Rahu Ketu Story : अशा प्रकारे झाला होता राहूचा जन्म, पुराणात दिली आहे माहिती
राहु नेहमीच वाईट परिणाम देतो असे नाही. राहूबद्दल जोतिषशास्त्रात असे म्हणतात की, जेव्हा राहू चांगले परिणाम देतो तेव्हा दुसरा कोणताही ग्रह त्याची बरोबरी करू शकत नाही. हा एक असा ग्रह आहे जो रात्रीतून नशीब घडवतो.
मुंबई : श्रीमद भागवत पुराणानुसार महर्षि कश्यप यांची पत्नी दानू हिला विप्रचित्ती नावाचा मुलगा होता ज्याचा विवाह हिरण्यकश्यपूची बहीण सिंहिका हिच्याशी झाला होता. राहूचा (Importance of Rahu in Astrology) जन्म सिंहिकेच्या गर्भातून झाला, म्हणूनच राहूचे नाव सिंहिकेय आहे. भगवान विष्णूच्या प्रेरणेने जेव्हा देव आणि दानवांनी सागर मंथन केले तेव्हा त्यातून इतर रत्नांव्यतिरिक्त अमृतही प्राप्त झाले. भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून देव आणि दानवांना मोहिनी घातली आणि स्वतः अमृत वाटण्याचे काम केले आणि प्रथम देवांना अमृत पाजण्यास सुरुवात केली. राहूला संशय आला आणि तो देवांचा वेष धारण करून सूर्यदेव आणि चंद्रदेवांच्या जवळ बसला.
विष्णूने राहूला अमृत अर्पण सुरू करताच सूर्य आणि चंद्राने विष्णूला त्याची माहिती दिली, कारण त्यांनी राहूला ओळखले होते. त्याचवेळी भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने राहूचे डोके धडापासून वेगळे केले. पण त्याआधी राहूच्या घशात अमृताचे काही थेंब गेले होते, त्यामुळे तो मस्तक आणि शरीर या दोन्ही रूपात जिवंत राहिला. मस्तकाला राहू आणि धडाला केतू म्हणतात.
राहूदेखील शुभ फल देतो
राहु नेहमीच वाईट परिणाम देतो असे नाही. राहूबद्दल जोतिषशास्त्रात असे म्हणतात की, जेव्हा राहू चांगले परिणाम देतो तेव्हा दुसरा कोणताही ग्रह त्याची बरोबरी करू शकत नाही. हा एक असा ग्रह आहे जो रात्रीतून नशीब घडवतो. तो राजाला रंक आणि रंकाला राजा करू शकतो. याचा अर्थ राहु शुभ आणि अशुभ दोन्ही फल देतो. राहू पत्रिकेतील स्थान आणि व्यक्तीच्या कर्मांच्या आधारावर परिणाम देतो.
राहू मजबूत करण्यासाठी काय करावे?
- अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा.
- गरिबांना दान करा.
- राहू यंत्राची स्थापना करा.
- स्वयंपाकघरात जेवण करा.
- शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका.
- तसेच शिव सहस्रनाम आणि हनुमंत सहस्रनामाचे पठण करा.
- विद्येची देवी सरस्वती ही राहूची आवडती देवी मानली जाते, सरस्वतीची पूजा केल्याने राहूचे दोषही दूर होतात.
- कोणत्याही प्रकारची नशा करू नका.
- चुकीच्या संगतीपासून दूर राहा.
- कोणाचेही नुकसान करू नका.
- स्वच्छतेचे नियम पाळा.
- कर्ज घेऊ नका.
- आळसापासून दूर राहा.
- वाणी चांगली ठेवा.
- फाटलेले आणि घाणेरडे कपडे घालू नका.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)