शनि देवांचं राशीपरिवर्तन; या राशीच्या लोकांच्या वैवाहिक आयुष्यात येणार भूकंप, जाणून घ्या उपाय
शनि देव यांना न्यायाची देवता म्हणून ओळखलं जातं. तसेच शनि देव हे कर्मफळ दाता देखील आहेत. ते व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात.

शनि देव यांना न्यायाची देवता म्हणून ओळखलं जातं. तसेच शनि देव हे कर्मफळ दाता देखील आहेत. ते व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. आता शनि देव 29 मार्च रोजी कुंभ राशीमधून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार शनि देवाच्या राशी परिवर्तनाचा बाराही राशीवर परिणाम होणार आहे. हा परिणाम शुभ किंवा अशुभ असू शकतो. सर्व ग्रहांमध्ये शनि देवांची चाल ही धिमी असते. त्यांना एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षांचा काळा लागतो. आता शनि देव 29 मार्च रोजी मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत, त्याचा कन्या राशींच्या व्यक्तीवर समिश्र परिणाम होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात.
वैवाहिक जीवन – शनि देवांची कन्या राशीच्या सप्तम भावात दृष्टी पडणार आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनात तुम्हाला सावध राहावे लागणार आहे.विशेष काळजी घेण्याची गरज आहे.या काळात तुमचे तुमच्या पत्नीसोबत भांडणं होऊ शकतात. वादविवाद होऊ शकतात. जर तुम्ही तुमच्या पती, पत्नीसोबत प्रामाणिक असाल तर काळजी करण्याचं काम नाही, शनिदेव तुम्हाला शुभ फळ देतील. मात्र जर तसं नसेल तर तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो.
व्यावसाय, करिअर – या काळात कन्या राशींच्या लोकांना त्यांच्या व्यवसायामध्ये, करिअर नोकरीमध्ये काही उतार चढावांचा सामना करावा लागू शकतो. मात्र ही परिस्थिती फार काळ राहणार नाही. तुमचं अनेक दिवसांपासून एखादं काम अडलेलं असेल तर ते या काळात पूर्ण होण्याचे संकेत मिळत आहेत. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुकूल वातावरण आहे.
आर्थिक – तुमच्या सोबत काही गोष्टी अशा घडतील ज्यामुळे तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो.उत्पन्नाचे नवे स्त्रोत तुम्हाला या काळात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
आरोग्य – या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीचं आरोग्य देखील या काळात बिघडण्याची शक्यता आहे.
उपाय – ज्यांची रास कन्या आहे, अशा लोकांनी शनि देवांच्या त्रासापासून वाचण्यासाठी प्रत्येक शनिवारी एका लोखंडी किंवा कांस्य धातुच्या कुंडीमध्ये तेल घेऊन ते शनि देवाला अर्पण करावे यामुळे तुम्हाला शनि देवाचा आशीर्वाद मिळेल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)