झोपताना उशीखाली ठेवा ही वस्तू; आयुष्यात कधीच भासणार नाही पैशांची कमी
ज्योतिष शास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये शुभ फळ मिळून मोठा लाभ होऊ शकतो.

ज्योतिष शास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये शुभ फळ मिळून मोठा लाभ होऊ शकतो. या उपायांपैकीच एक उपाय म्हणजे झोपताना उशी खाली काही विशिष्ट गोष्टी ठेवणे. वास्तुशास्त्रानुसार तुम्ही जर अशा गोष्टी झोपताना तुमच्या उशीखाली ठेल्या तर त्यामुळे केवळ तुमच्या जवळपास असणारी नकारात्मक ऊर्जाच नष्ट होत नाही तर त्यामुळे तुमच्या धनामध्ये देखील वाढ होते, तुमची तिजोरी पैशांनी सतत भरलेली राहाते. तसेच तुम्हाला शांती देखील मिळते, अशा कोणत्या गोष्टी आहेत? त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
मोराचे पंख : मोराच्या पंखाला वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे. तुम्ही जर मोराचे पंख झोपताना तुमच्या उशीखाली ठेवल्यास तुम्हाला काही चमत्कारी फायदे अनुभवायला मिळू शकतात. यामुळे तुमचे पैशांशी संबंधित जेवढ्या काही समस्या आहेत, तेवढ्या हळूहळू नष्ट होतील, घरात समुद्धी येईल, तिजोरी पैशांनी भरेली राहील.
लसनाच्या पाकळ्या : वास्तुशास्त्रानुसार ज्या लोकांना वाईट, भीतीदायक स्वप्न पडतात त्या लोकांनी आपल्या उशीखाली लसनाच्या पाकळ्या ठेवून झोपावे. त्यांना भीतीदायक स्वप्न पडणार नाहीत.तुमच्या आसपास असलेली नकारात्मक ऊर्ज नष्ट करण्याचं काम लसून करतो. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, तसेच तुम्हाला यामुळे शांत झोप लागण्यास देखील मदत होते.
हळकुंड : ज्यांचा गुरु ग्रह कमजोर आहे, अशा लोकांनी आपल्या उशीखाली हळकुंड ठेवून झोपावे, याचा खूप शुभ परिणाम तुमच्या आयुष्यात होतो. नोकशी संबंधित सर्व समस्या नाहीशा होतात, नोकरीत प्रमोशन देखील मिळू शकते. व्यावसायात फायदा होतो.
मुगदाळ, लाल चंदन : या दोन गोष्टी देखील खूप प्रभावी आहेत, झोपताना तुम्ही जर मुगदाळ किंवा लाल चंदन तुमच्या उशिखाली ठेवले तर घरातील सर्व नकारात्मक ऊर्ज नाहीशी होते. घरातील दोष दूर होतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)