Shrawan 2022: श्रावण महिन्यात ‘या’ चार राशींवर असणार महादेवाची कृपा; तुमची रास यात आहे काय?
यंदा श्रावण महिना (Shrawan month 2022) 29 जुलैपासून सुरू होणार असून 27 ऑगस्टला संपणार आहे. श्रावण महिन्यात निसर्ग हिरवागार असतो. सर्वत्र वातावरण् आल्हाददायी व उत्साही असते. झाडे वेली प्रफुल्लित असतात व दिसतात सगळीकडे हिरवेगार गवत पसरलेले दिसते. संध्याकाळी आकाशात अनेक रंगांनी दाटी केलेली दिसते व श्रावण महिन्यात पाउस सुध्दा पडत असतो त्यामुळे सगळीकडे वातावरण सुध्दा […]
यंदा श्रावण महिना (Shrawan month 2022) 29 जुलैपासून सुरू होणार असून 27 ऑगस्टला संपणार आहे. श्रावण महिन्यात निसर्ग हिरवागार असतो. सर्वत्र वातावरण् आल्हाददायी व उत्साही असते. झाडे वेली प्रफुल्लित असतात व दिसतात सगळीकडे हिरवेगार गवत पसरलेले दिसते. संध्याकाळी आकाशात अनेक रंगांनी दाटी केलेली दिसते व श्रावण महिन्यात पाउस सुध्दा पडत असतो त्यामुळे सगळीकडे वातावरण सुध्दा छान असते. शिवभक्तांसाठी हा महिना खूप खास आहे. श्रावण महिन्यात भाविक भगवान शंकराची विधिवत पूजा करतात. धार्मिक मान्यतेनुसार या महिन्यात शिव पृथ्वीवरच वास्तव्य करतात. जाणून घ्या कोणत्या राशींसाठी हा श्रावण महिना अतिशय शुभ फलदायी असणार आहे.
- मेष : या राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आर्थिक स्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात तुम्हाला तुमच्या प्रियजनांचे सहकार्य मिळेल. पैशाची कमतरता भासणार नाही. प्रवासातून पैसे मिळण्याचीही शक्यता आहे. नवीन काम सुरू करू शकाल.
- वृषभ : या राशीच्या लोकांसाठी हा महिना आनंदाचा राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. एकापेक्षा जास्त माध्यमातून पैसे मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. पालकांकडून सहकार्य मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. भगवान शिवाच्या कृपेने तुम्ही तुमच्या करिअरमध्ये खूप प्रगती कराल.
- कर्क: भगवान शिवाच्या कृपेने नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. एखादा नवीन प्रकल्प हाती घेतला जाऊ शकतो. व्यावसायिकांनाही नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. परदेशात नोकरी मिळवण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते. नवीन मित्र बनतील. नोकरीच्या ठिकाणी तुमचा ठसा उमटवता येईल.
- वृश्चिक राशी: नोकरीत बढतीचे योग येतील. पगारातही चांगली वाढ होऊ शकते. नवीन काम सुरू करू शकाल. अडकलेले पैसे मिळतील. यावेळी, तुम्हाला धनलाभ होण्याच्या अनेक संधी दिसत आहेत.
हे सुद्धा वाचा
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)