Mahashivratri 2023: महाशिवरात्रीवर भद्राचं सावट! जाणून घ्या या दिवशी नेमकं काय करायचं?
महाशिवरात्री हा शिव भक्तांसाठी मोठा उत्सव असतो. या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्याने इच्छा पूर्ण होतात. मात्र यंदाच्या महाशिवरात्रीवर भद्राचं सावट आहे. त्यामुळे भक्तांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. चला जाणून घेऊयात नेमकं काय करायचं ते
मुंबई : भगवान भोलेनाथांची कृपा मिळवण्यासाठी महाशिवरात्री हा सर्वोत्तम दिवस आहे. शिवलिंगावर धोतरा, बेलपत्र आणि भांग अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.महाशिवरात्री यंदा 18 फेब्रुवारी, शनिवारी साजरी केली जाणार आहे. या दिवशी शनि प्रकोपातून दिलासा मिळावा यासाठी उपाय सांगण्यात आले आहे.असं असताना दुसरीकडे भद्राचं सावट असल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. भ्रदा काळ आणि निशित काळ एकत्र आल्याने भक्तांमध्ये चिंता वाढली आहे. नेमकं पूजा करायची की नाही असा प्रश्न पडला आहे. पंचांनुसार महाशिवरात्रीला रात्री 8 वाजून 1 मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी 19 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 6 वाजून 57 मिनिटांपर्यंत भद्राचं सावट असणार आहे. भगवान शिवाची पूजा निशित काळात करण्याची प्रथा आहे.त्यामुळे शिवाचे भक्त संकटात सापडले आहेत. कारण भद्रा काळात शुभ कार्य करत नाही.असं असलं तरी भद्राचा कोणताही प्रभाव महाशिवरात्रीवर पडणार नाही, त्यामुळे निश्चिंतपणे पूजा विधी करू शकता.
भद्राचा प्रभाव मंगळ कार्य आणि शुभ कार्यांवर असते. म्हणजेच लग्न, मुंडन आणि गृहप्रवेशासाठी भद्रा काळ पाहिला जातो. मात्र देवांची पूजा करताना यात कोणतीही अडचण येत नाही. विशेष म्हणजे महाशिवरात्रीला भद्रा पाताळात असणार आहे. त्यामुळे त्याचा पृथ्वीशी काही संबंध नाही. त्यामुळे भद्रा काळातही तुम्ही शिवाची पूजा करु शकता.
महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त
- निशित काळ – 18 फेब्रुवारी, रात्री 11 वाजून 52 मिनट ते 12 बजकर 42 मिनिटांपर्यंत
- पहिला प्रहर – 18 फेब्रुवारी, संध्याकाळी 06 वाजून 40 मिनिटं ते रात्री 09 वाजून 46 मिनिटांपर्यंत
- द्वितीय प्रहर – रात्री 09 वाजून 46 मिनिटांपासून रात्री 12 वाजून 52 मिनिटांपर्यंत
- तृतीय प्रहर – 19 फेब्रुवारी, रात्री 12 वाजून 52 मिनिटांपासून 03 वाजून 59 मिनिटांपर्यंत
- चौथा प्रहर -19 फेब्रुवारी, 03 वाजून 59 मिनिटांपासून सकाळी 07 वाजून 05 मिनिटांपर्यंत
- पारण वेळ – 19 फेब्रुवारी 2023, सकाळी 06 वाजून 10 मिनिटांपासून दुपारी 02 वाजून 40 मिनिटांपर्यंत
महाशिवरात्रीला ग्रहांची स्थिती
महाशिवरात्रीला शनिदेव आपली स्व-रास असलेल्या कुंभ राशीत विराजमान असणार आहेत. दुसरीकडे सूर्यदेव गोचर करुन कुंभ राशीत आल्याने शनि-सूर्य युति तयार झाली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ही युती अशुभ मानली जाते. दुसरीकडे शुक्र ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राचं गोचर काही राशींसाठी शुभ ठरू शकते. पण शनि प्रभाव कमी करण्यासाठी या दिवशी उपाय करू शकता. शिवलिंगावर गंगाजल, दूध, दही, देशी तूप, मध आणि भांग अर्पण करा. यामुळे शनि पीडिचा प्रभाव कमी होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)