AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lunar Eclipse 2023 : वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण या राशीच्या लोकांना करणार मालामाल, दिवाळी जाणार दणक्यात

यंदाच्या 4 ग्रहणांपैकी हे एकमेव चंद्रग्रहण आहे जे भारतात दिसणार आहे. चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी 9 तास आधी सुरू होतो. चंद्रग्रहण काही राशींसाठी भाग्यवान असेल. चंद्रग्रहण वृश्चिक राशीच्या जीवनातील समस्या दूर करेल. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळेल. कामाबद्दल उत्साह राहील. व्यवसायात अपेक्षित यश मिळवू शकाल.

Lunar Eclipse 2023 : वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण या राशीच्या लोकांना करणार मालामाल, दिवाळी जाणार दणक्यात
चंद्रग्रहण Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 18, 2023 | 3:20 PM

मुंबई : दसऱ्यानंतर वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2023) होणार आहे. शरद पौर्णिमेला म्हणजेच 28 ऑक्टोबरला चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण दुपारी 1.05 ते 2.25 पर्यंत राहील. यंदाच्या 4 ग्रहणांपैकी हे एकमेव चंद्रग्रहण आहे जे भारतात दिसणार आहे. चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी 9 तास आधी सुरू होतो. चंद्रग्रहण काही राशींसाठी भाग्यवान असेल. ज्याचा या राशींवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. या राशीच्या लोकांना अकस्मिक धनलाभ, कर्जाचे प्रकरण मार्गी लागणे, जुणे अडकलेले पैसे परत मिळणे अशा वेगवेळ्या प्रकारे आर्थिक लाभ होतो.

या राशीच्या लोकांना होणार चंद्रग्रहणाचा लाभ

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण फायदेशीर ठरेल. संपत्तीत वाढ होईल. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे जीवन आनंदाने भरले जाईल. नवीन योजनांवर काम करण्यास मदत होईल. वैवाहिक जीवनाशी निगडीत बाबी निश्चित होऊ शकतात. प्रेमप्रकरणात गोडवा राहील. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. जुन्या ओळखीतून फायदा होईल.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण वरदान ठरेल. चंद्रदेव तुमच्या जीवनात सुख-समृद्धी घेऊन येतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कार खरेदीची शक्यता आहे. धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना बनू शकते. नोकरीत तुम्ही तुमचे ध्येय सहज साध्य कराल. व्यावसायात केलेले बदल लाभदायक ठरतील. एखादे नवीन काम भागीदारीत सुरू करण्यासाठी चांगला काळ आहे. आरोग्यात सुधारणा झाल्याने कामांना गती येईल.

हे सुद्धा वाचा

वृश्चिक

चंद्रग्रहण वृश्चिक राशीच्या जीवनातील समस्या दूर करेल. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळेल. कामाबद्दल उत्साह राहील. व्यवसायात अपेक्षित यश मिळवू शकाल. वैवाहिक जीवनाबाबत निर्णय घेण्यासाठी अनुकूल काळ आहे. रोजगाराचे नवीन मार्ग दिसतील. ओळखीच्या लोकांकडून मदत मिळेल. आर्थिक आवक वाढल्याने बचतीचा विचार कराल.

कुंभ

चंद्रग्रहण कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. एखाद्या मित्राची समस्या सोडवण्यात तुम्ही विशेष भूमिका बजावू शकता. गुंतवणूकीसाठी हा योग्य काळ आहे. विवाह इच्छुकांसाठी चांगले स्थळ चालून येईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)