Palmistry : भाग्यशाली लोकांच्या हातावर असते असे चिन्ह, अचानक होतो धनलाभ
हस्तरेषा शास्त्रात (Palmistry) अनेक रेषा, खुणा, आकार आणि चिन्हे महत्त्वाची मानली जात असली तरी हातावरील या चार रेषा महत्वाच्या असल्याचे सांगण्यात येते. ज्यांच्या मदतीने व्यक्तीच्या आयुष्याविषयी अर्थात जीवनात काय घडणार आहे, याबाबत जाणून घेता येते.
मुंबई : आपले भविष्य आपल्या हातात आहे, असे बरेचवेळा अनेकांच्या तोंडून ऐकले असेल. मात्र, हे खरं आहे. हस्तरेषा शास्त्रात (Palmistry) अनेक रेषा, खुणा, आकार आणि चिन्हे महत्त्वाची मानली जात असली तरी हातावरील या चार रेषा महत्वाच्या असल्याचे सांगण्यात येते. ज्यांच्या मदतीने व्यक्तीच्या आयुष्याविषयी अर्थात जीवनात काय घडणार आहे, याबाबत जाणून घेता येते. म्हणूनच हस्तरेषाशास्त्रात हस्तरेखाच्या या 4 रेषा खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. या रेषा व्यक्तीचे वय, भाग्य, संपत्ती, पात्रता इत्यादीबद्दल सांगतात. हस्तरेषा शास्त्राच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर असलेल्या रेषा आणि खुणा यांचा अभ्यास केल्यास त्याचे भविष्यही कळू शकते. या ओळी आणि चिन्हांद्वारे, नशीब तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी साथ देईल की नाही हे जाणून घेऊ शकता.
त्रिकोण
हस्तरेषा शास्त्रानुसार त्रिकोण अतिशय शुभ मानली जाते. तळहातातील भाग्यरेषा, आरोग्य रेषा आणि मस्तकी रेषा याने तयार होणाऱ्या त्रिकोणाला धन कोठडी म्हणतात. हा त्रिकोण कोठूनही उघडता कामा नये. सर्व बाजूंनी त्याचे बंद असणे शुभ मानले जाते.
ज्या व्यक्तीच्या तळहातावर अशा प्रकारचे त्रिकोण असते ते लोकं बक्कळ पैसा कमावतात. दुसरीकडे, त्रिकोणाच्या आत क्रॉस चिन्ह असल्यास अशा व्यक्तीच्या संपत्तीचा नाश होतो.
अशा लोकांवर असतो भगवान विष्णूंचा आशीर्वाद
जर एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर कमळाचे चिन्ह असेल तर ती व्यक्ती खूप भाग्यवान मानली जाते. कमळ हे भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच तळहातावरील या चिन्हाला विष्णु योग म्हणतात. अशा व्यक्तीवर भगवान विष्णूंची विशेष कृपा असते. कमळाचे चिन्ह असल्यामुळे व्यक्ती नेतृत्व आणि वक्तृत्वात पारंगत होते. अशा व्यक्तीला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
अशा व्यक्तीला मिळतो अचानक पैसा
एखाद्या व्यक्तीच्या तळहाताच्या वरच्या भागात मणिबंधाजवळ जीवनरेषेला माशाचे चिन्ह जोडलेले असेल तर ते खूप शुभ मानले जाते. अशा व्यक्तीला अचानक पैसा मिळतो. या लोकांना परदेशातूनही चांगला लाभ मिळतो. आजूबाजूचे लोकं त्याचा खूप आदर करतात. यासोबतच त्यांना भरपूर वडिलोपार्जित संपत्तीही मिळते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)