Lunar eclipse 2022: ग्रहणानंतर करा राशीनुसार दान, मनोकामना होतील पूर्ण
जेव्हा तुमच्या कुंडलीत चंद्र कमजोर असतो, तेव्हा तुम्ही अनेक वेळा नैराश्यात जातो. दान केल्याने याचा प्रभाव कमी होतो.
मुंबई, 2022 सालचे शेवटचे चंद्रग्रहण (Lunar eclipse 2022) भारतासह जगातील अनेक देशांमध्ये दिसले. हे चंद्रग्रहण संपूर्ण चंद्रग्रहण होते आणि ते भारतात दिसत असल्याने त्याचा प्रभाव दीर्घकाळ राहील असे जोतिषशास्त्रज्ञांचे मत आहे. ग्रहण काळात दान करणे खूप फलदायी मानले जाते. ज्यांच्या कुंडलीत चंद्रग्रहणाशी संबंधित काही दोष आहेत त्यांनी यावेळी मंत्रोच्चार करावा किंवा दानधर्म करावा. याशिवाय कुलदेवतीचीसुद्धा आरंहधना करावी. जेव्हा तुमच्या कुंडलीत चंद्र कमजोर असतो, तेव्हा तुम्ही अनेक वेळा नैराश्यात जातो. दान केल्याने याचा प्रभाव कमी होतो. चला तर मग जाणून घेऊया राशीनुसार कोणत्या गोष्टींचे दान करावे.
- मेष- हे चंद्रग्रहण मेष राशीत झाले. मेष राशीच्या लोकांनी ग्रहण सुटल्यानंतर तांदूळ दान करावे. याशिवाय साखर देखील दान करू शकता.
- वृषभ- वृषभ राशीच्या लोकांनी यावेळी दूध आणि दही दान करावे. यामुळे तुमच्या कुंडलीतील चंद्रसंबंधित दोष \दूर होतील.
- मिथुन- मिथुन राशीच्या लोकांनी यावेळी गायीची सेवा अवश्य करावी आणि खीर दान करावी.
- कर्क- चंद्र हा कर्क राशीचा राशिस्वामी आहे. कर्कराशीच्या लोकांनी तांदूळ आणि साखरेचे दान करावे.
- सिंह- सिंह राशीच्या लोकांनी यावेळी साखरेचे दान करावे, चांगले फळ मिळेल.
- कन्या- कन्या राशीच्या लोकांनी पिठाचे दान करावे. पिठाचे दान केल्याने ग्रहणाचा प्रभाव कमी होईल.
- तुला- तूळ राशीच्या लोकांनी दुधाचे दान करावे.
- वृश्चिक- वृश्चिक राशीच्या लोकांनी पैसे दान करावे किंवा एखाद्या गरजूला आर्थिक मदत करावी.
- धनु- धनु राशीच्या लोकांनी साखर किंवा खीर दान करावी. या दोन्ही गोष्टींच्या दानाने फायदा होईल.
- मकर- मकर राशीच्या लोकांनी जलदान करावे. याचा लाभ दीर्घकाळासाठी मिळेल.
- कुंभ- कुंभ राशीच्या लोकांनी यावेळी दूध आणि काळे तीळ दान करावे. यामुळे त्याच्या कुंडलीतील सर्व दोष दूर होतील.
- मीन- मीन राशीच्या जातकांनी अन्नदान करावे. यामुळे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
हे सुद्धा वाचा
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Non Stop LIVE Update