AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अत्यंत बुद्धिमान असतात ‘या’ तीन राशींचे लोकं; यांच्याशी पंगा घेणे म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा मारणे!

प्रत्येकच व्यक्तीची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता किंवा बुद्धिमत्ता ही एकमेकांपेक्षा वेगळी असते. कोणत्याही दोन व्यक्तींचा बुद्ध्यांक समान असू शकत नाही.(People of these three zodiac signs) बरेच लोक प्रश्नांची उत्तरे पटकन देतात, तर काही लोक त्याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी बराच वेळ घेतात. कोणत्याही व्यक्तीचा बुद्ध्यांक हा त्यांच्या बुद्धिमत्तेच्या पातळीवर आधारित असतो (very intelligent). ज्योतिषांच्या […]

अत्यंत बुद्धिमान असतात 'या' तीन राशींचे लोकं; यांच्याशी पंगा घेणे म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा मारणे!
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 6:50 PM

प्रत्येकच व्यक्तीची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता किंवा बुद्धिमत्ता ही एकमेकांपेक्षा वेगळी असते. कोणत्याही दोन व्यक्तींचा बुद्ध्यांक समान असू शकत नाही.(People of these three zodiac signs) बरेच लोक प्रश्नांची उत्तरे पटकन देतात, तर काही लोक त्याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी बराच वेळ घेतात. कोणत्याही व्यक्तीचा बुद्ध्यांक हा त्यांच्या बुद्धिमत्तेच्या पातळीवर आधारित असतो (very intelligent). ज्योतिषांच्या मते ग्रह आणि नक्षत्रांचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वावर पडतो. ढोबळमानाने पाहिल्यास राशीनुसार बुद्ध्यांक आणि बुद्धिमत्ता सांगितली आहे. जोतिष्यशास्त्राच्या मते  बुद्धिमत्ता देखील व्यक्तीच्या राशीशी संबंधित आहे. काही विशेष राशी आहेत, ज्यांची बुद्धिमत्ता खूप जास्त आहे, सामान्य लोकांना देखील ते समजणे कठीण आहे. एकूण १२ राशी आहेत आणि प्रत्येक राशीचे स्वतःचे गुण आहेत. द्यापैकी काही विशेष राशींबद्दल जाणून घेऊया

  1. मेष- मेष राशीला खूप बुद्धिमान मानले जाते. या राशीचे लोक नेहमी सतर्क असतात. त्यांचे डोळे आणि कान नेहमी उघडे असतात. सतत काहीतरी नवीन करण्याचा विचार त्यांच्या मनात येतो. ते त्यांच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घेऊन पुढे जातात. या राशीचे लोक खूप बुद्धिमान आणि बुद्धिवादी मानले जातात. त्यांच्यात उत्तम नेतृत्व क्षमता असते. ते खूप मेहनती असतात. आपल्या मेहनतीने ते आपल्या करिअरमध्ये चांगले स्थान मिळवतात. त्यांच्यात खूप आत्मविश्वास असते. हाती घेतलेल्या कामात यश मिळाल्यावरच ते शांत  होतात.
  2. मिथुन- बुध हा या राशीचा स्वामीग्रह आहे. ज्योतिषशास्त्रात बुध हा बुद्धी आणि ज्ञानाचा कारक ग्रह मानला जातो. बुध ग्रहाच्या प्रभावाखाली मिथुन राशीचे लोक खूप हुशार आणि प्रतिभावान असतात. वाचन आणि लेखनात ते आघाडीवर असतात. त्याच्या कुशाग्र बुद्धीमुळे त्या सर्वत्र कौतुकाचा विषय बनतात. त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे ते कोणतेही काम उत्तमपणे करू शकतात. या राशीच्या लोकांना कधीही मूर्ख समजण्याची चूक करू नये. कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे या लोकांना गणित हा विषय अतिशय प्रिय असतो.
  3. वृश्चिक- या राशीचा स्वामीग्रह मंगळ आहे. ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीचे लोक सर्वात बुद्धिमान असतात. यासोबतच त्यांच्यात चातुर्यसुद्धा असते. या राशीच्या लोकांना मूर्ख बनवणे कठीण असते असे म्हणतात. ते प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घेतात. या लोकांना चैनीचे जीवन जगणे आवडते. ज्यासाठी ते खूप मेहनतही करतात. हे लोक गर्दीतही आपली छाप पाडतात. त्यांचे जीवन सुखाने भरलेले असते. या राशीचे लोक गंभीर स्वभावाचे असतात. या लोकांना इतरांच्या युक्त्या लवकर समजतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

हे सुद्धा वाचा
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.