mahamrityunjay mantra : महामृत्यूंजय मंत्राचा जाप करण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे, महादेवाची लाभते कृपा
mahamrityunjay mantra Benefits Marathi महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तीशाली मंत्रांपैकी एक आहे, ज्याचा जप केल्याने माणूस दीर्घायुषी आणि शक्तिशाली बनतो. रुद्राक्ष जपमाळेने महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास दुप्पट लाभ मिळतो. शिवपुराणानुसार या मंत्राचा जप केल्याने अकाली मृत्यू आणि रोगांपासून मुक्ती मिळते.
मुंबई : महामृत्युंजय मंत्राचा दररोज नियमित जप करणाऱ्या व्यक्तीवर महादेवाची विशेष कृपा असते. मंत्र हे एका प्रकारे त्या विशिष्ट देवतेची स्तुती असते. महामृत्यूंजय मंत्रातही भगवान शंकराची स्तूती करण्यात आली आहे. ज्याचा जप केल्याने जीवनातील अनेक संकटे आणि गंडांतर दूर होतात. महामृत्युंजय मंत्र (mahamrityunjay mantra) हा अतिशय शक्तीशाली मंत्रांपैकी एक आहे, ज्याचा जप केल्याने माणूस दीर्घायुषी आणि शक्तिशाली बनतो. रुद्राक्ष जपमाळेने महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास दुप्पट लाभ मिळतो. शिवपुराणानुसार या मंत्राचा जप केल्याने अकाली मृत्यू आणि रोगांपासून मुक्ती मिळते. चला जाणून घेऊया महामृत्युंजय मंत्राचा रोज नियमित जप केल्याने कोणते फायदे होतात.
महामृत्युंजयाच्या जपाचे फायदे
अकाली मृत्यू टळतो
महादेवाच्या आवडत्या महामृत्युंजय मंत्राचा रोज जप केल्यास अकाली मृत्यूची भीती नसते. या मंत्राचा जप केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि दीर्घायुष्याचे वरदान देतात.
रोगांपासून मुक्तता
महामृत्युंजय मंत्राचा रोज जप करणार्या व्यक्तीला शारीरिक त्रासांपासून मुक्ती मिळतेच पण भीती आणि अशक्तपणापासूनही मुक्ती मिळते. त्यामुळे निरोगी शरीर मिळविण्यासाठी दररोज महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.
संपत्तीत वाढ
महामृत्युंजय मंत्राचा दररोज जप केल्यास धनात वाढ होते. या मंत्राचा जप केल्याने भोळेची कृपा तुमच्यावर राहते ज्यामुळे तुम्हाला कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही.
आदरात वाढ
महामृत्युंजय मंत्राचा रोज नियमित जप करणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व प्रभावी बनते. त्यामुळे समाजात त्यांची कीर्ती आणि आदर वाढू लागतो. महामृत्युंजय मंत्राचा रोज नियमित जप करणार्या व्यक्तीला भोले शंकराचा अपार आशीर्वाद मिळतो ज्यामुळे त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. जे जोडपे पुत्र प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत मात्र त्यांना अद्यापही संतती सुख प्राप्त झालेले नाही अश्यांनी रोज 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जाप करावा आणि दर सोमवारी तसेच प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जलाभिषेक करून महादेवाला पुत्र प्राप्तीचा आशिर्वाद मागावा.
महामृत्युंजय मंत्र
ओम त्र्यंबकम यजमाहे सुगंधी पुष्टीवर्धनम्। उर्वरुकमिव बंधनं मृत्युरमुखिया ममृतत् ।
घरात सतत कोणीतरी आजारी राहात असेल तसेच अकाल मृत्यूचे भय किंवा शक्यता असल्यास शक्य असल्यास या मंत्राचा यज्ञ करावा. यामध्ये नऊ प्रकारच्या समिधांची आहूती द्यावी. यज्ञ करण्यापूर्वी आपण तो कशासाठी करतोय याचा संकल्प घ्यावा. या उपायाने महादेवाची विशेष कृपा लाभते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)