Relationship Astrology : आयुष्यभर सिंगल राहतात ‘या’ राशीचे लोक; प्रेमात धोका मिळाल्याने ताकही फुंकून पितात!
Most Unlucky Zodiac Signs In Love : ज्योतिषशास्त्रात अशा काही राशी सांगितलेल्या आहेत, ज्यांना प्रेमात कायम धोका मिळतो. या राशींना आयुष्यात कधीच खरं प्रेम मिळत नाही.

प्रत्येकाच्या जीवनात प्रेम हे सुंदर आणि नाजूक वळण असते. या वळणावर मिळणारे अनुभव आयुष्यात बरंच काही शिकवून जाते. पण आपण ज्यांच्यावर प्रेम केलं आहे, त्यांची साथ आपल्याला आयुष्यभर लाभतेच असं नाही. काहींना प्रेमात धोका मिळतो. अशावेळी काही व्यक्तींच्या प्रेमात विश्वासघात झाल्याच्या जखमा आयुष्यभर ताज्याच असतात. आयुष्य विरहाच्या गर्तेत हरवून जाते.
ज्योतिषशास्त्रात अशा काही राशी सांगितलेल्या आहेत, ज्यांना प्रेमात कायम धोका मिळतो. या राशींना आयुष्यात कधीच खरं प्रेम मिळत नाही. त्यामुळे प्रेमात अनुभवाला आलेल्या वाईट प्रसंगामुळे हे लोक कोणावरही सहज विश्वास ठेवत नाही. अशा 4 राशींचा उल्लेख ज्योतिषशास्त्रात केलेला आहे, ज्यांना प्रेमात निराशाच हाती लागते. आज आम्ही तुम्हाला त्याच राशींबद्दल सांगणार आहे.
वृश्चिक रास या राशीचे लोक फारच रहस्यमयी स्वभावाचे असतात. यांचे जीवन रहस्याने भरलेले दिसते. या राशीच्या व्यक्तींकडे लोक आकर्षित होतात, पण जास्त काळ ते यांच्या आयुष्यात टिकून राहत नाहीत. वृश्चिक राशीचे लोक स्पष्ट बोलणारे असतात. जे मनात येईल ते पटकन बोलून टाकतात. त्यामुळे साथीदाराच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे लवकरच यांचं नातं संपुष्टात येतं. या राशीचे लोक थोडे रागीट स्वभावाचे देखील बघायला मिळतात. त्यामुळे नात्यात वाद झाल्यास रागात वृश्चिक राशीचे लोक असं काही करून बसतात कि यांचा जोडीदार यांना सोडून जातो. म्हणून वृश्चिकच्या लोकाना खर प्रेम मिळणं खूप अवघड असतं.
मिथुन रास मिथुन राशीचे लोक आपल्या जोडीदारापेक्षा आपल्या कामावर जास्त लक्ष देतात. या राशीचे लोक जोडीदाराला हवा तो वेळ देऊ शकत नाहीत. त्यांच्या इच्छा भावना समजण्यात कमी पडतात. भविष्य घडवण्यावर यांचे जास्त लक्ष असते. परिणामी यांचा जोडीदार यांच्यावर नाराज होतो आणि यांना सोडून जातो.
सिंह रास सिंह राशीचे लोक फारच आक्रमक स्वभावाचे असतात. स्वतःच्या जोडीदारावर वर्चस्व गाजवण्याचा यांचा प्रयत्न असतो. यांचा क्रोध यांचा सर्वात मोठा शत्रू असतो. अवेळी येणारा राग यांची कमजोरी असते. क्रोधावर नियंत्रण नसल्यामुळे यांचे प्रेम जास्त काळ टिकून राहत नाही.
कुंभ रास कुंभ राशीच्या लोकांचे जीवन संकटांनी भरलेले असते. एक संकट जाते न जाते तेच दुसरे संकट उभे राहते. यांच्या जीवनात संकटाची जणू मालिकाच सुरु असते. परिणामी संकटांना तोंड देण्यातच यांचा सर्व वेळ जात असतो. यांच्या जीवनात येणाऱ्या याच संकटांना कंटाळून यांचा जोडीदार यांना सोडून जात असतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)