Shani Vakri 2023 : न्यायदेवता शनिदेव होणार वक्री, 139 दिवस पाच राशींसाठी ठरणार त्रासदायक

Shani Vakri 2023 : शनिदेव स्वराशी असलेल्या कुंभ राशीत विराजमान आहेत. अडीच वर्षांसाठी ठाण मांडून बसले तरी वक्री, उदय, अस्त अशा ज्योतिषीय घटना घडत असतात. त्यामुळे राशी चक्रावर त्याचा परिणाम दिसून येतो.

Shani Vakri 2023 : न्यायदेवता शनिदेव होणार वक्री, 139 दिवस पाच राशींसाठी ठरणार त्रासदायक
Shani Vakri 2023 : शनिदेव कुंभ राशीत 139 दिवस चालणार वक्री चाल, पाच राशींची धाकधूक वाढणार
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 2:48 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात सर्वाधिक चर्चा असते ती शनिदेवांची. कारण शनिदेव एकदा का राशीला आले की, भल्याभल्यांना घाम फोडतात. त्यामुळे पळता भूई थोडी होते. कारण शनिदेव जातकाला त्याच्या कर्मानुसार फळं देतात. 17 जानेवारी 2023 पासून शनिदेव स्वरास असलेल्या कुंभ राशीत विराजमान आहेत. त्यानंतर शनिदेव अस्ताला गेला आणि काही कालावधीनंतर उदीत झाला. आता कुंभ राशीत शनिदेव वक्री अवस्थेत जाणार आहे. 17 जून 2023 रोजी रात्री 10 वाजून 48 मिनिटांनी वक्री अवस्थेत जातील. ही स्थिती कुंभ राशीत 4 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 8 वाजून 26 मिनिटांपर्यंत राहील. त्यानंतर मार्गस्थ होतील.

एकीकडे, गुरु राहुच्या युतीमुळे चांडाळ योग, दुसरीकडे शनिची वक्री चाल यामुळ पाच राशीच्या जातकांना जबर फटका बसेल. उद्योग, नोकरी व्यवसायात तुम्हाला चढ उतार दिसून येईल. त्यामुळे या काळात काळजी घेणं गरजेचं आहे.

शनि वक्री झाल्यानंतर या राशींनी जरा सांभाळूनच

मेष : गुरु राहुमुळे चांडाळ योग त्यात शनिच्या वक्री चालीमुळे या राशीवर परिणाम दिसू येईल. खूप मेहनत घेऊनही हाती हवा तसा मोबदला पडणार नाही. त्यामुळे अस्वस्थता वाढेल. शारीरिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागेल. वैवाहिक आणि लव्ह लाईफमध्ये अडचणी येतील. तसेच आरोग्य विषयक तक्रारी दिसून येतील. आर्थिक स्थितीही या काळात खालावेल.

वृषभ : या राशीच्या दशम स्थानात शनि वक्री होणार आहे. त्यामुळे एका पाठोपाठ एक असा संकटचा मारा होईल. नोकरीच्या ठिकाणी त्रास होईल. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर जरा थांबा. काही कामं करूनही ती न केल्यासारखीच होतील. कौटुंबिक वातावरण बिघडेल.

कर्क : या राशीच्या जातकांना शनिची अडीचकी सुरु आहे. त्यात अष्टम भावात शनि वक्री होत असल्याने या राशीच्या जातकांना त्रासाला सामोरं जावं लागेल. शत्रूपक्ष तुमच्यावर हावी होईल. तसेच न्यायलयीन प्रकरणात फटका बसू सकतो. मानसिक त्रास झाल्याने आरोग्य विषयक तक्रारी उद्भवतील. वैवाहिक जीवनात अडचणी येतील.

तूळ : या राशीच्या पंचम स्थानात शनि वक्री होत आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या जातकांना थोडा त्रास होईल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण तुम्हाला फटका बसू शकतो. लव्ह लाईफमध्ये तुम्हाला त्रास होईल. तसेच पत्नीसोबत वाद होण्याची शक्यता आहे.

कुंभ : शनिदेवांची ही स्वरास असून याच राशीत शनिदेव विराजमान आहेत. साडेसाती आणि वक्री अवस्था यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो. आरोग्य विषयक तक्रारी जाणवतील. वैवाहिक जीवनात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. करिअरमध्ये तुम्हाला चढउतार दिसून येईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Non Stop LIVE Update
मनसेत नाराज? राज ठाकरेंच्या शिलेदारानं उद्धव ठाकरेंची मशाल घेतली हाती
मनसेत नाराज? राज ठाकरेंच्या शिलेदारानं उद्धव ठाकरेंची मशाल घेतली हाती.
अजित पवार की युगेंद्र पवार? बारामती कोणाची? काका-पुतण्या भिडले
अजित पवार की युगेंद्र पवार? बारामती कोणाची? काका-पुतण्या भिडले.
राणांची यशोमती ठाकूरांवर टीका, 'माझी नणंदबाई मेलेल्या माणसाच्या...'
राणांची यशोमती ठाकूरांवर टीका, 'माझी नणंदबाई मेलेल्या माणसाच्या...'.
'इंजिन-मनसे घेऊन बसा', पक्ष-चिन्हाच्या टीकेवर दादांचं राज यांना उत्तर
'इंजिन-मनसे घेऊन बसा', पक्ष-चिन्हाच्या टीकेवर दादांचं राज यांना उत्तर.
सलमान नंतर बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारच्या जीवाला धोका, आला धमकीचा फोन
सलमान नंतर बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारच्या जीवाला धोका, आला धमकीचा फोन.
राऊतांना 'सिल्व्हर ओक'चा बुलडॉग म्हटल तर चालेल का?, भाजप नेत्याचा सवाल
राऊतांना 'सिल्व्हर ओक'चा बुलडॉग म्हटल तर चालेल का?, भाजप नेत्याचा सवाल.
शरद पवारांच्या निवृत्तीवर अजितदादांचं मिश्कील भाष्य, 'मला तर मागचा...'
शरद पवारांच्या निवृत्तीवर अजितदादांचं मिश्कील भाष्य, 'मला तर मागचा...'.
खोत फडणवीसांचा कुत्रा तर राऊत साप, दोघांच्या भांडणात भाजप नेत्याची उडी
खोत फडणवीसांचा कुत्रा तर राऊत साप, दोघांच्या भांडणात भाजप नेत्याची उडी.
'डुक्कराला कितीही साबण शॅम्पू लावला तरी ते..', खोतांचा राऊतांवर पटलवार
'डुक्कराला कितीही साबण शॅम्पू लावला तरी ते..', खोतांचा राऊतांवर पटलवार.
पवारांवरील त्या वक्तव्यानंतर खोत म्हणाले, 'ही गावगाड्याची भाषा पण...'
पवारांवरील त्या वक्तव्यानंतर खोत म्हणाले, 'ही गावगाड्याची भाषा पण...'.