शनी-राहूची युती ठरणार त्रासदायक, या 3 राशीच्या लोकांनी 2 महिने जरा सांभाळूनच राहा
ज्योतिष शास्त्रात शनि आणि राहू हे दोन ग्रह खूप महत्त्वाचे मानले जाते. राहू आणि शनीची युती झाल्यामुळे तीन राशींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
Saturn-Rahu Conjunction 2023 : शनीला वैदिक ज्योतिषशास्त्रात न्याय देवता मानले जाते. राहू मात्र त्रास देणारा ग्रह मानला जातो. त्यामुळे कुंडलीत या दोन ग्रहांची स्थिती खूप महत्त्वाची मानली जाते. शनीने नुकताच शतभिषा नक्षत्रात प्रवेश केलाय. राहू हा शतभिषा नक्षत्राचा स्वामी असून शनीने नक्षत्र बदलल्यानंतर शनी राहूची युती झाली आहे. ही युती ऑक्टोबरपर्यंत राहणार असून सर्व 12 राशींवर याचा परिणाम दिसणार आहे. शनी 17 ऑक्टोबर 2023 पर्यंत शतभिषा नक्षत्रात राहील. याचा 3 राशीच्या लोकांना त्रास होऊ शकतो. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घेऊयात.
कोणत्या राशींना होणार त्रास ?
- कुंभ – शनी-राहूच्या युतीमुळे कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक फटका बसू शकतो. आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. कामे बिघडू शकतात. कोणाशीही वाद-विवाद करणे टाळावे. ही वेळ संयम ठेवण्याची असल्याने शांत राहा.
- कन्या – शनीने शतभिषा नक्षत्रा प्रवेश केल्यामुळे शनी-राहूची युती ही कन्या राशीच्या लोकांनाही त्रासदायक ठरु शकते. कन्या राशीच्या लोकांना देखील आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. कोणाशी वाद घालू नका. कायदेशीर अडचणीत अडकू नका. तणावापासून दूर राहा.
- कर्क – शनि-राहूच्या अशुभ युतीचा कर्क राशीच्या लोकांवर परिणाम दिसू शकतो. या राशीच्या लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. उत्पन्न कमी होऊ शकते. आरोग्याची समस्या ही येऊ शकते. काही कामात अडथळे येतील पण संयम ठेवा. घाबरुन जावू नका.
(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती ही सामान्य माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे. टीव्ही ९ मराठी याची पुष्टी करत नाही.)