूर्ण करू शकाल.
दिवसाच्या दुसऱ्या बाजूला कोणतीही अप्रिय बातमी मिळाल्यामुळे मन काहीसे उदास होईल. जर घरात कोणतीही नवीन वस्तू किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरण विकत घेण्याचा विचार करीत असाल तर तो प्लान पुढे ढकला. लोकांशी वागताना तुमची प्रतिष्ठा व आदर याचा विचार मनात ठेवा.
मालमत्तासंबंधित व्यवसाय यशस्वी होईल. सरकारी क्षेत्राशी संबंधित कामातही तुम्हाला यश मिळेल. वरिष्ठ किंवा उच्च अधिकाऱ्यांशी वादविवाद होऊ शकतात. त्यामुळे नोकरीत अडचणी येऊ शकतात. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा.
प्रेमसंबंध – प्रेम आणि प्रणय यांच्याकडे तुमचे जोरदार आकर्षण असेल. पती-पत्नीचे नाते सुखद राहील.
खबरदारी : आपला आहार आणि दिनचर्या व्यवस्थित ठेवा. पोटात बिघाड होऊ शकतो.
लकी रंग – आकाश निळा लकी अक्षर- म लकी क्रमांक – 5
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…