Shardiya Navratri 2021 : देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीत आपल्या राशीनुसार या रंगाची फुलं अर्पण करा
आज नवरात्रीचा पाचवा दिवस आहे. या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते. यावेळी नवरात्री 07 ऑक्टोबर पासूनसुरु झाली आहे जी 14 ऑक्टोबरपर्यंत असेल. या नऊ दिवस देवी दुर्गाची विविध रूपात पूजा केली जाते. अनेक लोक नवरात्रीच्या काळात मातेला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात. असे मानले जाते की नवरात्रीच्या काळात देवी दुर्गा पृथ्वीवर येते आणि तिच्या भक्तांचे सर्व त्रास दूर करते.
मुंबई : आज नवरात्रीचा पाचवा दिवस आहे. या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते. यावेळी नवरात्री 07 ऑक्टोबर पासूनसुरु झाली आहे जी 14 ऑक्टोबरपर्यंत असेल. या नऊ दिवस देवी दुर्गाची विविध रूपात पूजा केली जाते. अनेक लोक नवरात्रीच्या काळात मातेला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात. असे मानले जाते की नवरात्रीच्या काळात देवी दुर्गा पृथ्वीवर येते आणि तिच्या भक्तांचे सर्व त्रास दूर करते.
ज्योतिषांच्या मते, देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी राशीनुसार फुलं अर्पण करणे शुभ आहे. यामुळे देवी दुर्गा लवकर प्रसन्न होते. कोणत्या राशीच्या व्यक्तीला कोणत्या रंगाचे फूल अर्पण करावे ते जाणून घ्या –
1. मेष – मेष राशीच्या लोकांनी लाल रंगाची फुले अर्पण करावीत. भक्त गुलाब, लाल कणेर आणि कमळाचे फूल अर्पण करु शकतात.
2. वृषभ – या राशीच्या व्यक्तीने देवीला पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करावीत. नवरात्रीमध्ये बेला, हरश्रृंगार आणि पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करावीत.
3. मिथुन – या राशीच्या लोकांनी पिवळी कणेर, झेंडूची फुले अर्पण करावीत. असे केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
4. कर्क – या राशीचे लोक नवरात्रीदरम्यान पांढरी, गुलाबी फुले देऊ शकतात. असे मानले जाते की या रंगांची फुले अर्पण केल्याने देवी लवकरच प्रसन्न होतात.
5. सिंह – सिंह राशीच्या व्यक्तीने देवी दुर्गाला गुलाब, कणेराची फुले अर्पण करावीत. असे केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
6. कन्या – या राशीच्या लोकांनी देवीला झेंडू, जास्वंद, गुलाब इत्यादीची फुले देवी दुर्गाला अर्पण करावीत.
7. तूळ – तूळ राशीच्या लोकांनी देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करावीत. या लोकांनी पांढरे कमळ, कनेरस बेला किंवा केवड्याचं फूल अर्पण करु शकतात.
8. वृश्चिक – या राशीच्या लोकांनी दुर्गा देवीला लाल फुले अर्पण करावीत. लाल फुले अर्पण केल्याने घरात सुख आणि समृद्धी येते.
9. धनु – धनु राशीच्या लोकांनी देवीला प्रसन्न करण्यासाठी पिवळी फुले अर्पण करावी.
10. मकर – मकर राशीच्या व्यक्तीने निळी फुले अर्पण करावीत. या रंगाची फुले अर्पण केल्याने विशेष फळ मिळते.
11. कुंभ – नवरात्रीमध्ये या राशीच्या लोकांनी देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी निळ्या रंगाची फुले अर्पण करावीत. या रंगाचे फूल अर्पण केल्याने रोग आणि दोष संपतात. तसेच, शनी ग्रहाच्या प्रभावापासून व्यक्तीला स्वातंत्र्य मिळते.
12. मीन – मीन राशीच्या लोकांनी देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी पिवळी फुले अर्पण करावीत. असे केल्याने माता राणी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करते.
Shardiya Navratri 2021 : दुर्गा देवीची 9 रुपं आणि त्यामागील रहस्य, नवरात्री निमित्त जाणून घ्या ही विशेष माहितीhttps://t.co/JRIAvAiEdN#ShardiyaNavratri2021 #navratri2021 #Durgamata
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 9, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Shardiya Navratri 2021 : नवरात्रीत कांदा-लसूण का खाल्ले जात नाही, जाणून घ्या
Shardiya Navratri 2021 : सौभाग्य आणि समृद्धीसाठी या नवरात्रीत घरी आणा ही 4 झाडं…