स्वप्नात तुम्ही स्वत:ला टक्कल पडल्याचं पाहिलं का? यामागचं शास्त्र जाणून घ्या
Dream: रात्री झोपल्यानंतर पडलेली स्वप्न आपल्याला भविष्याचे संकेत देत असतात. अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो. कधी कधी आपल्या रोजच्या जगण्याचं प्रतिबिंब देखील असू शकतं.
मुंबई : रात्री गाढ झोपी गेल्यानंतर अनेकदा आपल्याला चित्रविचित्र स्वप्न पडतात. काही स्वप्न इतकी भीतीदायक असतात की संपूर्ण दिवस त्या विचारात जातो. स्वप्नशास्त्रात प्रत्येक स्वप्नाचा गूढ अर्थ सांगण्यात आला आहे. स्वप्नांचा आपल्या जीवनावर परिणाम होतो. आपण ज्या परिस्थितीतून जात असतो, तशीच स्वप्न आपल्याला पडतात.अनेकदा ही स्वप्न भविष्याचे संकेत देत असतात. काही स्वप्न आपल्याला जीवनात नकारात्मक प्रभाव देखील टाकतात. त्यामुळे काही स्वप्नांबाबत आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगणं गरजेचं आहे. अशाच एका स्वप्नाचा शास्त्रातून उलगडा करणार आहोत.जर तुम्ही स्वप्नात स्वत:ला टक्कल पडल्याचं पाहिलं तर ते असुरक्षा आणि कमजोरीचं लक्षण आहे. पण यामुळे कोणती अक्रीत घटना घडेल असं अजिबात नाही. चला जाणून घेऊयात काय सांगतं स्वप्नशास्त्र
- स्वप्नात तुम्ही स्वत:ला टक्कल पडल्याचं पाहिलं तर येणाऱ्या दिवसात काहीतरी संकट येण्याचे संकेत आहेत. घरात वादविवाद होण्याची देखील शक्यता असते.
- जर महिलेनं स्वत:ला टक्कल पडल्याचं पाहिल्यास वैवाहिक जीवन अंत्यत शुभ आणि यशस्वीरित्या पार पडत आहे. तसेच भविष्यात आणखी यश मिळण्याची शक्यता आहे.
- स्वप्नात अनेकदा केस गळताना दिसतात. याचा अर्थ महत्त्वाची संधी हातून निसटण्याची शक्यता असते. तसेच समाजात मान सन्मान देखील कमी होतो.
- जर तुम्ही स्वप्नात स्वत:चं मुंडन करताना पाहिलं तर लवकरच मोठं संकट येण्याची शक्यता असते. आर्थिक स्थिती बिकट होण्याची शक्यता असते.
शुभ स्वप्नांचे काय संकेत आहेत?
तुम्हाला स्वप्नात पांढरा कुत्रा दिसला तर ते शुभ संकेत मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात पांढरा कुत्रा दिसणे जीवनात आनंद आणि सकारात्मकता येण्याचे लक्षण आहे. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात बोलणारा पोपट दिसला तर ते तुमच्या आयुष्यातील चांगले नाते दर्शवते. अशी स्वप्ने तुमच्या नात्यातील गोडपणाचे प्रतीक आहेत. स्वप्न शास्त्रात पोपट दिसणे शुभ मानले जाते. हे आयुष्यात येणारे सुख आणि दर्शवते. जर तुम्ही स्वप्नात स्वतःला तीर्थयात्रेला जाताना अनुभवत असाल तर ते तुमच्यासाठी खूप शुभ मानले जाते. अशी स्वप्ने आयुष्यात घडणाऱ्या सकारात्मक घटनांकडे निर्देश करतात. असे स्वप्न पाहिल्याने तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. स्वप्नात ढग दिसणे शुभ लक्षण मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार मेघ व्यक्तीचे यश आणि सन्मान दर्शवतो. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात ढग निघून जाताना दिसले तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात यश, पैसा दार ठोठावणार आहे. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये झटपट प्रगती करू शकता.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)