AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sadesati: जानेवारी 2023 मध्ये ‘या’ राशींना सुरु होणार आहे शनीची साडेसाती, तुमची रास यात आहे काय?

shani Sadesati will begin in January 2023 in this sign do this remady

Sadesati: जानेवारी 2023 मध्ये 'या' राशींना सुरु होणार आहे शनीची साडेसाती, तुमची रास यात आहे काय?
शनिदेव Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 08, 2022 | 9:02 AM

मुंबई, शनि हा सर्वात हळू चालणारा ग्रह आहे. त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षे लागतात. सध्या मिथुन आणि तूळ राशीच्या शनीची साडेसाती (Shani Sadesati 2023) सुरू आहे. शनिदेव मकर राशीत आहेत, 17 जानेवारी रोजी ते कुंभ राशीत प्रवेश करतील, जिथे ते 29 जानेवारी 2025 पर्यंत सुमारे अडीच वर्षे राहतील. कुंभ राशीत प्रवेशासोबतच शनि कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांच्या कर्मांवरदेखील लक्ष ठेवतील. या राशीच्या लोकांसाठी जैसे कर्म तैसे फळ असा हा काळ राहणार आहे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काय करावे याबद्दल जाणून घेऊया.

शनीची अडिचकी काय असते?

शनीची साडेसाती साडेसात वर्षे चालते, ज्यामध्ये अडीच वर्षांचे तीन तीन टप्पे असतात. अशाच प्रकारे जेव्हा शनि तुमच्या राशीपासून चौथ्या व आठव्या राशीत प्रवेश करतो तेव्हा पुढची अडीच वर्षे ही ‘अडीचकी’ किंवा पनवतीची असतात असे मानले जाते. म्हणून साडेसाती संपल्यावर अडीच वर्षांनंतर पुन्हा चौथा शनी येतो तेव्हा अडीचकी येते. तसेच साडेसाती संपल्यावर साधारणत: साडेबारा वर्षांनंतर शनी आठवा होतो, तेव्हाही अडीचकी येते.

हे सुद्धा वाचा

साडेसातीच्या काळात या गोष्टी लक्षात ठेवा

अहंकाराला मुरड घालावी लागेल. यामुळे परस्पर संबंधात दुरावा निर्माण होऊ शकतो. निर्धारित लक्ष्य गाठण्यासाठी कठोर परिश्रम सोडू नका. कठोर परिश्रम केल्यावरच तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळेल. तुम्हाला अनैतिक काम करणे आणि तुमच्या भल्यासाठी कोणाशी तरी कट रचणे टाळावे लागेल, अन्यथा तुम्ही कायदेशीर कारवाईत अडकू शकता. त्याच वेळी, आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

आरोग्याला प्राधान्य द्या

तुमची दिनचर्या चांगली ठेवा, स्वतःला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग आणि ध्यान करा. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, कारण रागाच्या भरात कोणाशीही मतभेद झाल्यास तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. आणि पचण्याजोगे अन्न खा. यासोबतच शरीराला आवश्यक तेवढेच खा, नाहीतर पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. दुसरीकडे, जर तुम्ही गरजूंना मदत करण्यासाठी पुढे राहिलात तर तुम्हाला शनीच्या त्रासातून आराम मिळू शकतो.

हे उपाय करा

  1.  हनुमान चालिसाचे पठण करा.
  2.  दर शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.
  3.  शक्य असल्यास, आपल्या क्षमतेनुसार अपंगांना मदत करा.
  4. मद्यपान आणि मांसाहार करू नका.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे.
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?.
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला.
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई.
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या.
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट.
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी.
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न.
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल.